एक्स्प्लोर

Health News : पुरेशी झोप घ्या, शारीरिक आणि मानसिक आजारांना दूर ठेवा

Health News : नव्या वर्षाच्या स्वागताबरोबरच निरोगी आहार, व्यायाम, वजन कमी करणे, चांगले आरोग्य या सोबतच पुरेशी झोप ही घेण्यासाठी विशेष भर देणे गरजेचे आहे. पुरेशी झोप घेणे ही प्रत्येकाच्या आरोग्यासाठी महत्त्वाची ठरते.

Health News : नव्या वर्षाच्या स्वागताबरोबरच निरोगी आहार, व्यायाम, वजन कमी करणे, चांगले आरोग्य या सोबतच पुरेशी झोप (Sleep) ही घेण्यासाठी विशेष भर देणे गरजेचे आहे. उत्तम झोप ही वजन (Weight), रक्तदाब (Blood Pressure), रक्त शर्करा (Blood Sugar), मेंदूचे आरोग्य एकंदरीत संपूर्ण आरोग्याशी निगडीत आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये, अमेरिकन हार्ट असोसिएशनने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांना दूर ठेवण्यासांठीच्या चांगल्या आरोग्याच्या सवयींच्या यादीमध्ये पुरेशी झोप हा महत्त्वाचा मुद्दा समाविष्ट केला आहे.

पुरेशी झोप घेणे ही प्रत्येकाच्या आरोग्यासाठी महत्त्वाची ठरते. पुरेशी झोप ही केवळ आपल्या शारीरिक आरोग्यावर परिणाम करते असे नाही तर मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी देखील पुरेशा झोप घेणे आवश्यक आहे. पुरेशी झोप घेतल्याने नैराश्य आणि पोस्टट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर यांसारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता देखील कमी होते.

झोपेचे प्रमाण व्यक्तीपरत्वे अवलंबून असते

प्रत्येकाला आठ तासांची गरज असते असे नाही तर झोपेचे गणित हे प्रत्येक व्यक्तीनुसार बदलते. प्रौढांना सहसा सात ते नऊ तासांच्या झोपेची आवश्यकता असते तर लहान मुले आणि किशोरवयीन मुलांना त्याहूनही जास्त झोपेची आवश्यकता असते. अवेळी झोप घेणे, फार वेळ झोपणे आणि कमी वेळ झोपणे या तीनही गोष्टी शरीराचे आरोग्य बिघडवतात. 

सुट्टीच्या वेळी जास्त तास झोपून आठवड्याभराची झोपेची कमतरता भरुन निघत नाही. आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळे अनेकदा पुरेशी झोप घेणे शक्य होत नाही. मग अशावेळी सुट्टीच्या दिवशी भरपूर झोप घेतली तर आठवड्याभराचे झोपेचे गणित सुरळीत केले जाऊ शकत नाही. रविवारी जास्तीचे दोन तास झोपण्यापेक्षा, आठवड्यातून प्रत्येक दिवशी 15 मिनिटे अधिक झोप घेणे उत्तम राहिल.

पुरेशी झोपेचे महत्त्व

तुम्ही पुरेशी झोप घेतल्यास दुसऱ्या दिवशी एक चांगला उत्साह निर्माण होऊन काम करण्यासाठी चांगली ऊर्जा निर्माण होते. रात्रीच्या झोपेने आरोग्याच्या समस्या नक्कीच दूर होऊ शकतात. त्याकरता दररोज पुरेशी झोप घेणे आवश्यक ठरते. अलीकडेच जगभरातील अनेक कार्डियोलॉजिकल असोसिएशनच्या अहवालानुसार झोपेची कमतरता ही हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी जोखीम घटकाशी जोडली गेली असून अपुऱ्या झोपेने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी तक्रारी वाढू शकतात. त्यामुळे येत्या नवीन वर्षात प्रत्येकाने पुरेशी झोप घेण्याचा संकल्प करावा.

- डॉ अनुप महाजनी, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट, मेडिकव्हर हॉस्पिटल, नवी मुंबई

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget