एक्स्प्लोर

Tulsi Turmeric Tea Benefits : तुळशीच्या चहात फक्त चिमुटभर हळद घाला; सर्दी, खोकल्यासोबच अनेक समस्या होतील झटपट दूर!

Health Benifits Of Tulsi Turmeric Tea: अनेकदा घरगुती उपायांनीही तुमच्या आरोग्याच्या समस्या दूर होऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला एका खास चहाबाबत सांगणार आहोत. हा चहा तुमच्या आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो.

Tulsi Turmeric Tea Benefits : धकाधकीची जीवनशैली (Stressful Lifestyle) आणि चुकीची आहारपद्धती (Wrong Diet) यांमुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. दरवेळी आरोग्याच्या (Health Tips) समस्यांवर उपाय म्हणून बाजारातील औषधं फायदेशीर ठरतीलच असं नाही. अनेकदा घरगुती उपायांनीही तुमच्या आरोग्याच्या समस्या दूर होऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला एका खास चहाबाबत सांगणार आहोत. हा चहा तुमच्या आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. तुळस (Tulsi Benefits) आणि हळदीपासून (Turmeric Benefits) बनवलेल्या चहाचं सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं. यामुळे अनेक प्रकारच्या समस्या कमी होऊ शकतात. चला जाणून घेऊयात, ही खास रेसिपी (Benefits of Drinking Basil and Turmeric Tea) आणि फायदे काय आहेत?

तुळशीच्या हळदीच्या चहाचे फायदे (Tulsi Turmeric Tea Benefits) 

बदलत्या हवामानात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. या समस्यांपैकी सर्दी-खोकला ही समस्या सर्वात प्रमुख आहे. सर्दीमागे अनेक विषाणूजन्य आणि जीवाणूजन्य कारणं असू शकतात. आजकाल तुम्हाला सर्दी-खोकल्याचा त्रास होत असेल, तर घाबरू नका. आज आम्ही तुम्हाला अशा चहाची रेसिपी सांगणार आहोत, ज्यामुळे सर्दी-खोकल्याच्या समस्येपासून आराम मिळेल. ते तयार करणं खूप सोपं आहे. यासाठी तुळशीच्या चहामध्ये चिमूटभर हळद मिसळावी लागेल. यानं शरीराला अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकतं. चला जाणून घेऊया, तुळस आणि हळदीपासून बनवलेल्या चहाचं सेवन करण्याचे फायदे आणि त्याची रेसिपी सविस्तर... 

रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी (Immune System)

तुळस आणि हळद आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. तुळस आणि हळदीतील पोषक तत्व आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी ठरतात. यामध्ये अँटी-फंगल, अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. हे गुणधर्म इन्फेक्शन आणि आजारांपासून दूर ठेवण्यासाठी मदत करतात. 

हृदयाचं आरोग्य सुधारतं (Improves Heart Health)

हृदयाशी संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी तुळस आणि हळदीपासून बनवलेल्या चहाचं सेवन करा. तुळस आणि हळद यांचं मिश्रण शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतं. शिवाय, ते रक्ताभिसरण देखील वाढवू शकतं. जर तुम्हाला हृदयाचं आरोग्य सुधारायचं असेल, तर तुळस आणि हळदीचा चहा अवश्य घ्या.

डोकेदुखीपासून आराम (Relief From Headache)

सर्दी-खोकल्यामुळे खूप डोकेदुखी होते. अशा परिस्थितीत तुळशीच्या चहामध्ये चिमूटभर हळद टाकून प्या. यामुळे तुमची डोकेदुखी कमी होते. यामुळे तणाव आणि चिंता देखील कमी होऊ शकते.

किडनी स्टोनवर उपचार (Kidney Stone Treatment)

किडनी स्टोनचा त्रास असलेल्या रुग्णांसाठीही तुळस आणि हळदीपासून बनवलेल्या चहाचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. हे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल विकारांपासून मुक्त होण्यास देखील मदत करतात. तसेच, लघवीद्वारे किडनी स्टोन बाहेर टाकू शकतात.

कसा तयार कराल तुळस आणि हळदीचा चहा? (Recipe Of Tulsi And Turmeric Tea)

तुळस आणि हळदीपासून बनवलेल्या चहाचं सेवन करण्यासाठी सर्वात आधी 1 कप पाणी घ्या, त्यात 10 ते 15 तुळशीची पानं घाला आणि नंतर सुमारे 2 ते 3 मिनिटं उकळा. यानंतर त्यात चिमूटभर हळद घाला किंवा 1 इंच कच्ची हळद किसून घाला. हा खास चहा प्यायल्यानं डोकेदुखी, खोकला आणि सर्दी या समस्या दूर राहतात.

(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

पीरियड्समध्ये पेनकिलर खाव्यात की नाही? जाणून घ्या, फायदे अन् तोटे!

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Maharashtra Drought Special Report : एक एक थेंब पाण्यासाठी वणवण, राज्यभरातील शेतकऱ्यांची भीषण अवस्थाABP Majha Headlines : 10 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAmey Khopkar MNS: Damodar Natyagruha आहे त्या जागेवर पुन्हा बांधा, अन्यथा रस्त्यावर उतरूAkole SDRF Boat Accident : प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट उलटली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
Embed widget