Midnight Food Craving: तुम्हाला मध्यरात्री भूक लागतेय? मग हे चार पदार्थ नक्की ट्राय करा
तुम्हाला जर मध्यरात्री काही खायची सवय असेल, तर काही खायची इच्छा निर्माण झाली असेल, तर तुम्ही हे चार हेल्दी स्नॅक्स आवर्जून खायला हवं.
Midnight Food Craving: सध्याच्या बदलत्या लाईफस्टाईलमुळे व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे. अगदी, तुमच्या खाण्याच्या आणि झोपण्याच्या सवयीवर परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. यामागे अनेक कारणे असू शकतात. आपल्यातील बहुतेक माणसांना दिवसभरात कधीही भूक लागू शकते. पण काही लोकांना दिवस, दुपारी, सायंकाळी, रात्री आणि याशिवाय मध्यरात्री भूक लागते. हे आपल्यातील प्रत्येकांनी कधी ना कधी ना अनुभवलं असणार आहे. लोक मध्यरात्री भूक लागल्यानंतर आरोग्याला घातक अशा वेफर्स, स्नॅक्सकडे धाव घेतात. याचं कारण मध्यरात्री दुसरा पर्याय उपलब्ध नसतो. समोर जे दिसेल त्यावर भूक भागवली जाते. काही लोक मध्यरात्रीची भूक किंवा मिडनाईट क्रेविंग (Midnight Food Craving) दूर करण्यासाठी मॅग्गीसारखे झटपट पदार्थ बनवून खातात. यामुळे तुमची फक्त भूक भागत शकते. पण याचा तुमच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो.
तुम्हाला जर मध्यरात्री भूक लागली असेल तर तुम्ही हे चार हेल्दी स्नॅक्स आवर्जून खायला हवं. हे स्नॅक्स खाल्यामुळे तुमच्या आरोग्यावरही कोंंणताही परिणाम होणार नाही. एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये न्यूट्रिशनिस्ट लवनीत बत्रा यांनी मध्यरात्रीच्या भूकेची अर्थात, मिडनाईट क्रेविंगची इच्छा पूर्ण करण्यासाठी काही हेल्दी स्न्रॅक्सची माहिती दिली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...
जाणून घ्या चार हेल्दी स्न्रॅक्स
1. काजू, बदाम...
तुम्हाला मध्यरात्रीची भूक शांत करायची असेल, तर कुरकुरीत काजू, पिस्ता, अक्रोड आणि बदाम आवर्जून खायला हवं. हे खायला चवदार तर असतात आणि आरोग्यासाठी फायदेशीरही असतात. याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाही.
2. मखाणा
तुम्ही मखाण्याचे (Fox Nuts) आरोग्यदायी फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्ही सुद्धा तु्मच्या आहारात मखाणा किंवा फॉक्स नटचा समावेश करा. यामुळे तुमची मिडनाईट क्रेविंगची लालसा दूर करण्यासाठी चांगला आणि आरोग्यदायी पर्याय ठरू शकतो. मखाणा खायला एकदम हलके आणि कुरकुरी असतात. खायला ठिसूळ असतात. जे तुमची भूकही दूर होते आणि मनाल समाधानही मिळतं.
3. दूध
जर तुम्हाला रात्री वेळेत जेवण केल्यानंतरही मध्यरात्री भूक लागत असेल. तर तुम्ही एक ग्लास गरम दूध प्या. दूध प्यायल्यामुळे तुमचं पोट तर भरेल पण भरपूर पोषक तत्व मिळतात. त्यामुळे तुमची मिडनाईट क्रेविंग दूर करण्यासाठी हेल्दी पर्याय ठरू शकतो.
4.राजगिरा
राजगिरा हे एक अत्यंत चांगलं स्नॅक्स आहे. हे हेल्दी असण्याबरोबर चवदार असते. त्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होईल असं फूड खाण्यापेक्षा हे काही हेल्दी स्नॅक्स खाणं कधीही चांगलं आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )