एक्स्प्लोर

Health Tips : लहान मुलांमध्ये वाढतेय बद्धकोष्ठतेची समस्या; मुलांच्या निरोगी आरोग्यासाठी वेळीच करा 'हे' उपाय

Health Tips : बद्धकोष्ठता ही मुले आणि पालक दोघांसाठीही अस्वस्थता, वेदनादायक आणि त्रासदायक ठरते, ज्यामुळे वेळीच निदान आणि उपचार करणं गरजेचं आहे.

पुणे : आईवडिलांबरोबर हल्ली मुलांच्याही जीवनशैलीत (Lifestyle), त्यांच्या आहाराच्या (Food) सवयीत मोठ्या संख्येने बदल होत आहेत. आहाराच्या चुकीच्या सवयी, फायबरयुक्त अन्नाची कमतरता, पाणी कमी पिणे आणि नियमित शौचास न जाणे यामुळेही पाच वर्षांखालील मुलांमध्येही बध्दकोष्ठतेची (Constipation) समस्या सतावू लागली आहे. बद्धकोष्ठता ही मुले आणि पालक दोघांसाठीही अस्वस्थता, वेदनादायक आणि त्रासदायक ठरते, ज्यामुळे वेळीच निदान आणि उपचार करणं गरजेचं आहे.

या संदर्भात बोलताना पुण्यातील नवजात शिशु व बालरोग तज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल्सचे बालरोग अतिदक्षता विभागाचे डॉ. अमर भिसे यांनी असं सांगितलं आहे की, बद्धकोष्ठता ही वैद्यकीय समस्या बदलती जीवनशैली आणि आहाराच्या चुकीच्या सवयींमुळे उद्भवते. या समस्येमुळे मल विसर्जनास संघर्ष करावा लागतो. प्रक्रिया केलेले अन्नाचे सेवन, आहारात फायबरची कमतरता असलेल्या किंवा पुरेसे पाणी न पिणाऱ्या मुलांमध्ये ही समस्या सर्रासपणे आढळून येते. मानसिक ताण, योग्य वयाच शौचालय प्रशिक्षण न मिळणे आणि वेदना किंवा भीतीमुळे शौचास टाळणे हे देखील या स्थितीस कारणीभूत ठरू शकते. जर वेळीच उपचार केले नाहीत तर, दीर्घकालीन बद्धकोष्ठतेमुळे गुदद्वारात भेग, पोटदुखी आणि भूक न लागणे यासारख्या गुंतागुंतीचा सामना करावा लागू शकतो.

डॉ. अमर पुढे सांगतात की, बध्दकोष्ठतेच्या लक्षणांमध्ये आठवड्यातून तीनपेक्षा कमी वेळा शौचास जाणे, कठीण किंवा वेदनादायक मल, पोट फुगणे आणि पोट रिकामे न झाल्याने चिडचिड होणे यांचा समावेश आहे. पालकांनी मुलांच्या मल विसर्जन सवयींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जर तुमचे मुल मलविसर्जन करताना अस्वस्थ होत असेल, मल विलर्जन करताना वेदना होत असतील किंवा शौचास जाण्यास नकार  देत असेल तर याकडे दुर्लक्ष करु नका. 10 पैकी 6 मुलांना मलविसर्जन करताना अस्वस्थता, पोट फुगणे आणि मलविसर्जन करण्यास असमर्थता येते. बद्धकोष्ठतेची समस्या ही 50% पेक्षा जास्त मुलांमध्ये आढळून येते. पालकांना मुलांच्या आहारात बदल करण्यासाठी फळे, भाज्या आणि कडधान्यातून फायबरयुक्त आहाराचे सेवन वाढवण्याचा, पुरेसे हायड्रेशनकरिता मुलांना प्रोत्साहन देण्याचा आणि नियमित शौचालयाचा वापर करण्याच्या सवयींचे पालन करण्याचा सल्ला दिला जातो. काही मुलांना मलविसर्जन सुलभ करण्यासाठी वैद्यकीय देखरेखीखाली खास औषधांचा सल्ला दिला जातो. जेणेकरुन मल बाहेर पडण्यास त्रास होणार नाही. 

मुलांमध्ये होणारी बद्धकोष्ठतेची समस्या टाळण्यासाठी 'हे' उपाय करा...

  • पालकांनी फायबरयुक्त आहाराचे सेवन करावे.
  • दैनंदिन जीवनात शारीरिक हालचालींना प्रोत्साहन द्यावे.
  • शौचालयाच्या दिनश्चर्येचे पालन करावे जेणेकरून आतड्यांचे आरोग्य चांगले राहील.

शौचालय प्रशिक्षणादरम्यान तणावमुक्त वातावरण तयार करणे आणि लक्षणे कायम राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. वेळीच उपचार आणि जीवनशैलीतील बदलांसह, मुलांमध्ये बद्धकोष्ठतेच्या समस्येचे व्यवस्थापन केले जाऊ शकते आणि त्यांचे एकूण आरोग्य सुधारण्यास मदत होईल असेही डॉ. अमर यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

Health Tips : मुलांना सतत दूध देताय? वेळीच सावध व्हा; 'हे' असू शकतं बध्दकोष्ठतेचं कारण

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SSC GD Constable Recruitment 2025 : स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये 25487 जागांवर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये  25487 जागांवर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
Komal Kale Reel Star Arrested : 50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Devendra Fadnavis Meet Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SSC GD Constable Recruitment 2025 : स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये 25487 जागांवर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये  25487 जागांवर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
Komal Kale Reel Star Arrested : 50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
Tatkal Ticket Booking New Rule : तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
पुन्हा घोळ... निवडणुकीसाठी पुण्यातून इच्छुक, पण नवऱ्याचं नाव इंदापुरात अन् बायकोचं नाव बारामतीत; सुप्रिया सुळेंनी आणलं समोर
पुन्हा घोळ... निवडणुकीसाठी पुण्यातून इच्छुक, पण नवऱ्याचं नाव इंदापुरात अन् बायकोचं नाव बारामतीत; सुप्रिया सुळेंनी आणलं समोर
निरोगी आरोग्यासाठी होलिस्टिक हीलिंगला पसंती, ही पद्धती लाखो लोकांसाठी आशेचा किरण, पतंजलीचा दावा
निरोगी आरोग्यासाठी होलिस्टिक हीलिंगला पसंती, ही पद्धती लाखो लोकांसाठी आशेचा किरण, पतंजलीचा दावा
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
Embed widget