Health : भर उन्हातून आल्यानंतर तुम्हीही लगेच थंड पाणी पिताय? आताच थांबा! शरीरावर होणारे परिणाम जाणून थक्क व्हाल
Health : आरोग्य तज्ज्ञांच्या मते, उन्हातून बाहेर आल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास आजारी पडू शकतो. यामुळे शरीरावर होत असलेल्या नुकसानीबद्दल जाणून घेऊया
Health : सध्या देशासह राज्यभरात तापमानात चांगलीच वाढ होताना दिसत आहे. यामुळे विविध भागात उन्हाच्या झळा मारत आहे. या उन्हाळ्यात आपल्याला सारखी तहान लागत असल्याने अनेक जण एकदम थंड पाणी पितात. पण तुम्हाला माहित आहे का? भर उन्हातून आल्यानंतर तुम्ही लगेच थंड पाणी पित असाल तर आताच थांबवा, कारण याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम पाहून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल, आरोग्य तज्ज्ञ याबाबत काय सांगतात? ते जाणून घ्या..
तुम्हीही असे करत असाल, तर आजपासूनच बंद करा
उन्हाळा आला असून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. या हवामानात तुम्ही कामानिमित्त थोडा वेळ का होईना बाहेर पडता, या उन्हात तुमचा घसा आणि जीभ कोरडी पडू लागते, अशात थंड पाणी प्यायल्यावर आपल्याला आराम वाटतो, आपल्यापैकी बहुतेक जण उन्हातून बाहेर पडताच थंडगार पाणी पितात. तुम्हीही असे करत असाल तर आजपासूनच हे करणे बंद करा, कारण याचा तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. थंड पाणी पिण्याने आरोग्याला काय नुकसान होऊ शकते ते जाणून घेऊया तज्ञांकडून.
उन्हातून बाहेर पडल्यावर लगेच थंड पाणी का पिऊ नये?
उन्हातून बाहेर आल्या आल्या थंड पाणी प्यायल्याने तुमच्या शरीराचे तापमान बिघडते. तुम्ही बाहेरून आल्यावर तुमच्या शरीराचे तापमान वाढते आणि त्यात तुम्ही अचानक थंड पाणी पिता, तेव्हा तुम्हाला थंडी आणि उष्णतेची समस्या होते. त्यामुळे सर्दी, ताप येण्याची शक्यता असते.
जेव्हा तुम्ही अचानक थंड पाणी पिता, तेव्हा त्याचा तुमच्या पचनावरही परिणाम होतो, ज्यामुळे तुमची पचनक्रिया मंदावते आणि तुम्हाला अपचनाची तक्रार असते. तज्ज्ञांच्या मते, थंड पाणी प्यायल्याने तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.
थंड पाणी पिणे देखील तुमच्या हृदयासाठी धोकादायक ठरू शकते, जेव्हा तुम्ही थंड पाणी पितात, तेव्हा तुमच्या रक्तवाहिन्या उडतात आणि रक्तप्रवाह मंदावतो. अशा स्थितीत हृदयाच्या आरोग्याला हानी पोहोचते.
उन्हातून बाहेर पडल्यानंतर लगेच थंड पाणी प्यायल्यास डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. हे घडते कारण तुमचा ब्रेन फ्रीज होतो. जास्त थंड पाणी प्यायल्याने मेंदूच्या मज्जातंतूंवर परिणाम होतो, ज्यामुळे मेंदू नीट काम करू शकत नाही. जर तुम्हाला सायनसची समस्या असेल तर तुमच्यासाठी परिस्थिती आणखी वाईट होऊ शकते.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Liver Disease : अति मद्यपान.. धोक्याची घंटा.. तुम्हालाही यकृत संबंधित 'ही' लक्षणं जाणवतायत? त्वरित ओळखा, डॉक्टर सांगतात...
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )