Eye Care Tips : झोपण्यापूर्वी 'ही' गोष्ट दुधात घालून प्या; दृष्टी तर सुधारेलच, चष्म्याचा नंबरही होईल कमी
Eye Care Tips : दूध पिणे ही नेहमीच आरोग्यदायी सवय असते, परंतु दुधात काही गोष्टी मिसळल्याने त्याची शक्ती आणखी वाढते.
![Eye Care Tips : झोपण्यापूर्वी 'ही' गोष्ट दुधात घालून प्या; दृष्टी तर सुधारेलच, चष्म्याचा नंबरही होईल कमी Eye Care Tips milk with ashwagandha and cinnamon for eyesight for sharpen eye vision naturally Eye Care Tips : झोपण्यापूर्वी 'ही' गोष्ट दुधात घालून प्या; दृष्टी तर सुधारेलच, चष्म्याचा नंबरही होईल कमी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/23/97b13af3b36cbb9d5d0f27d42dd6fb851703316485830358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Eye Care Tips : आपल्या रोजच्या जीवनात आपल्या ज्या सवयी आहेत त्याचा कळत-नकळत आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. दूध (Milk) पिणं हे देखील त्यापैकीच एक आहे. पचनसंस्थेपासून दृष्टी आणि हाडांच्या मजबुतीपर्यंत दुधाचे अनेक फायदे आपल्या सर्वांनाच माहित आहेत. आजकाल बहुतेक लोक रात्रीच्या वेळी कमकुवत दृष्टी आणि झोप न लागण्याच्या समस्येने त्रस्त असतात. पण, तुम्हाला माहित आहे का की, दुधात काही गोष्टी मिसळून प्यायल्याने या सर्व समस्यांपासून सुटका मिळू शकते. दूध पिणे ही एक चांगली सवय आहे. पण, योग्य प्रकारे दूध पिणे आरोग्यासाठी आश्चर्यकारकरित्या कार करू शकते. रात्रीच्या वेळी दूध पिणे ही भारतीय घरांमध्ये खूप चांगली सवय आहे. पण, आपल्याला योग्य पद्धत माहित नसल्यामुळे आपण त्याचा पुरेपूर फायदा घेऊ शकत नाही. रात्री झोपण्यापूर्वी काही गोष्टी दुधात मिसळून प्यायल्याने आरोग्यासाठी काय चमत्कार होतात या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
दुधात 'या' गोष्टी मिक्स करा आणि सेवन करा
आजपर्यंत तुम्ही दूध फक्त गरम करून किंवा त्यात हळद घालून प्यायले असाल पण दुधाचे पोषक घटक वाढवण्यासाठी तुम्ही त्यात काही गोष्टी घालाव्यात. जेव्हा तुम्ही स्वतःसाठी दूध गरम कराल तेव्हा त्यात अश्वगंधा, दालचिनी, वेलची, लवंगा आणि हळद टाका आणि उकळल्यावर ते ग्लासमध्ये काढून प्या. दररोज रात्री झोपण्यापूर्वी अशा प्रकारे दुधाचं सेवन करा.
असे केल्याने काय होते
हळद आणि दालचिनी यांसारख्या औषधी वनस्पतींमध्ये दूध मिसळून प्यायल्याने दुधाची क्षमता वाढते. हे आयुर्वेदिक पेय तुम्हाला चांगली झोप घेण्यास मदत करू शकते. याबरोबरच डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी हे खूप फायदेशीर मानले जाते. हे दूध नैसर्गिक किलर पेशी वाढवून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासही मदत करते. याबरोबरच या पेयाचे सेवन पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठीही खूप फायदेशीर आहे. हा उपाय तुम्ही काही दिवस सतत केला तर काही दिवसांतच तुमची दृष्टी सुधारलेली तुम्हाला दिसेल. तसेच, रात्री दूध प्यायल्याने तुमची पचनसंस्थाही निरोगी राहण्यास मदत होईल.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)