अवघ्या काही मिनिटांत तयार करा रेस्टॉरंटसारखा चविष्ट गाजराचा हलवा, झटपट होईल फस्त!
Tasty Gajar Halwa Recipe: रेस्टॉरंट सारखा चविष्ट गाजर हलवा काही मिनिटांत तयार होईल, रेसिपी एकदा नक्की करून पाहा, गाजरात अनेक प्रकारची जीवनसत्त्व आणि खनिजं आढळतात, जे शरीरासाठी खूप उपयुक्त असतात आणि शरीरात अशक्तपणा निर्माण करतात.
Gajar Halwa Recipe: सध्या बाजारात लालेलाल गाजरं (Health Benefits Of Carrot) दिसायला लागली आहेत. तसेच, हंगाम सुरू असल्यामुळे बाजारात अगदी सहज, ताजी गाजरं (Carrot Benefit) अगदी स्वस्तात मिळत आहेत. गाजरं स्वस्त झाल्यामुळे घराघरात गाजर हलव्याचा बेत आखला जात आहे. गाजराचा हलवा जेवढा टेस्टी आणि हेल्दी असतो, तेवढाच वेळखाऊही असतो. त्यामुळे अनेकजण गाजराचा हलवा करणं टाळतात. तुम्हीही त्यापैकीच एक असाल तर आज तुमच्यासाठी अगदी सजह सोपी आणि झटपट होणारी गाजर हलव्याची रेसिपी सांगणार आहोत.
रेस्टॉरंट सारखा चविष्ट गाजर हलवा काही मिनिटांत तयार होईल, रेसिपी एकदा नक्की करून पाहा, गाजरात अनेक प्रकारची जीवनसत्त्व आणि खनिजं आढळतात, जे शरीरासाठी खूप उपयुक्त असतात आणि शरीरात अशक्तपणा निर्माण करतात. गाजर हलवा तयार करण्याआधी काही गोष्टी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर तुमच्या गाजर हलव्याची चव खराब होऊ शकते. जाणून घेऊयात... रेस्टॉरंटसारखा चविष्ट गाजर हलवा तयार करण्याची रेसिपी...
थंडीत घराघरात हमखास बनवला जाणारा एक गोडाचा पदार्थ म्हणजे, गाजर हलवा. गाजराचा हलवा हा थंडीच्या दिवसात बनवला जाणारा एक खास प्रकारचा हलवा आहे जो प्रत्येक घरात बनवला जातो. अनेकांना गाजर हलवा खूप आवडतो, कारण गाजरचा हलवा हा चविष्ठ असतोच, त्यासोबतच तो शरीरासाठी फायदेशीर ठरतो.
रेस्टॉरंटसारखा गाजर हलवा झटपट तयार करण्यासाठी 'ही' रेसिपी ट्राय करा
साहित्य :
- गाजर
- साखर
- मेवा
- दूध
- काजू, मनुके
- पिस्ता बादाम
गाजर हलवा तयार करण्याची कृती :
- सर्वात आधी गाजरांची साल काढून ते स्वच्छ धुवून घ्या.
- त्यानंतर गाजर किसून एका भांड्यात ठेवा.
- एका कढईत तूप गरम करा, त्यामध्ये किसलेलं गाजर टाका आणि काही वेळ शिजवून घ्या.
- त्यानंतर त्यामध्ये साखर, दूध एकत्र करा. साखर, दूध घातल्यानंतर सर्व मिश्रण एकजीव करा.
- सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर मंद आचेवर काही वेळासाठी शिजू द्या.
- मिश्रण काहीवेळ शिजल्यानंतर त्यात काजू, मनुके, बदाम, पिस्ता एकत्र करा.
- चविष्ठ असा गाजर हलवा खाण्यासाठी तयार आहे.
गाजराचे फायदे काय?
- गाजरानं पचनशक्ती सुधारतं.
- गाजरात बिटा कॅरेटिन असतं, ते कॅन्सरला प्रतिबंधक ठरतं.
- गाजर कच्चं खावं, त्यानं जास्त फायदा होतो.
- गाजरामुळे वजन वाढत नाही, त्यामुळे तुम्ही रोज एक गाजर बिनधास्त खाऊ शकता.
- गाजरापेक्षा गाजराच्या पानांमध्ये आयर्न असतं, त्यानं अॅनिमिया दूर होतो.
- थंडीत गाजराचं सेवन केल्यानं शरीरात उब राहते.
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )