Health : प्रचंड डोकेदुखी...असह्य वेदना.. 'या' 5 कारणांमुळे मायग्रेनचे बळी होऊ शकता, वेळीच सावध व्हा!
Health : मायग्रेन ही एक सामान्य समस्या आहे, ज्यामुळे बऱ्याच लोकांना त्रास होतो. मायग्रेनमुळे होणारा त्रास असह्य झाल्याने दैनंदिन काम करणंही कठीण होऊन बसतं.
Health : तुम्हाला कधी प्रचंड डोकेदुखीसोबत असह्य वेदना जाणवत असतील तर तुम्हाला सुद्धा मायग्रेन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मायग्रेन ही एक सामान्य समस्या आहे, ज्यामुळे बऱ्याच लोकांना त्रास होतो. मायग्रेनमुळे होणारा त्रास असह्य झाल्याने दैनंदिन काम करणंही कठीण होऊन बसतं. अशा वेळी मायग्रेनला कारणीभूत ठरू शकतील अशा काही ट्रिगर्सची माहिती असणे आवश्यक आहे. मायग्रेनच्या काही प्रमुख कारणांबद्दल जाणून घेऊया.
बदलत्या जीवनशैलीचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर..
आजकाल लोकांची जीवनशैली झपाट्याने बदलत आहे. कामाचा वाढता ताण आणि बदलती कार्यसंस्कृती याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे, त्याचा परिणाम व्यक्तीच्या शारीरिक तर आहेच. सोबत मानसिक आरोग्यावरही दिसून येत आहे. जीवनशैलीतील बदलांसोबतच खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी देखील अनेक आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू शकतात. मायग्रेन वेदना ही यापैकी एक समस्या आहे, ज्यामुळे आजकाल बहुतेक लोक त्रस्त आहेत.
मायग्रेन होण्यामागे काही कारणं आहेत..
ही एक प्रकारचा डोकेदुखी आहे, ज्याच्यासोबतच सहसा मळमळ, उलट्या आणि अति संवेदनशीलता जाणवते. यावर कोणताही विशिष्ट उपचार नसल्यामुळे जीवनशैलीतील बदल आणि काही औषधांच्या मदतीने त्यावर नियंत्रण ठेवले जाते. याशिवाय काही कारणंही आहेत, ती ओळखून मायग्रेनचा त्रास बऱ्याच प्रमाणात टाळता येऊ शकतो. मायग्रेनसाठी जबाबदार असलेल्या काही प्रमुख कारणांबद्दल जाणून घेऊया-
टेन्शन
आजकाल जनजीवन अतिशय धकाधकीचे झाले आहे. कामाच्या दबावामुळे आणि इतर कारणांमुळे लोकांच्या शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. यामुळे, लोक अनेकदा तणाव आणि नैराश्याला बळी पडतात, ज्यामुळे मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.
झोपेचा त्रास
निरोगी राहण्यासाठी चांगली आणि पूर्ण झोप खूप आवश्यक आहे. मात्र, बिघडलेल्या जीवनशैलीमुळे अनेकदा झोपेचा त्रास होतो. अशा परिस्थितीत, झोपेची अनियमित पद्धत, अपुरी झोप किंवा खूप झोप काही लोकांमध्ये मायग्रेनसाठी ट्रिगर म्हणून काम करू शकते.
हार्मोन्स मध्ये बदल
हार्मोन्समधील बदल देखील मायग्रेनला चालना देऊ शकतात. इस्ट्रोजेनमधील चढ-उतार मायग्रेनच्या वेदनास कारणीभूत ठरू शकतात. मासिक पाळी, गर्भधारणा किंवा रजोनिवृत्ती दरम्यान महिलांना हा अनुभव येतो.
पर्यावरणाचे घटक
कधीकधी काही पर्यावरणीय घटक देखील मायग्रेनच्या वेदनास कारणीभूत ठरू शकतात. एखाद्या व्यक्तीला तेजस्वी प्रकाश, मोठा आवाज, तीव्र वास आणि हवामानातील बदल इत्यादींमुळे देखील मायग्रेनचा झटका येऊ शकतो.
काही खाद्यपदार्थ
या सर्व कारणांव्यतिरिक्त, काही खाद्यपदार्थ आहेत ज्यामुळे मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. जुने चीज, प्रक्रिया केलेले मांस आणि आर्टिफिशियल स्वीटनर हे पदार्थ संवेदनशील व्यक्तींमध्ये मायग्रेनची सुरूवात करू शकतात.
हेही वाचा>>>
Women Health : शरीरात अत्यंत शांतपणे पसरतो 'हा' कर्करोग! महिलांनो.. चुकूनही 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )