Health : तुम्हालाही फोन आल्याचा सारखा भास होतो? तर सावधान! तुम्हाला Phantom Vibration Syndrome ची लक्षणं नाही ना?
Health : फोनमुळे अनेक गोष्टी सोप्या तर झाल्याच आहेत, मात्र अनेक लोकांना व्यसनही जडले आहे. यामुळे लोकांमध्ये फँटम व्हायब्रेशन सिंड्रोमची (Phantom Vibration Syndrome) लक्षणे दिसून येत आहेत. जाणून घ्या
Health : बदलत्या काळानुसार स्मार्टफोनचा वापर वाढला आहे, आजकाल फोनशिवाय आयुष्याची कल्पनाही करता येत नाही. कारण आता फोनच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या आहेत. फोनच्या माध्यमातून कॉलसोबतच जेवण ऑर्डर करणे, तिकीट बुक करणे, पेमेंट करणे अशा गोष्टींचा समावेश आहे, पण तुम्हाला माहित आहे का? याच फोनमुळे अनेक लोकांना व्यसनही जडले आहे. या व्यसनामुळे लोकांमध्ये फँटम व्हायब्रेशन सिंड्रोमची (Phantom Vibration Syndrome) लक्षणे दिसून येत आहेत. काय आहे हा आजार?
फँटम व्हायब्रेशन सिंड्रोम? नेमका हा आजार काय आहे
आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, जेव्हा फॅन्टम व्हायब्रेशन सिंड्रोम होतो, तेव्हा एखाद्या व्यक्तीला असे वाटते की त्याचा फोन किंवा इतर कोणतेही गॅझेट सतत व्हायब्रेट (Vibrate) होत आहे, परंतु प्रत्यक्षात पाहिल्यास तसेच घडतच नाही, कोणताही कॉल किंवा संदेश अजिबात येत नाही. हे सिंड्रोम बहुतेकदा अशा लोकांमध्ये आढळते जे फोन किंवा इतर गॅझेट जास्त वापरतात. या अवस्थेला "सिंड्रोम" म्हटले जात असले तरी, हा एक वैद्यकीय रोग नाही, ही फक्त एक गोंधळात टाकणारी भावना आहे, जी बऱ्याच लोकांना असते. याबाबत एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार दिल्लीतील न्यूरोलॉजी सल्लागार डॉ. अपूर्व शर्मा यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या..
फँटम व्हायब्रेशन सिंड्रोम का होतो?
फँटम व्हायब्रेशन सिंड्रोम अनेक कारणांमुळे होऊ शकतो, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत-
सवय
आपल्या मेंदूला फोनवरून मिळणाऱ्या सूचना आणि कंपनांची म्हणजेच (Vibration) सवय होते. मेंदू त्यांची अपेक्षा करायला शिकतो आणि काहीवेळा इतर संवेदनांना आपण प्रतिक्रिया देऊ लागतो.
व्यसन एक चिंता
सतत ऑनलाइन राहणे हे व्यसनच आहे. हे व्यसन एक चिंता बनते आणि आपल्या संवेदना कंपनांच्या (Vibration) दिशेने सेट करते, जेव्हा आपण एखाद्या महत्त्वाच्या कॉल किंवा संदेशाची वाट पाहत असतो.
संशोधनात काय म्हटलंय?
संशोधनातून असे समोर आले आहे की, मोबाईल फोनचा जास्त वापर करणाऱ्यांपैकी 89% लोकांना कधीतरी फँटम व्हायब्रेशन सिंड्रोमचा त्रास होतो.
फँटम कंपन सिंड्रोमचे तोटे
फँटम व्हायब्रेशन सिंड्रोमपासून कोणतेही नुकसान नाही, परंतु यामुळे अनेक समस्या उद्भवतात. जर तुम्हाला वारंवार कंपन जाणवत असेल, तर तुम्ही तुमच्या फोनसोबत खूप वेळ घालवत आहात हे स्पष्ट आहे. ज्यामुळे तणाव आणि चिंता होऊ शकते. फोनचे व्यसन शारीरिकदृष्ट्या देखील हानिकारक आहे. दिवसभर बसून फोन वापरणे तुम्हाला लठ्ठपणा आणि मधुमेहासारख्या अनेक आजारांना बळी पडू शकते.
फँटम व्हायब्रेशन सिंड्रोम कसे नियंत्रित करावे?
फोनवर कमी वेळ घालवा
फोनपासून पूर्णपणे दूर राहणे शक्य नाही, परंतु त्याच्यासोबत कमी वेळ घालवणे पूर्णपणे शक्य आहे. संदेश आणि update तपासण्यासाठी वेळ सेट करा. यामुळे दिवसभर फोनमध्ये मग्न राहण्याची सवय हळूहळू कमी होईल.
Notification सेट करा
काम केल्यानंतर, फोन कंपन किंवा सायलेंट मोडमध्ये ठेवा. तुमच्या फोनवर वेगवेगळ्या ॲप्ससाठी कस्टमाइज्ड नोटिफिकेशन सेट करा.
विश्रांती घ्या
गरज नसताना फोन थोडा वेळ बाजूला ठेवा. अशा गोष्टी करा, ज्यातून तुम्हाला मन:शांती मिळेल, जसे की पुस्तक वाचा, फिरायला जा किंवा मित्रांना भेटा.
ध्यान करा
मन शांत करण्यासाठी ध्यान करा. ध्यान केल्याने केवळ चिंता आणि तणावासारख्या समस्या दूर होत नाहीत, तर फोकस आणि स्मरणशक्ती देखील वाढते.
फोनपासून दूर रहा
शक्य असल्यास, खिशाच्या ऐवजी तुमचा फोन तुमच्या बॅगमध्ये किंवा डेस्कमध्ये ठेवा. यामुळे फोन व्हायब्रेशन किंवा नोटिफिकेशनबाबत कोणताही गोंधळ होणार नाही.
...तर डॉक्टरांचा सल्ला घ्या
फोनच्या व्यसनामुळे आणि या सिंड्रोममुळे तुमचे दैनंदिन जीवन प्रभावित होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टर या लक्षणांवर आधारित उपचार, थेरपी किंवा जे काही शक्य असेल ते सुचवू शकतात आणि ही समस्या लवकरात लवकर बरी होण्यास मदत करू शकतात. फँटम व्हायब्रेशन सिंड्रोम का होतो आणि फोन कसा वापरावा याबद्दल जागरूकता वाढवून फँटम व्हायब्रेशन सिंड्रोमची लक्षणे सहजपणे कमी करता येतात. हे लक्षात ठेवा की कनेक्टिव्हिटी आणि फोनपासून दूर राहणे यामधील संतुलन निरोगी मन आणि निरोगी शरीरासाठी खूप महत्वाचे आहे.
हेही वाचा>>>
Health : सावधान! कर्करोगाचा धोका दुप्पट करतात 'या' 3 गोष्टी, आजच त्यांच्यापासून दूर राहा, जाणून घ्या..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )