Health: एक 'असा' डोस, जो Blood Pressure नियंत्रणात आणू शकतो? AIIMS च्या अभ्यासात नवी भेट
Health: एका नवीन अभ्यासात रक्तदाब (Blood Pressure) नियंत्रणाचा नवीन मार्ग सापडला आहे. संशोधनाबद्दल सर्व काही जाणून घेऊया.
Health: आजकालची बदलती जीवनशैली, कामाचा ताण, व्यायामाचा अभाव यामुळे अनेकांना विविध गंभीर आजारांनी ग्रासलंय. मधुमेह, हृदयविकार तसेच रक्तदाबाची समस्या ही एक गंभीर आरोग्य समस्या बनली आहे. अमेरिका असो वा भारत, विकसित देशांमध्येही हा आजार गंभीर आहे. एम्सच्या नव्या अभ्यासात बीपीच्या रुग्णांना नवी भेट मिळाली आहे. एम्सच्या संशोधन पथकाने दोन औषधांच्या मिश्रणाचा एकच डोस तयार केला आहे, जो बीपी नियंत्रित करू शकतो. संशोधनाबद्दल सर्व काही जाणून घेऊया.
एक गंभीर आरोग्य समस्या
जेव्हा तुमच्या धमनीच्या भिंतींवर रक्ताचा दाब झपाट्याने वाढत राहतो तेव्हा उच्च रक्तदाब होतो. हे कालांतराने तुमच्या धमन्यांचे नुकसान करते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक सारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. या सामान्य स्थितीला उच्च रक्तदाब देखील म्हणतात. ही एक गंभीर आरोग्य समस्या आहे जी सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करू शकते.
संशोधनात मोठा खुलासा
हे संशोधन एम्स आणि लंडनच्या इंपिरियल कॉलेज या दोघांनी केले आहे, ज्यामध्ये अनियंत्रित रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी दोन औषधांच्या मिश्रणातून तिसरे औषध तयार करण्यात आले आहे. हे औषध खूप प्रभावी आहे आणि 70% रुग्णांवरील चाचण्यांमध्ये ते यशस्वी ठरले आहे. शिवाय, पूर्वीची औषधे आणखी प्रभावी झाल्याची नोंद आहे. भारतातील जवळपास 30% लोकांना बीपीची समस्या आहे, म्हणून हा नवीन अभ्यास या लोकांसाठी एक चांगला उपाय आहे.
तज्ज्ञ काय म्हणतात?
या संशोधनाबद्दल एम्सचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अंबुज राय सांगतात की, भारतात अनेक आजार अचानक हल्ला करतात. निष्काळजीपणामुळे निदान होण्यासही वेळ लागतो. उच्च रक्तदाबामुळे, हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोक सारख्या घातक परिस्थितींचा सामना करावा लागू शकतो. याआधी रुग्णांवर एकत्रित औषधे वापरली गेली आहेत, परंतु ती या नवीन डोसइतकी प्रभावी ठरलेली नाहीत. यापूर्वी आफ्रिकन कॉम्बिनेशन डोसच्या मदतीने उपचार केले जात होते. मात्र एका नवीन औषधाच्या मदतीने 70% लोकांनी त्यांचे बीपी नियंत्रित करण्यास सुरवात केली आहे.
कोणत्या औषधांचा अभ्यास केला गेला?
या अभ्यासाची सुरुवात दोन औषधांच्या संयोजनाच्या तीन वेगवेगळ्या बॅच होत्या. एक डोस Amlodipine + Perindropil, दुसरी बॅच Amlodipine + Indapamide आणि तिसरी बॅच Indapamide + Perindropil ची होती. मात्र, तिघांपैकी कोणाला यश आले, याचा खुलासा झालेला नाही.
1,981 लोकांवर अभ्यास, 3% लोकांमध्ये साइड इफेक्ट्स
हा अभ्यास भारतातील सुमारे 35 भागात 1,981 लोकांवर करण्यात आला. या भागात ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील लोकांचा समावेश होता. तसेच, या लोकांचे वय 39 ते 70 वर्षे दरम्यान होते. जर आपण साइड इफेक्ट्सबद्दल बोललो तर त्याचे दुष्परिणाम केवळ 3% लोकांमध्ये दिसून आले आहेत.
उच्च रक्तदाबाची सुरुवातीची लक्षणे
हे सायलेंट किलर जरी मानले जात असले, तरी काही संकेत असे आहेत, जी तुम्ही समजून घेऊ शकता.
- डोकेदुखी.
- अंधुक दृष्टी.
- चक्कर येणे
- छातीत दुखणे.
- श्वास घेण्यास त्रास.
हेही वाचा>>>
Child Health: पालकांनो सावधान! मोबाईलच्या लाईटमुळे मुलाच्या डोळ्यात 'असं' काही दिसलं, आईची तब्येतच बिघडली; गंभीर आजार आढळला
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )