Child Health: मुलांना चिप्स, कोल्ड्रिंक्स देताना सावधान! आरोग्यावर दुष्परिणाम, दात होतायत कमकुवत, संशोधनातून समोर
Child Health: चिप्स आणि सॉफ्ट ड्रिंक्ससारखे पदार्थ लहान मुलांवर घातक परिणाम करत आहेत. नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार माहिती समोर आलीय. जाणून घ्या...
Child Health: प्रत्येक पालक आपल्या मुलांचे लाड करतात, त्यांना हव्या त्या गोष्टी देण्याच्या प्रयत्न करतात. पण मुलांचे काही हट्ट असे असतात, जे त्यांच्या आरोग्यासाठी तसेच भविष्यासाठी चांगले मानले जात नाहीत. तरीसुद्धा प्रेमापोटी पालक आपल्या मुलांचे नको असलेले हट्ट पुरवतात. सध्या मुलांच्या खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयींमुळे त्यांना आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण होत असल्याचं दिसून येतंय. खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे मुलांचे दातही खराब होत आहेत. कोल्ड्रिंक्स आणि चिप्स यांसारख्या गोष्टी मुलांच्या आवडीच्या जरी असल्या तरी मुलांना या गोष्टींपासून दूर ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. नुकत्याच झालेल्या एका संशोधनाने पुष्टी केली आहे की, या गोष्टींचे जास्त सेवन केल्याने मुलांच्या दातांच्या इनॅमलवर परिणाम होतो आणि ते कमकुवत होतात. याचे मुख्य कारण म्हणजे सोडा आणि ऍसिड यासारख्या हानिकारक गोष्टी या पदार्थांमध्ये असतात. संशोधनाबद्दल सर्व काही जाणून घ्या.
संशोधन कुठे झाले आहे?
हे संशोधन हार्वर्ड स्कूल ऑफ डेंटल मेडिसिनने केले आहे, जिथे त्यांनी इनॅमलवर संशोधन केले आणि आढळले की व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे दात कमकुवत होतात. शरीरात व्हिटॅमिन डी कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे कोल्ड्रिंक्स आणि चिप्सचे वाढते सेवन.
कोल्ड्रिंक्स आणि चिप्सचा वापर वाढला
जगाच्या अनेक भागांमध्ये, विशेषत: शहरी भागात, शीतपेये आणि प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचा वापर अलीकडच्या काळात वाढला आहे. मुले या गोष्टींकडे थेट आकर्षित होतात. खरे तर याचे कारण रंगीत पॅकेजिंग, चव आणि परवडणाऱ्या किमती. कोल्ड ड्रिंक्स, सोडा, एनर्जी ड्रिंक्स आणि फ्लेवर्ड वॉटर सहसा साखर आणि ऍसिडने भरलेले असतात. त्याचप्रमाणे, चिप्स - ज्यामध्ये स्टार्च आणि मीठ जास्त असते, ज्यामुळे मुलांच्या दातांना हानी पोहोचवते.
दात किडण्याची इतर कारणे कोणती?
संशोधनात असे आढळून आले आहे की गर्भधारणेदरम्यान गुणसुत्रे आणि पोषणाचा अभाव हे देखील दात किडण्याचे कारण असू शकते. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, जर पालकांनाही दातांचा त्रास होत असेल तर मुलांमध्ये असे होणे सामान्य आहे. त्याचबरोबर गरोदरपणात आईला पुरेसे पोषण न मिळाल्याने पोटात वाढणाऱ्या बाळाचे दात खराब होऊ शकतात. याव्यतिरिक्त, मुलांमध्ये सध्या मधुमेह एक गंभीर समस्या बनत चाललीय, हे देखील दात कमकुवत होण्याचे एक कारण असू शकते.
हेही वाचा>>>
Child Health : पालकांनो.. सुट्टीत मुलांना टीव्ही, मोबाईलपासून दूर ठेवायचंय? तर फक्त हे काम करा, जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )