Health : भर उन्हात मतदान करायला जाताय? त्वचेची काय काळजी घ्याल? त्वचारोगतज्ज्ञ सांगतात...
Health : भर उन्हात स्किनकेअर रुटीन फॉलो केल्याने तसेच चांगल्या दर्जाच्या सौंदर्य उत्पादनांचा वापर केल्यास त्वचा निरोगी आणि तजेलदार राखण्यास मदत होते.
Health : महाराष्ट्रात आज चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. अशात उन्हाळा देखील आहे, बरेच जण आज भर उन्हात मतदान करण्यासाठी जात आहेत, अशात तुमच्या त्वचेची चांगली काळजी घेणंही तितकच गरजेचं आहे. सुट्टीवर जाण्यापूर्वी त्वचेची काळजी कशी घ्याल? उपचार कसे कराल? याविषयीची माहिती त्वचारोगतज्ज्ञ डॉ.रिंकी कपूर यांनी या लेखाच्या माध्यमातून दिली आहे. डॉ. कपूर या कन्सल्टंट डर्मेटोलॉजिस्ट, कॉस्मेटिक डर्मेटोलॉजिस्ट आणि डर्मेटो-सर्जन आहेत.
प्रवासापूर्वी स्किनकेअर रुटीन फॉलो करा...
उन्हाळ्याच्या सुट्टीला सुरुवात झाली आहे. या सुट्टीचा आनंद लूटण्यासाठी बरेचजण ठिकठिकाणी प्रवास करतात, नवीन जागांना भेट देतात. प्रवासापूर्वी आपल्या त्वचेची काळजी घेतल्यास आपली त्वचा निरोगी आणि नितळ राहते. प्रवासामुळे तुमची त्वचा वेगवेगळ्या हवामान, वातावरण आणि प्रदूषकांच्या संपर्कात येते. ज्यामुळे कोरडेपणा, त्वचा कोरडी पडणे, मुरुम, फोड आणि त्वचेच्या इतर समस्या उद्भवू शकतात. तुम्ही बाहेर जाण्यापूर्वी एक चांगले स्किनकेअर रुटीन फॉलो करायला विसरु नका, तुम्ही तुमच्या त्वचेला या आव्हानांसाठी तयार करण्यात आणि तिचे नैसर्गिक संतुलन राखण्यात मदत करू शकता. प्रवासापूर्वी त्वचेची योग्य काळजी घेतल्यास त्वचा चांगली राखण्यास मदत होते. तणावामुळे त्वचेवर जळजळ होऊ शकते, ज्यामुळे त्वचेचा लालसरपणा, खाज आणि मुरुमांचा त्रास होऊ शकतो. प्रवासापूर्वी स्किनकेअर रुटीन फॉलो केल्याने तसेच चांगल्या दर्जाच्या सौंदर्य उत्पादनांचा वापर केल्यास त्वचानिरोगी आणि तजेलदार राखण्यास मदत होते.
काही खास टिप्स
उत्तमस्कीन केअर रुटीन हे तुमच्या त्वचेसाठी योग्य ठरते, तसेच योग्यपध्दतीने सीरम, मॉइश्चरायझर्स किंवा सनस्क्रीनचा वापर केल्यास ते अधिक प्रभावीपणे त्वचेमध्ये खोलवर जाऊन संरक्षण करते.
प्रवासाला जाण्यापूर्वी तुमची त्वचा निरोगी आणि तजेलदार राहिल्याची खात्री करा आणि योग्य ती काळजी घ्या.
तुमची त्वचा हायड्रेट राखण्यासाठी आणि कोरड्या हवेपासून आणि बदलत्या हवामानापासून संरक्षण करण्यासाठी तुमच्या स्किनकेअरमध्ये हायड्रेटिंग सीरम आणि मॉइश्चरायझर्सचा वापर करा.
सनस्क्रीन वापरायला विसरू नका, कारण अतिनील किरण त्वचेस हानीकारक ठरु शकतात. केवळ डॉक्टरांनी शिफारस केलेले सनस्क्रीन वापरा आणि त्वचेला सूर्याच्याअतिनील किरणांपासून वाचवा.
एक्सफोलिएशनही प्री-ट्रॅव्हल स्किनकेअरमधीलआणखी एक महत्त्वाची पायरी आहे. कारण ती मृतत्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करते आणि तुमची उत्पादने त्वचेत खोलवर जाण्यास मदत करते.
नितळ, तेजस्वी त्वचेसाठी सौम्य एक्सफोलिएटिंग स्क्रब आणि उत्पादनांची निवडकरा. भरपूर पाणी पिऊन हायड्रेटेड राहा आणि बाहेरून हायड्रेटिंग फेस मास्क किंवामिस्ट्स वापरून लांबचा विमान प्रवास किंवा कार राईड करा.
यामुळे तुम्ही जेव्हा तुमच्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचाल तेव्हा तुमची त्वचा तजेलदार आणि टवटवीत दिसेल. या स्किनकेअर उपचारांची निवड करा. तुमच्या सुट्टीपूर्वी स्किनकेअर उपचारांपैकी करु शकणाऱ्या उपचारांमध्ये सर्वात चांगला पर्याय म्हणजे हायड्रेटिंग फेशियल.
हे तुमच्या त्वचेचे पोषण आणि मॉइश्चरायझेशन राखण्यास मदत करते, ज्यामुळे तुमची त्वचा ताजी आणि टवटवीतवाटेल.
दुसरा पर्याय म्हणजे अनेकांनी निवडलेली केमीकल पील्स जी त्वचेच्या बाहेरीलथराला एक्सफोलिएट करून त्वचा नितळ व त्वचेचा रंगउजळविण्यास मदत करते.
मायक्रोडर्माब्रेशन हे मृत त्वचेच्या पेशीकाढून टाकण्यास आणि त्वचेवरील छिद्रेबंद करण्यात मदत करू शकते, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या सहलीसाठी अधिक तेजस्वी त्वचाअनुभवायला मिळेल.
या प्रक्रियेसाठी प्रशिक्षिततज्ञाची निवड करायला विसरु नका. सुट्टीवर जाण्याआधी डर्मप्लॅनिंग उपचार घ्या. ही प्रक्रिया तुमच्यात्वचेच्या पृष्ठभागावरून मृत त्वचेच्या पेशी काढून टाकते. यामुळे तुमचे सौंदर्य आणखी खुलुन येईल.
कुटुंबासह किंवा मित्रांसोबत सहलीला जाण्यापूर्वी मुरुम किंवा हायपरपिग्मेंटेशन यासारख्या विशिष्ट स्किनकेअर समस्यांना लक्ष्य करण्यासाठी लाइट थेरपी करायला विसरु नका.
या प्रभावी उपचारांमुळे तुमची त्वचा तजेलदार आणि निरोगी दिसेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Health : सकाळी उठल्या उठल्या तुम्हीही पाणी पिता? आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का? तज्ज्ञ काय सांगतात...
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )