एक्स्प्लोर

निरोगी भारताकडे वाटचाल : आरोग्य विमा हा खऱ्या स्वातंत्र्याचा मार्ग

Health insurance : निरोगी भारताकडे वाटचाल : आरोग्य विमा हा खऱ्या स्वातंत्र्याचा मार्ग

Health insurance : भारताचा 79 वा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. आनंदसोहळा आणि आत्मचिंतन या दोन्हींच्या पातळीवर हा एक गंभीर आणि मोलाचा क्षण आहे. आपण कष्टाने मिळवलेल्या या स्वातंत्र्याचा विचार करायला हवा आणि वैयक्तिक सबलीकरणाच्या दिशेने पावले उचलायला हवीत, असा संकल्प करण्याचा हा दिवस आहे. या सबलीकरणामध्ये सर्व नागरिकांसाठी चांगले आरोग्य आणि आर्थिक सुरक्षितता यांचा समावेश होतो. खरे तर, जिथे प्रत्येक नागरिक सन्मानाने जगतो आणि त्याच्या आरोग्याची व कल्याणाची हमी असते, तेच
खरे स्वातंत्र्य! या संदर्भात, आरोग्यविमा हा एक महत्त्वाचा आधारस्तंभ ठरतो. तो लाखो लोकांना उत्कृष्ट आरोग्यसेवा मिळवण्याची, आपली आर्थिक उद्दिष्टे सुरक्षित ठेवण्याची आणि निरोगी जीवन जगण्याची संधी देतो.

खरे पाहता, आरोग्यविमा हा आपल्या आकांक्षा आणि गरजा यांच्यातील दुवा आहे. तो विमाधारकांवर मोठा आर्थिक भार न येऊ देता त्यांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देतो. तो दीर्घकालीन आरोग्यसंपन्नतेस प्रोत्साहन देतो आणि आरोग्याशी निगडित आपत्कालीन परिस्थितींविरुद्ध संरक्षण पुरवतो.

गेल्या काही वर्षांत जगभरात आणि विशेषतः भारतात वैद्यकीय उपचारांचा खर्च सतत वाढत चालला आहे,हे लक्षात घेतले तर आरोग्यविम्याचे महत्त्व अधिकच पटते. भारतातील वैद्यकीय महागाई सध्या 13 टक्क्यांवर गेली आहे. जागतिक सरासरीपेक्षा ती खूपच जास्त आहे. या वेगाने वाढलेल्या खर्चासोबतच, प्राणघातक आजारांचे वारंवार उद्रेक होणे आणि आरोग्याच्या आपत्कालीन परिस्थिती अचानक उद्भवणे,यांमुळे आपल्या आर्थिक स्थैर्याला, तसेच देशाच्या एकूणच आर्थिक आरोग्यास धक्का पोहोचू शकतो. जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून भारत उभा राहत असताना आणि 2047 पर्यंत विकसित राष्ट्रांच्या गटात सामील होण्याच्या दिशेने तो वाटचाल करत असताना, नागरिकांच्या आरोग्यात गुंतवणूक होणे आणि त्यांना आर्थिक संरक्षण मिळणे ही अत्यावश्यक बाब ठरते.

विविध आव्हानांचा सामना

आरोग्य क्षेत्रात भारत अनेक समस्यांना सामोरे जात आहे. संसर्गजन्य रोग आणि त्यांचा झपाट्याने पसरण्याचा धोका ही देशातील मोठी चिंतेची बाब आहे. त्याचबरोबर, टाइप-टू मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार असे चुकीच्या जीवनशैलीमुळे उद्भवणारे आजार शहरी भारतात विशेषकरून वाढले आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) 2020 मध्ये केलेल्या एका अभ्यासानुसार, भारतातील एकूण मृत्यूंपैकी 65 टक्क्यांपेक्षा जास्त मृत्यू असंसर्गजन्य रोगांमुळे होतात. दरवर्षी सुमारे 58
लाख भारतीय या असंसर्गजन्य रोगांमुळे मृत्युमुखी पडतात आणि त्यापेक्षा जास्तजणांना या रोगांचा धोका असतो, असे वेगवेगळ्या अहवालांमधून दिसून आले आहे. याशिवाय, आपल्या लोकसंख्येमध्ये वृद्धांची संख्या वाढत आहे. सन 2050 पर्यंत देशातील 60 वर्षांवरील लोकसंख्या 31.9 कोटी होण्याचा अंदाज आहे. या ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजांसाठी जास्तीच्या उपाययोजना आणि नवकल्पनांची गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे.

या बदलांशी सुसंगत राहून आरोग्यविमा क्षेत्र प्रगती करीत आहे. आजच्या नव्या पिढीच्या पॉलिसींमध्ये केवळ खर्चाचा परतावा मिळण्यापलीकडेही अनेक सुविधा मिळू लागल्या आहेत. यांमध्ये रोगनिदानाविषयीचे विस्तृत सहाय्य, प्रतिबंधात्मक तपासण्या, आरोग्य संवर्धनाचे उपक्रम, मानसिक आरोग्य सेवा यांचा समावेश आहे. त्याचबरोबर, ‘सुपर टॉप-अप’सारख्या नवकल्पनांमुळे गंभीर आजारांसाठी अतिरिक्त संरक्षण देणारे रायडर्स घेऊन आपले विमाकवच वाढवण्याची संधीही मिळते. आरोग्याच्या मोजमापांचे अॅप-आधारित ट्रॅकिंग, आहाराचा सल्ला आणि आरोग्यदायी सवयींसाठी बक्षिसे अशा नव्या सुविधा उपलब्ध होत आहेत. केवळ आजारावर उपचार करण्याऐवजी आता प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेकडे मोठा कल दिसून येऊ लागला आहे.

आर्थिक सुरक्षिततेचा आधारस्तंभ म्हणून विमा

या सर्व गोष्टींचा अर्थ असा की आरोग्यविमा ही एक अत्यावश्यक गरज झाली आहे. विमा नसल्यास रुग्णालयात भरती होणे किंवा दीर्घकालीन उपचार मिळवणे याचा खर्च कुटुंबांना आर्थिक अडचणीत आणू शकतो. नेमक्या आणि व्यवस्थित आखलेल्या आरोग्यविमा योजनेत कॅशलेस सुविधा, रुग्णालयांच्या व्यापक नेटवर्कची उपलब्धता, मोफत वार्षिक आरोग्य तपासण्या यांसारखे लाभ मिळतात. त्यातून विमाधारक उपचारांवर लक्ष केंद्रित करू शकतात आणि कुटुंबे आपली बचत इतर उद्दिष्टांसाठी वापरू शकतात. व्यापक
प्रमाणातील आरोग्यकवच घेतल्यास आर्थिक स्थैर्य वाढते, तसेच क्रयशक्ती आणि उत्पादकता सुधारते. एकूणच आर्थिक कल्याणास चालना मिळते.

आयुष्मान भारत योजनेसारख्या कार्यक्रमांद्वारे वंचित समुदायांपर्यंत विमाकवच पोहोचवून आपल्या देशाने योग्य दिशेने पाऊल टाकले आहे. विमासंरक्षण पुरेसे असलेली लोकसंख्या ही सार्वजनिक आरोग्यसेवेवरील ताण कमी करते आणि आर्थिक विकासाला वेग देते.

स्वातंत्र्यदिन हा स्वतःचे भविष्य घडवण्याच्या सामूहिक इच्छाशक्तीचा उत्सव आहे. आपण सर्वांनी आपले आरोग्यविम्याचे कवच तपासावे, कुटुंबाचा खर्च व महागाई लक्षात घ्यावी, गंभीर आजारांसाठी रायडर्स घ्यावेत आणि टॉप-अप योजना खरेदी कराव्यात. स्वातंत्र्याचा सर्वात खरा अर्थ म्हणजे भीतीविना जगणे आणि विमा आपल्या पाठीशी भक्कम उभा आहे याची खात्री असणे. आपण अभिमानाने राष्ट्रध्वज फडकवतो आणि राष्ट्रगीत गातो. आता प्रत्येक नागरिक निरोगी आणि सन्मानाने जगेल असा भारत घडवण्याची शपथ घेऊ या. खरे स्वातंत्र्य म्हणजे भीतीविना जीवन! चला, आपण सर्व मिळून अधिक निरोगी भारत घडवूया!

लेखक : Mr. Udayan Joshi, Chief Operating Officer, SBI General Insurance

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Hidayat Patel : राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Hidayat Patel : राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Embed widget