Health Tips : तमालपत्र पाण्यात टाकून उकळा आणि सकाळी हे पाणी प्या, आरोग्यासाठी लाभदायक, जाणून घ्या फायदे
Bay Leaves Benefits : पहाटे तमालपत्राच्या पानांचं पाणी पिणे, आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. तमालपत्राचं पाणी बनवण्याची पद्धत जाणून घ्या.
Health Benefits of Bay Leaves : आपल्या स्वयंपाक घरात (Kitchen) असणाऱ्या गरम मसाल्यांचे अनेक औषधी गुणधर्म आहे. यातीलच एक म्हणजे तमालपत्र (Bay Leaves). तमालपत्र ही एक औषधी वनस्पती आहे, जी प्रत्येक स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असते. पण फार कमी लोकांना हे माहीत असेल की तमालपत्रामध्ये असंख्य औषधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे आयुर्वेदात (Ayurveda) औषध म्हणून त्याचा वापर केला जातो. तमालपत्र ही औषधी वनस्पती असून त्याचे अनेक फायदे आहेत. तमालपत्र शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. हे किडनीच्या आरोग्यास मदत करते.
आपल्या स्वयंपाकघरात मसाला म्हणून वापरले जाणारे तमालपत्र तुमच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे जाणून घ्या.
तमालपत्र पाण्यात उकळून प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट घटक शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात. सकाळी तमालपत्राचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया चांगली राहते. आपला रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे. चला जाणून घेऊया तमालपत्राचे पाणी आणि त्याचे फायदे.
तमालपत्र आरोग्यासाठी फायदेशीर
तमालपत्रामध्ये अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात, हे आरोग्यासाठी खूप लाभदायक आहेत. तमालपत्रामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅंगनीज, सेलेनियम, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी यांसारखे पोषक तत्व मोठ्या प्रमाणात असतात. तमालपत्राचे नियमित सेवन केल्याने व्हायरल आजार, सर्दी आणि पोटाशी संबंधित समस्यांपासून दूर होतात.
तमालपत्राचे फायदे जाणून घ्या
- तमालपत्राचे पाणी वजन कमी करण्यात मदत करते. याच्या सेवनाने आपली भूक मंदावते आणि शरीराला डिटॉक्स होण्यास मदत होते.
- शरीरात ऊर्जा आणते आणि थकवा दूर होतो.
- रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
- यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्स नावाच्या हानिकारक पदार्थांशी लढतात, ज्यामुळे अनेक रोग दूर होतात.
- तमालपत्राच्या पाण्यात असलेले अँटीऑक्सिडंट आपल्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात.
- बद्धकोष्ठता आणि अपचन, अशा पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यात तमालपत्र मदत करते.
- तमालपत्रात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळते. हे फुफ्फुस आणि हृदय रोगांशी लढण्यास देखील सक्षम आहे.
तमालपत्राचे पाणी कसे बनवायचे?
सर्व प्रथम काही ताजी तमालपत्र घ्या. ही पाने नीट धुवून घ्या. एक ग्लास पाणी घ्या आणि उकळी आणा. पाणी उकळल्यावर त्यात थोडी तमालपत्र टाका. त्यांना 5 ते 10 मिनिटे पाण्यात उकळा. यानंतर गॅस बंद करून पाणी थोडे थंड होऊ द्या. आता हे पाणी गाळून घ्या, कपमध्ये काढून गरमागरम प्या. तुम्हाला हवे असल्यास त्यात थोडे आले किंवा लिंबाचा रस घालू शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Hair Care Tips : केस गळती, कोंड्यापासून सुटका हवीय? आठवड्यातून एकदा 'हा' हेअर पॅक लावून पाहाच
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )