Frozen Vegetables VS Fresh Vegetables: फ्रोजन भाज्या की ताज्या भाज्या?...आरोग्यासाठी काय लाभदायक? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर
फ्रोझन भाज्यांपेक्षा ताज्या भाज्या खरोखरच जास्त पौष्टिक असतात का? बहुतेक जणांना पडणाऱ्या याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया तज्ज्ञांकडून.
Frozen Vegetables VS Fresh Vegetables: बहुतेक जणांना असे वाटते की बाजारातून विकत घेतलेल्या ताज्या भाज्या या फ्रोजन भाज्यांपेक्षा अधिक फायदेशीर असतात. बऱ्याचदा असाही समज असतो की, थंड तापमानात ठेवल्याने भाज्यांमधील पोषक तत्वे नष्ट होतात. तुम्हालाही असेच वाटत असेल तर तुम्ही ही बातमी शेवटपर्यंत वाचा. आता प्रश्न असा पडतो की फ्रोझन भाज्यांपेक्षा ताज्या भाज्या खरोखरच जास्त पौष्टिक असतात का? जाणून घेऊया...
नुकतेच, 'मसाला लॅब्स: द सायन्स ऑफ इंडियन कुकिंग'चे लेखक क्रिश अशोक यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करुन फ्रोजन भाज्या आणि ताज्या भाज्या यांच्यातला फरक सांगितला आहे. यावेळी त्यांनी फ्रोजन भाज्या खाल्याने आरोग्याला कोणतेही फायदे मिळत नाहीत, ही समज चुकीची सिद्ध केली आहे. ताज्या भाज्या भाजी मंडईत पोहोचण्यापूर्वी अनेक टप्प्यांतून जातात, त्यामुळे त्यांच्यावर जास्त जंतू बसण्याची शक्यता वाढत जाते. ताज्या भाज्या काहीवेळा वेळेआधीच खुडल्या जातात आणि बाजारात पोहोचेपर्यंत त्या अजून पिकतात किंवा तयार होतात. तर दुसरीकडे, फ्रोजन भाज्या या पूर्ण तयार झाल्यानंतरच काढून त्वरित गोठवल्या जातात. त्यामुळे त्यांच्यावर जंतू बसण्याची शक्यताही कमीच असते.
कोणती भाजी जास्त पौष्टिक आहे?
तुमची स्वतःची बाग असेल, जिथे तुम्ही स्वतः भाजीपाला पिकवता, तर नक्कीच ताज्या भाज्या फायदेशीर ठरतील. पण जर तुम्ही बाजारातून भाजीपाला आणत असाल तर ते तितकेसे फायदेशीर ठरणार नाही. कारण या भाज्या काही दिवस जुन्या असण्याचीही शक्यता आहे. मंडईत येणारा सर्वच भाजीपाला ताजाच असेल असे नाही. त्या भाज्या काही दिवसांच्या म्हणजेच शिळ्याही असू शकतात.
एका अहवालानुसार, ताजे कडधान्य काढल्यानंतर काही दिवसांतच बाजारात विकले जातात. फ्रोजन कडधान्य त्वरित गोठवली जातात, त्यामुळे तापमान आणि दीर्घकाळामुळे पौष्टिक तत्व नक्कीच प्रभावित होतात. तर बहुतांश वेळी, फ्रोजन भाज्यांची पौष्टिक तत्वही ताज्या भाज्यांसारखीच असतात. याचे कारण असे की थंड तापमान पोषक द्रव्ये टिकवून ठेवण्यास आणि खराब होण्यापासून वाचवण्यास मदत करते.
गोठवलेल्या भाज्या का चांगल्या?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अनेकवेळा गोठवलेल्या भाज्या ताज्या भाज्यांपेक्षा चांगला पर्याय ठरू शकतात. कारण गोठवलेल्या भाज्या योग्य प्रकारे तयार झाल्यावरच खुडल्या जातात आणि लगेच गोठवल्या जातात. तर दुसरीकडे ताज्या भाज्या योग्यपणे तयार होण्यापूर्वीच कापल्या जातात आणि त्यानंतर अनेक दिवसांनंतर भाजी मंडई किंवा बाजारात पोहोचतात. अशा परिस्थितीत या भाज्यांमध्ये पोषक तत्वांचा ऱ्हास होतो.
ही बातमी वाचा:
Helth Tips : निरोगी राहण्यासाठी 'या' पदार्थाचा आहारात करा समावेश
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )