(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health : 'ही' कारणं, ज्यामुळे देशभरात डेंग्यूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतोय, का वाढतायत डेंग्यूचे रुग्ण? कसा बचाव करायचा? डॉक्टरांनी सांगितले
Health : डेंग्यूच्या आजाराची वाढती रुग्णसंख्या पाहता यापासून बचाव करणे अत्यंत गरजेचे आहे. का वाढतायत याचे रुग्ण? जाणून घ्या...
Health : आपल्याला सर्वांना माहित आहे की, डेंग्यू हा एक गंभीर आजार आहे, जो डासांच्या चावण्याने पसरतो. त्याची वेळीच ओळख न झाल्यास अनेक बाबतीत तो गंभीर ठरू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, देशभरात डेंग्यूने (Dengue) कहर सुरूच ठेवला आहे. कर्नाटकात अलीकडे याची वाढती रुग्णसंख्या पाहता याला महामारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याचवेळी देशाची राजधानी दिल्लीत यामुळे मृत्यूच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. डेंग्यूच्या रुग्णांची संख्याही सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत हा आजार टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
डेंग्यूपासून बचाव करणे अत्यंत गरजेचे
देशाच्या अनेक भागात डेंग्यूने कहर सुरूच ठेवला आहे. एकीकडे कर्नाटकात याला महामारी घोषित करण्यात आले आहे, तर दुसरीकडे दिल्लीतही यामुळे मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. या आजाराची वाढती प्रकरणे पाहता यापासून बचाव करणे अत्यंत गरजेचे आहे. या आजाराबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, तसेच वाढत्या रुग्णसंख्येचे कारण जाणून घेण्यासाठी, एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार, डॉक्टर मुझम्मिल सुलतान कोका यांनी डेंग्यूबाबत महत्त्वाची माहिती दिलीय.
डेंग्यूचे रुग्ण का वाढतायत?
डॉक्टर म्हणतात, डेंग्यूचा प्रादुर्भाव हा एडिस डास, विशेषतः एडिस इजिप्ती, जो उष्ण, दमट ठिकाणी आढळतो, चावल्याने होतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. साचलेले पाणी, खराब कचरा व्यवस्थापन आणि डास नियंत्रणाच्या अपुऱ्या पद्धतींमुळे हा विषाणू वेगाने पसरतो. पावसाळ्यात, डासांच्या प्रजननाच्या ठिकाणांची संख्या वाढते, त्यामुळे त्यांच्या प्रसाराचे प्रमाण झपाट्याने वाढते. यासोबतच शहरीकरण आणि वाढती लोकसंख्या ही देखील डेंग्यूच्या वाढत्या रुग्णांची कारणे आहेत.
या मार्गांनी आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या
- डेंग्यूपासून रक्षण करण्यासाठी, आपल्या आजूबाजूला डासांची पैदास होऊ देऊ नका.
- यासाठी सर्व प्रकारची भांडी किंवा कंटेनर झाकून ठेवा ज्यामध्ये डासांची पैदास होऊ शकते.
- घराच्या आजूबाजूला कुठेही पाणी साचले असेल तर ते ताबडतोब रिकामे करा.
- ज्या ठिकाणी डासांची पैदास होते ते नष्ट करण्यासाठी कीटकनाशक वापरा.
- जेव्हा डास जास्त सक्रिय असतात, तेव्हा सकाळ आणि संध्याकाळी झाकलेले, लांब बाही असलेले कपडे घाला.
- खिडक्या आणि दारांवर स्क्रीन किंवा मच्छरदाणी लावा.
- जास्त ताप, डोकेदुखी आणि सांधे समस्या यासारखी डेंग्यूची लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हेही वाचा>>>
Health : कोरोनापेक्षाही जास्त धोकादायक डेंग्यू? शरीराचा 'हा' भाग करतोय निकामी, संशोधनात काय म्हटलंय?
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )