एक्स्प्लोर

Foods to boost Immunity: हिवाळ्यात इम्युनिटी वाढवण्यासाठी आहारात 'या' गोष्टींचा करा समावेश, फॉलो करा या सोप्या टिप्स

हिवाळ्यात इम्युनिटी वाढवण्यासाठी तुम्हाला काही पदार्थांचा समावेश आहारात करावा लागेल तसेच तुम्हाला या सोप्या टिप्स तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. 

Foods to boost Immunity: हिवाळ्यात (Winter) सर्दी, खोकला, ताप या समस्या अनेकांना जाणवतात.  हिवाळ्यात लहान मुले, वृद्ध आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्यांनी अधिक सावध राहावे. हिवाळ्यात इम्युनिटी वाढवण्यासाठी तुम्हाला काही पदार्थांचा समावेश आहारात करावा लागेल तसेच तुम्हाला या सोप्या टिप्स तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. 

या पदार्थांचा करा आहारात समावेश 

बाजरी आणि नाचणीची भाकरी: तुम्ही आहारात बाजरी, नाचणी यांपासून तयार करण्यात आलेल्या भाकरीचा समावेश करु शकता. बाजरी आणि नाचणीमध्ये आरोग्यासाठी आवश्यक असणारी जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात  आहेत. 
भाज्या: हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश तुम्ही आहारात करु शकता. तसेच गाजर, रताळे यांचा देखील समावेश तुम्ही आहारात करु शकता. 

डिंकाचे लाडू: डिंकाचे लाडू हे पौष्टिक असतात. हे लाडू हिवाळ्यात खाल्यानं इम्युनिटी सिस्टिम स्ट्राँग होते.

हिवाळ्यात चहामध्ये तुम्ही तुळस, वेलची, लवंग किंवा दालचिनी इत्यादी घालू शकता. यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. 

भारपूर पाणी प्या: हिवाळ्यात शरीराला सतत हायड्रेट ठेवा. जास्त पाणी प्यायल्यानं वात, पित्त होणे किंवा कफ होणे या समस्या जाणवत नाहीत. तसेच सकाळी तुम्ही एक ग्लास गरम पाणी पिऊ शकता. 

तूप  (Ghee) - हिवाळ्यात तूप खाणे खूप फायदेशीर आहे. तुपात आढळणारे हेल्दी फॅट हिवाळ्यात तुमचे शरीर उबदार ठेवतात, ज्यामुळे थंडीपासून आराम मिळतो. याशिवाय हिवाळ्यात तूप खाल्ल्याने त्वचेला ओलावा येतो.
कांदा (Onion) - हिवाळ्यात कांदा आपल्या शरीराला ऊब देतो. कांद्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. म्हणूनच हिवाळ्यात कच्च्या कांद्याचे पराठे आणि कांदा कचोरी खाऊ शकता.

हिवाळ्यात सर्दी किंवा कफ झाला तर सर्वप्रथम वाफ घ्या. वाफ घेतल्याने गरम हवा नाकात आणि तोंडात जाते. त्यामुळे सर्दी किंवा कफ कमी होतो.  वाफ घेण्यासाठी एका पातेल्यामध्ये गरम पाणी घ्या. त्यामध्ये निलगिरी तेलाचे दोन थेंब टाका.  दिवसातून दोन वेळा या पाण्याची  घेतल्यानंतर तुमची सर्दी कमी होईल. हिवाळ्यात पचन क्रिया मंदावते  त्यामुळे हिवाळ्यात व्यायाम करणं देखील महत्वाचं आहे. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Ghee In Winter: हिवाळ्यात साजूक तूप खाणं आरोग्यासाठी गुणकारी; वाचा तुपाचे आश्चर्यकारक फायदे

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Hip Replacement: वयाच्या 38 व्या वर्षी हिप रिप्लेसमेंट? सांधा खराब होण्याची कारणे अन् आधुनिक इम्प्लांट्सचे फायदे
वयाच्या 38 व्या वर्षी हिप रिप्लेसमेंट? सांधा खराब होण्याची कारणे अन् आधुनिक इम्प्लांट्सचे फायदे
Health News: रात्री उशिरा जेवताय? भूकेपेक्षा जास्त खाताय? हायटस हर्नियाचा धोका वाढतोय.. काय काळजी घ्याल? तज्ज्ञ सांगतात...
रात्री उशिरा जेवताय? भूकेपेक्षा जास्त खाताय? हायटस हर्नियाचा धोका वाढतोय.. काय काळजी घ्याल? तज्ज्ञ सांगतात...
Health Tips : वेगाने वाढणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं; वाचा आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला
वेगाने वाढणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं; वाचा आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला
Health News: काय सांगता..कर्करोग उपचारानंतरही पुन्हा का उद्भवतो? पुनरावृत्तीची कारणे जाणून घ्या, तज्ज्ञ सांगतात...
काय सांगता..कर्करोग उपचारानंतरही पुन्हा का उद्भवतो? पुनरावृत्तीची कारणे जाणून घ्या, तज्ज्ञ सांगतात...

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget