एक्स्प्लोर

Vitamin B12 Deficiency : जिभेवरील 'हे' बदल आहेत व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची लक्षणे

Vitamin B12 Deficiency : जीवनसत्त्व बी 12 केवळ लाल रक्तपेशी आणि डीएनएच्या निर्मितीसाठीच आवश्यक नाही, तर मेंदू आणि चेतापेशींच्या विकासातही महत्त्वाची भूमिका बजावतं. शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असल्यास त्याची लक्षणेही जिभेवर दिसू लागतात.

Vitamin B12 Deficiency : आपल्या शरीरात जीवनसत्त्वांचे (Vitamin) उत्पादन फारच नगण्य प्रमाणात होतं. अशा परिस्थितीत त्याची कमतरता भरुन काढण्यासाठी आपल्याला अन्नातून जीवनसत्त्वे घ्यावी लागतात. निरोगी राहण्यासाठी माणसाला विविध प्रकारच्या जीवनसत्त्वांची गरज असते. वेगवेगळ्या प्रकारची जीवनसत्त्वे आपल्या शरीरात वेगवेगळी कार्ये करतात. शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता असल्यास अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं.

शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता आहे हे शोधणं अनेकदा कठीण असतं. कारण त्यांची लक्षणे फारच उशिरा दिसू लागतात. वेळीच याचा शोध लागला नाही तर अनेक गंभीर समस्यांच्या सामना करावा लागू शकतो. त्यामुळे तुमच्या शरीरात होणाऱ्या  छोट्या-छोट्या बदलांकडे दुर्लक्ष करु नका.

इतर जीवनसत्त्वांप्रमाणे, व्हिटॅमिन बी 12 (Vitamin B12) देखील शरीरासाठी खूप महत्त्वाचे समजलं जातं. हे जीवनसत्त्व केवळ लाल रक्तपेशी आणि डीएनएच्या निर्मितीसाठीच आवश्यक नाही, तर मेंदू आणि चेतापेशींच्या विकासातही महत्त्वाची भूमिका बजावतं. व्हिटॅमिन बी 12 मांस, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळते. शरीरात व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे हृदयाशी संबंधित समस्या, वंध्यत्व, थकवा, स्नायू कमकुवत होणे आणि मज्जासंस्थेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. यासोबतच शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असल्यास त्याची लक्षणेही जिभेवर दिसू लागतात.

वेबमेड या हेल्थ वेबसाईटनुसार, शरीरात व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे लोकांना जिभेतील अल्सरच्या समस्येचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत तुम्हाला जिभेवर किंवा हिरड्यांमध्ये अल्सर होऊ शकतो. जिभेवर तयार झालेले व्रण सामान्यतः आपोआप बरे होतात, परंतु जर तुम्हाला वेदना आणि जळजळ टाळायची असेल तर आंबट आणि अधिक तिखट पदार्थांचं सेवन करणं टाळा. यासाठी बाजारात अनेक प्रकारची औषधेही उपलब्ध आहेत, ज्यामुळे तुमचा त्रास कमी होऊ शकतो.

वेबमेडनुसार, जिभेवर फोड निर्माण होण्यासोबतच जीभ फारत गुळगुळीत होणं हे देखील व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेचं लक्षण आहे. जिभेवर असलेल्या लहान दाण्यांना पॅपिला म्हणतात, परंतु शरीरात व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे, हे दाणे पूर्णपणे गायब होतात आणि तुमची जीभ अगदी गुळगुळीत होते. परंतु जीभ गुळगुळीत होण्याचे कारण केवळ व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता एवढंच नाही तर काही वेळा तुमची जीभ संसर्ग आणि औषधांमुळे गुळगुळीत होऊ शकते.

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची लक्षणे
शरीरात व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची इतरही अनेक लक्षणे आहेत, त्याबद्दल जाणून घेऊया
 
- शरीरात उर्जेची कमतरता
- स्नायू कमकुवत होणे
- अंधुक दिसणे 
- नैराश्य आणि गोंधळ यासारख्या मानसिक समस्या
- स्मरणशक्ती कमकुवत होणे, तसंत काही गोष्टी समजण्यात अडचण
- शरीरात मुंग्या येणे

या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन बी 12 चं प्रमाण जास्त
नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) नुसार, 19 ते 64 वयोगटातील लोकांना दररोज 1.5 मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन बी 12 ची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत, कोणत्या गोष्टींमध्ये व्हिटॅमिन बी 12 आढळते ते जाणून घेऊया - 

- मांस 
- मासे 
- दूध 
- चीज 
- अंडी 
- तृणधान्ये 
याशिवाय, व्हिटॅमिन बी 12 चे अनेक सप्लिमेंट्स बाजारात उपलब्ध आहेत, परंतु त्यांचं सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Ear Wax : कॉटन बडने कान साफ करता? ही सवय ठरू शकते धोकादायक, तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
कॉटन बडने कान साफ करता? ही सवय ठरू शकते धोकादायक, तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
Corona Virus Update: आता कोणत्या राज्यात कोरोनानं डोकं वर काढलं? अवघ्या 21 दिवसात 12 जण बाधित अन् 4 जणांचा जीव गेला!
आता कोणत्या राज्यात कोरोनानं डोकं वर काढलं? अवघ्या 21 दिवसात 12 जण बाधित अन् 4 जणांचा जीव गेला!
Health: IVF प्रक्रियेत तीन वेळा अपयश आले? मग आता पुढे काय? मूल होणार की नाही? डॉक्टरांची महत्त्वाची माहिती...
IVF प्रक्रियेत तीन वेळा अपयश आले? मग आता पुढे काय? मूल होणार की नाही? डॉक्टरांची महत्त्वाची माहिती...
Health Tips : दप्तरांच्या ओझ्याने शाळकरी मुलांना मणक्याच्या समस्या; वाचा लक्षणं आणि तज्ज्ञांचा सल्ला
दप्तरांच्या ओझ्याने शाळकरी मुलांना मणक्याच्या समस्या; वाचा लक्षणं आणि तज्ज्ञांचा सल्ला

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget