Health: थंडीत 'मॉर्निंग वॉक' चुकीच्या वेळी करत नाही ना? आरोग्य बिघडवू शकते! चालण्याची योग्य वेळ जाणून घ्या..
Health: चालण्याने शरीराला फायदा होतो. पण आरोग्य बिघडू नये म्हणून हिवाळ्यात योग्य वेळी चालणे गरजेचे असल्याचे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. जाणून घ्या...
Health: हिवाळा सुरू झाला असून अनेक ठिकाणी थंडीची लाट दिसून येतेय. हवामानात बदल झाला की साहजिकच त्याचा परिणाम व्यक्तीच्या आरोग्यावर होताना दिसतो. विविध आजार डोकं वर काढतात. अशात काळजी घेणे अत्यंत आवश्यक होते. हिवाळ्यात सकाळी चालणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, परंतु चालण्यासाठी योग्य वेळ निवडणे खूप महत्वाचे आहे, कारण चुकीच्या वेळी चालणे आरोग्यावर नकारात्मक परिणाम करतात. हिवाळ्यात धुक्यामुळे सकाळचे तापमान खूपच कमी असते, त्यामुळे सर्दी किंवा श्वसनाचा त्रास होऊ शकतो. हिवाळ्यातील सकाळ काही लोकांसाठी उन्हाळ्यापेक्षा जास्त हानिकारक असू शकते. या रिपोर्टमध्ये जाणून घेऊया, हिवाळ्यात कोणत्या वेळी चालणे चांगले आहे? तज्ज्ञ काय सांगतात...
हिवाळ्यात कोणत्या वेळी चालू नये?
या दिवसांमध्ये सकाळी 4 ते 5 या वेळेत चालणे टाळावे. कारण सध्या हिवाळा सुरू असल्याने देशातील काही भागात धुके आहे. वातावरणात धुलिकण आहेत. स्मॉग हा प्रदूषणाचा एक कण आहे. जो सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करू शकतो आणि गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे यावेळी चालणे टाळावे.
कधी चालायचे?
मॉर्निंग वॉक- हिवाळ्यात फिरण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे सूर्य उगवल्यानंतर. खरं तर, हिवाळ्यात, सूर्योदय होत असताना असताना, म्हणजे सकाळी 7:30 ते 9:00 च्या दरम्यानच चालले पाहिजे. यावेळी थंडी थोडी कमी होते आणि हलका सूर्यप्रकाशही येतो, त्यामुळे शरीराला व्हिटॅमिन-डीही मिळते.
इव्हनिंग वॉक- हिवाळ्यात सकाळी चालणे अवघड असेल तर संध्याकाळी साडेचार ते सहा या वेळेतही चालता येते. हे आरोग्य आणि शरीर दोन्हीसाठी फायदेशीर आहे.
चुकीच्या वेळी चालण्याचे तोटे
- सकाळी खूप लवकर किंवा अंधारात चालल्याने थंड वाऱ्यामुळे खोकला, सर्दी किंवा दमा सारख्या समस्या उद्भवू शकतात.
- थंड वाऱ्यामुळे स्नायूंचा ताण आणि सांधेदुखी होऊ शकते.
- या वाऱ्यांचा फुफ्फुसांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो, त्यामुळे आरोग्य बिघडू शकते.
दररोज चालण्याचे फायदे
- हृदयाचे आरोग्य सुधारते.
- वजन नियंत्रणात मदत होते.
- मधुमेह नियंत्रणात राहतो.
- हाडे आणि सांधे देखील मजबूत होतात.
- रोगप्रतिकारशक्ती वाढते.
हेही वाचा>>>
Women Health: जुळी मुलं कशी जन्माला येतात? कोणत्या महिलांमध्ये अशी शक्यता असते? तज्ज्ञांकडून जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )