Green Vegetables : हिरव्या पालेभाज्यांना शिजवण्यापूर्वी पहिलं 'हे' काम करा, अन्यथा आजाराला निमंत्रण द्याल
Health Tips: पालेभाज्या, फळभाज्या पाण्यानं स्वच्छ केल्यानंतरही किटकनाशके राहून जातात. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून फक्त पाण्यानं हिरव्या पाल्याभाज्यांना स्वच्छ करणं पुरेसं नाही.
Green Vegetables : आपल्यातील बहुतांशजणांनी घरातील वडील-धाडील मंडळीकडून ऐकलं असेल की, हिरव्या पालेभाज्या (green vegetables) खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं. हे अगदी खरं आहे. हिरव्या पालेभाज्या खाल्ल्यामुळे शारीरिक आणि मानसिक विकासासाठी फायदेशीर असतं. यापासून भरपूर पोषक घटक असतात. त्यामुळे तुमच्या शरीरात जर आवश्यक पोषक घटकांचा अभाव असेल, तर हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करायला हवा. त्यामुळे शरीरातील पोषक घटकांची कमतरता दूर होते आणि शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते. आपण हिरव्या पालेभाज्यांबद्दल चांगलं ऐकलं असेल. काहीवेळा हिरव्या पालेभाज्या खाल्यानंतरही आजारी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे काही गोष्टींची आधीच माहिती घेऊन खबरदारी घेणं महत्त्वाचं आहे. बहुतेकजण बाजारातून पालेभाज्या आणल्यानंतर साधारण पाण्यानं स्वच्छ करतात. ही वाईट सवय तुमच्या आरोग्यावर बेतू शकते. आजकाल पालेभाज्या असो किंवा फळभाज्या यांच्यावर किटकनाशक औषधांचा वापर केला जातो. त्यामुळे साधारण पाण्यानं स्वच्छता करूनही त्यावर आरोग्याला हानिकारक घटक तशीच राहतात. त्यामुळे फक्त साधारण पाण्यानं पालेभाज्या स्वच्छ करणं पुरेसं नाही. आज आपण पालेभाज्यांची स्वच्छता कशी करायला हवी? काय काळजी घ्यायला हवी? हे पाहूया...
पालेभाज्या स्वच्छ करण्याची योग्य पद्धत कोणती?
>> हिरव्या पालेभाज्या स्वच्छ करण्याधी स्वत: चे हात स्वच्छ करा
बाजारातून पालेभाज्या विकत आणल्याबरोबर त्यांना हात लावू नका. फळभाज्या असो की पालेभाज्या यांची स्वच्छता करण्यापूर्वी काही नियम घालून घ्यायला हवेत. आधी स्वत:चे हात चांगले स्वच्छ करा आणि यानंतरच भाज्यांना हात लावाल. अस्वच्छ, खराब हातांनी भाज्या स्वच्छ केल्यामुळे शरीरात बॅक्टेरिया जाऊ शकतात.
>> पालेभाज्यांना कोमट पाण्यानं स्वच्छ करा
तुमचं किचन स्वच्छ राहावं म्हणून जसं काळजी घेता तसंच किचनमधील भाज्यांच्या स्वच्छतेची काळजी घ्यायला हवी. पालेभाज्यांना कोमट पाण्यात स्वच्छ करून घ्याल. कोमट पाण्याचा वापर केल्यामुळे त्यावरील घाण निघून जाईल. यामुळे अन्नातून होणाऱ्या विषबाधेची शक्यता कमी होते.
>> बेकिंग सोड्याचा वापर करा
बाजारातून आणलेल्या हिरव्या पालेभाज्यांना स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोड्याचा चांगला वापर होऊ शकतो. एखाद्या स्टिलच्या ताटामध्ये आवश्यतेनुसार पाणी घ्या आणि त्या बेकिंग सोडा मिसळून घ्या. या पाण्यामध्ये तुमच्या भाज्यांना टाका आणि चांगलं स्वच्छ करून घ्या. यामुळे भाज्यांमधील किटक आणि केमिकलही निघून जाईल. अशाप्रकारे स्वच्छतेची काळजी घेतली, तर तुमचं आरोग्यही चांगलं राहील.
(Disclaimer: या लेखातील माहिती ही केवळ वाचकांच्या जागरूकतेसाठी प्रकाशित केलेली आहे. यापैकी कोणताही मजकूर हा वैद्यकीय सल्ला नाही. आपल्या शंका किंवा प्रश्नांसाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )