(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health : सावधान! कर्करोगाचा धोका दुप्पट करतात 'या' 3 गोष्टी, आजच त्यांच्यापासून दूर राहा, जाणून घ्या..
Health : कर्करोग अनेक कारणांमुळे लोकांना त्याचा बळी बनवतो. मात्र अशी 3 कारणे आहेत जी या गंभीर आजाराचा धोका दुप्पट करतात.
Health : कर्करोग म्हटला तर अनेकांच्या अंगावर काटा येतो. कारण हा एक असा गंभीर आजार आहे, जो जगभरातील अनेक लोकांना प्रभावित करतो. याच कर्करोगामुळे दरवर्षी अनेकांना जीव गमवावा लागतो. कर्करोग अनेक कारणांमुळे होऊ शकतो. मात्र अशी 3 कारणं आहेत, जी या गंभीर आजाराचा धोका दुप्पट करतात. कर्करोग टाळण्यासाठी काही आवश्यक खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जाणून घेऊया कोणत्या आहेत या 3 गोष्टी..
कर्करोगाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ
कर्करोग हा एक जीवघेणा आजार आहे, ज्याचा अचूक आणि हमीदार यशस्वी उपचार हा अजूनही संशोधनाचा मुद्दा आहे. पाहायला गेलं तर अलीकडे कर्करोगाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. कर्करोगाची सुरूवात ही शरीराच्या एका भागापासून सुरू होऊन संपूर्ण शरीरात पसरू शकते, ज्यामुळे त्यास प्रतिबंध करणे कठीण होते. कर्करोगाची अनेक कारणे असू शकतात, ज्यामध्ये खराब जीवनशैली, जंक आणि प्रक्रिया केलेले अन्न, प्लास्टिकचा वापर, कमी शारीरिक हालचाल, ताणतणाव, कॉस्मेटिकचा वापर, कीटकनाशक, अनुवांशिक, धूम्रपान, मद्यपान इत्यादींचा समावेश होतो. प्रामुख्याने तीन मुख्य गोष्टी आहेत, ज्यामुळे कर्करोगाचा धोका दुप्पट होतो. या तीन गोष्टींबद्दल जाणून घेऊया-
प्लास्टिक
प्लॅस्टिकमध्ये असलेले बीपीए (BPA), मायक्रोप्लास्टिक, बिस्फेनॉल, फॅथलेट यांसारखे पदार्थ कर्करोगाला आमंत्रण देतात. हे सर्व व्यत्यय आणणारी रसायने मानले जातात, जे शरीरातील हार्मोन्समध्ये व्यत्यय आणतात आणि स्तनाच्या कर्करोगासारख्या कर्करोगाचा धोका वाढवतात. त्याऐवजी काचेच्या वस्तू निवडा प्लास्टिकची भांडी किंवा प्लास्टिकच्या बाटल्या वापरू नका. अन्न प्लास्टिकमध्ये पॅक करू नका आणि डिस्पोजेबल प्लास्टिकची भांडी वापरू नका.
कीटकनाशक
कीटकनाशकांसह काम करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये प्रोस्टेट कर्करोगाचा धोका वाढतो, त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या महिलांमध्ये गर्भाशयाच्या आणि मूत्राशयाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. कीटकनाशके असलेल्या भाज्या आणि फळे देखील कर्करोगास कारणीभूत ठरू शकतात, त्यामुळे नेहमी भाज्या किंवा फळे नीट धुवून खावीत.
वजनदार धातू
आर्सेनिक, कॅडमियम, क्रोमियम, निकेल यासारखे जड धातू मुख्य कार्सिनोजेन्समध्ये आहेत, जे शरीरातील डीएनएशी छेडछाड करतात, कर्करोगाच्या पेशी तसेच त्यांच्या मेटास्टेसिसच्या प्रक्रियेस प्रोत्साहन देतात, ज्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता वाढते तसेच ती पसरते. त्यामुळे त्वचेचा कर्करोग आणि जठरासंबंधी कर्करोग होण्याची शक्यता वाढते. पालक, तांदूळ, फळांचा रस, मासे इत्यादी वजनदार मेटलयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खाणे टाळावे.
हेही वाचा>>>
Women Health : महिलांनो...घरातील जबाबदाऱ्या, काम ठेवा बाजूला! आधी हृदयविकाराच्या झटक्याची 'ही' लक्षणं वेळीच ओळखा.. डॉक्टर म्हणतात...
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )