Ayurveda : सावधान! 'फ्रूट शेक' आरोग्यासाठी हानिकारक, आयुर्वेद काय सांगत? वाचा सविस्तर
Fruit Shake Effect On Health : आरोग्यासाठी फ्रूट शेक फायदेशीर मानले जातात. याचं सेवन कधी नाश्ता म्हणून तर कधी गरमीपासून आराम म्हणून केला जातो. पण हे फ्रूट शेक तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकतात.
Ayurvedic Health Tips : आजकाल अनेक जण त्यांच्या आहारत फ्रूट शेकचा (Fruit Shake) समावेश करताना दिसतात. फळांचा रस आणि दूध मिळून तयार करण्यात येणाऱ्या पेयाला (Drink) 'फ्रूट शेक' (Fruit Shake) म्हणतात. फ्रूट शेक आरोग्यासाठी फायदेशीर समजले जातात. पण आयुर्वेदानुसार फ्रूट शेक तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत. यामध्ये विशेषत: बनाना शेक आणि मँगो शेकचा समावेश आहे. लहान मुलांच्या आहारातही या फ्रूट शेकचा समावेश केला जातो. मात्र हे फ्रूट शेक तुमच्या आणि तुमच्या मुलांच्याही आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतात.
आयुर्वेदानुसार फ्रूट शेक तुमच्या शरीरासाठी का हानिकारक आहे. तसेच आयुर्वेदानुसार फळं आणि दुधाचं सेवन करण्याची योग्य पद्धत काय आहे जाणून घ्या.
आयुर्वेदानुसार फळं आणि दुधाचं मिश्रण चुकीचं
- आयुर्वेदामध्ये सांगण्यात आलं आहे की, फळं आणि दुधाचं एकत्र सेवन करण्याला प्रतिबंध आहे. यामागचं कारण म्हणजे फळं आणि दूध यांचे गुणधर्म एकमेकांविरोधी आहेत. यामुळे या दोन्हीचं एकत्र सेवन केल्यास पचनावर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे पोट दुखी किंवा इतर समस्या उद्भवू शकतात.
- आयुर्वेदानुसार सर्व फळांमध्ये कमी-अधिक प्रमाणात सायट्रिक अॅसिड असते. हे ॲसिडमुळे दूध पाडण्याचं काम करतं. यासोबतच फळांमध्ये इतर अॅसिड्सही असतात, जे दुधासोबत मिसळल्याने शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसान पोहोचतं. याशिवाय फळांमध्येही अनेक रासायनिक घटक असतात, जे दुधात मिसळल्यानंतर पचनासाठी सोपे नसतात.
मँगो शेक का पिऊ नये?
मँगो शेक आणि बनाना शेक हे उन्हाळ्यात सर्वात जास्त आवडणारे पेय आहेत, अनेक जण उकाड्यापासून आराम मिळण्यासाठी हे फ्रूट शेक आरोग्यदायी पिणं फायदेशीर समजतात. आंब्यामध्ये आम्ल आणि सायट्रिक अॅसिड असते आणि केळ्यामध्येही असे अनेक रासायनिक घटक असतात, जे दुधात मिसळल्यास पचनक्रिया बिघडते.
दूध आणि फळांचं सेवन कसं करावं?
आयुर्वेदानुसार आंबा खाल्ल्यानंतर दूध प्यायल्याने आणि केळी खाल्यानंतर दूध प्यायल्यानं शरीर मजबूत होते. पण फळांसोबत दूध कधीही घेऊ नये आणि फळे खाल्ल्यानंतर लगेच दूध पिऊ नये. त्यापेक्षा कोणतेही फळ खाल्ल्यानंतर किमान एक ते दोन तासांनी दूध प्यावं. असे केल्यास तुम्हाला दूध आणि फळं या दोन्हीच्या गुणधर्माचा भरपूर फायदा होईल. या पद्धतीनं किमान एक महिना दूध आणि फळांचं सेवन करुन पाहा, तुम्हाला फरक स्पष्ट जाणवेल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips : पावसाळ्यात संधिवातच्या समस्येपासून सुटका हवीय? या गोष्टींची काळजी घ्या...
-
Blood Pressure Control : ब्लड प्रेशरच्या समस्येवर सैंधव मीठ गुणकारी, रक्तदाब राहील नियंत्रणात
-
Day Nap : दिवसा झोपल्यानं होईल नुकसान, आयुर्वेदामध्ये काय सांगितलंय? वाचा...
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )