Health: आश्चर्यच... उंच लोकांना कर्करोग लवकर होतो? नेमकं सत्य काय? वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंडचा रिपोर्ट सांगतो...
Health: एका रिपोर्टनुसार उंच लोकांना 15 प्रकारच्या कर्करोगाचा धोका जास्त असतो. नेमकं सत्य काय? जाणून घ्या..
Health: आजकालची खराब जीवनशैली, कामाचा ताण, जंकफूडचे अतिसेवन यासारख्या अनेक गोष्टींमुळे अनेकांना विविध आजारांनी ग्रासलंय. अशात कर्करोग म्हणजेच कॅन्सर लोकांना होणारी सामान्य बाब झाली आहे. लहान मुलांपासून ते वृद्ध आणि महिलांपर्यंत अनेक प्रकरणे समोर येत आहेत. आता आणखी एक आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. ती म्हणजे, ज्या लोकांची उंची जास्त असल्यामुळे ते अनेक आजारांना बळी पडतात? तुमचा यावर विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे. कर्करोग उंच लोकांवर जास्त हल्ला करतो. वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंडच्या अहवालात या धक्कादायक बाबी समोर आल्या. ज्यामध्ये कमी उंचीच्या लोकांपेक्षा उंच लोकांना कॅन्सरचा धोका जास्त असतो असे म्हटलं गेलंय.
रिपोर्टमध्ये म्हटलंय...
यूके मिलियन वुमन स्टडीच्या रिपोर्टनुसार 17 प्रकारच्या कॅन्सरवर संशोधन करण्यात आले. ज्यामध्ये असे आढळून आले की, उंच लोकांना 15 प्रकारच्या कर्करोगाचा धोका जास्त असतो. रिपोर्टनुसार, उंच लोकांना स्वादुपिंड, अंडाशय, गर्भाशय, किडनी, प्रोस्टेट, स्तन आणि त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो. 10 सेंटीमीटरपेक्षा उंच असलेल्या प्रत्येक व्यक्तीला कर्करोग होण्याचा धोका 16 टक्के जास्त असल्याचे या अभ्यासात म्हटले आहे. अभ्यासानुसार, 165CM (5.5 फूट) उंचीच्या 10 हजार महिलांपैकी 45 महिला कर्करोगाने ग्रस्त असल्याचे आढळून आले, तर 175CM (5.89 फूट) उंचीच्या 10 हजार महिलांपैकी 52 महिला कर्करोगाने ग्रस्त असल्याचे आढळून आले.
A report revealed that taller people are at higher risk of developing #cancer. #WorldCancerResearchFund reveals that there is strong evidence taller people have a higher chance of developing cancer of the: pancreas; large bowel; uterus; ovary; prostate; kidney; skin & breast pic.twitter.com/AV6ozUjNxw
— Ch.M.NAIDU (@chmnaidu) September 3, 2024
कमी उंचीच्या लोकांपेक्षा उंच लोकांना कॅन्सरचा धोका जास्त?
याचा अर्थ असा की कर्करोग 165 सेमी महिलांऐवजी 175 सेमी उंचीच्या महिलांमध्ये जास्त आढळला आहे. अभ्यासात असे म्हटले आहे की 23 प्रकारच्या कॅन्सरपैकी 22 प्रकार उंच लोकांना जास्त बळी पडतात. असा दावा करण्यात आला आहे की कर्करोगाचे कारण उंची म्हणजेच जैविक क्षेत्र देखील असू शकते. तथापि, काही तथ्ये पूर्णपणे स्पष्ट नाहीत. त्यामागे काही कारणे दिली आहेत. रिपोर्टनुसार, उंच लोकांमध्ये जास्त पेशी असतात. म्हणजे उंच लोकांची आतडे आणि इतर अवयव लहान लोकांपेक्षा लांब असतात. त्यामुळे अशा लोकांना आतड्यांचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते.
कर्करोग कसा होतो?
शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, कर्करोगाचे कारण म्हणून खराब झालेले गुणसुत्रे पेशींमध्ये जमा होतात. जे एका ठिकाणी जमते. जेव्हा पेशींचे विभाजन होऊन नवीन पेशी तयार होतात तेव्हा जनुकांचे नुकसान होते. याचा अर्थ, हे जितक्या वेळा विभाजित होतील तितक्या वेळा जनुकांचे विभाजन होईल. ते जितके अधिक खराब होईल तितकेच ते नंतर नवीन पेशींमध्ये साठवले जाईल. या खराब झालेल्या जनुकामुळे पेशींमध्ये कर्करोग होतो.
हेही वाचा>>>
Men Health: पुरूषांनो..अगदी शांतपणे शरीरात पसरतो हा कॅन्सर, चुकूनही दुर्लक्ष करू नका 'ही' 7 लक्षणं, संशोधनात म्हटलंय...
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )