Health: 'कानात इअरफोनचा खरंच स्फोट होऊ शकतो का? कानांवर कसा होतो परिणाम?' आरोग्य तज्ज्ञ काय म्हणतात...
Health: गेल्या काही वर्षांत इअरफोन्सचा ट्रेंड खूप वाढला आहे. आता लोकांनी वायर्ड इअरफोन्सऐवजी पोर्टेबल इअरफोन वापरण्यास सुरुवात केली आहे. या इअरफोन्सचा वापर कानांसाठी खरंच हानिकारक आहे का?
Health: आजकालच्या जगात मोबाईल ही काळाची गरज बनत चाललीय. अशात याच मोबाईलचा वापर अनेक गोष्टींसाठी केला जातो. महत्त्वाचा कॉल, एखादी कामानिमित्त मीटींग असेल, किंवा गाणी ऐकायची असतील, एखादा चित्रपट पाहायचा असेल, तर लोक इअरफोनच्या माध्यमातून या सर्व गोष्टी करतात, अशात गेल्या काही वर्षांत इअरफोन्सचा ट्रेंड खूप वाढला आहे. आता लोकांनी वायर्ड इअरफोन्सऐवजी पोर्टेबल इअरफोन वापरण्यास सुरुवात केली आहे, सध्याचे चित्र पाहता पोर्टेबल इअरफोन आता अनेकांच्या खिशात सापडतात. लोक वायर्ड इअरफोन्सऐवजी पोर्टेबल इअरफोनचा वापर करणे पसंत करतात. हे इअरफोन वापरण्यास अतिशय सोपे आहेत, परंतु काही पॅरामीटर्सवर ते हानिकारक देखील असू शकतात. या स्मार्ट इयरफोन्समध्ये कानाच्या समस्या उद्भवल्याचं समोर आलं आहे, ज्यात कानाचे नुकसान किंवा कानाचा पडदा खराब होण्यापासून काही लोकांसाठी डोकेदुखीपर्यंत असं नुकसान होताना दिसत आहे.
खरंच कानात इअरफोन फुटू शकतात का?
तुर्कीमधून एक प्रकरण समोर आले होते, ज्यामध्ये एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीबाबत घडलेल्या घटनेबद्दल सांगितले होते, एका ब्लूटूथ इयरफोनचा तिच्या कानात स्फोट झाला होता, त्यानंतर तिला बहिरेपणाचा सामना करावा लागला होता. खरं पाहायला गेलं तर, याविषयी कोणतेही संशोधन किंवा तपास समोर आलेला नाही, परंतु काही अहवालांनुसार, असे मानले जाते की मोठ्या आवाजात संगीत ऐकल्याने किंवा हे इअरफोन जास्त वेळ लावल्याने कानाचे पडदे फाटू शकतात. कानाच्या संरक्षणात आणि श्रवणशक्तीमध्ये कानाचा पडदा महत्त्वाची भूमिका बजावते. कानाचा पडदा बाह्य आणि मध्य कानाच्या दरम्यान असतो. कानाचा पडदा आपल्या कानांना संसर्गापासून वाचवतो. डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार, इयरफोनच्या अतिवापरामुळे जगभरातील सुमारे 100 कोटी लोकांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, ज्यामध्ये बहुसंख्य तरुण आहेत.
जास्त वेळ इअरफोन घालण्याचे तोटे
सतत इअरफोन वापरल्याने बहिरेपणा येऊ शकतो.
इअरफोनमुळे हृदयाचे ठोकेही वाढू शकतात, त्यामुळे हृदयविकारही वाढू शकतात.
जास्त वेळ इअरफोन लावल्याने डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.
काही लोकांना इअरफोन घातल्यामुळे झोपेचा त्रास होऊ शकतो.
दिवसभर कानात इअरफोन ठेवल्याने संसर्ग होऊ शकतो.
इअरफोन जपून वापरा..!
सर्वप्रथम, इअरफोन खरेदी करताना ते चांगल्या ब्रँडचे असावेत हे लक्षात ठेवा.
कमी आवाजात गाणी ऐका.
60 मिनिटे गाणे ऐकल्यानंतर ब्रेक घ्या.
इअरफोन नियमितपणे स्वच्छ करा.
हेही वाचा>>>
Child Health: मुलांना चिप्स, कोल्ड्रिंक्स देताना सावधान! आरोग्यावर दुष्परिणाम, दात होतायत कमकुवत, संशोधनातून समोर
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )