Diarrhea Symptoms : लहान बाळात आढळणारा अतिसार हा आजार नेमका काय? जाणून घ्या लक्षणं
Diarrhea Symptoms : जिल्ह्यात अतिसार नियंत्रण कार्यक्रमासाठी येत्या काळात पाच वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या बालकांच्या घरात ओ.आर.एस. आणि झिंक गोळ्यांचा वापर तसेच उपलब्धता वाढविण्यात येणार आहे.
Diarrhea Symptoms : पावसाळा सुरु झाला आहे. आणि पावसाळा ऋतू म्हटला की साथीचे रोग, अतिसार, डेंग्यू, मलेरिया हे आजार टाळता येत नाहीत. यावेळी बालकांमध्ये अतिसाराचा संसर्ग वाढण्याची शक्यता असते. त्यानुसार आरोग्य विभागाकडून अतिसाराचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जातात. देशात 5 वर्षापर्यंतच्या बालकांच्या मृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारण असून 10 टक्के बालके अतिसारामुळे दगवतात. अर्भक मृत्यूदर आणि बाल मृत्यूदर कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे एक महत्वाचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार अतिसारामुळे होणारे बाल मृत्यू शून्य करण्याचे उद्दिष्ट समोर ठेऊन पुणे जिल्ह्यात 1 जुलै ते 15 जुलै 2022 या कालावधीत 'अतिसार नियंत्रण पंधरवडा' राबविण्यात येणार आहे. परंतु, त्याआधी अतिसार म्हणजे काय? अतिसाराची लक्षणे कोणती? आणि अतिसार झाल्यास कोणती खबरदारी घ्यावी या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.
अतिसाराची लक्षणे :
अतिसार झालेल्या बालकात सौम्य किंवा गंभीर जलशुष्कता, अस्वस्थपणा, चिडचिडेपणा, डोळे खोल जाणे, घटा घटा पाणी पिणे, त्वचेचा चिमटा घेतला असल्यास हळूहळू पूर्ववत होणे, बेशुद्ध अवस्थेत पडणे, स्तनपान टाळणे किंवा बळजबरीने स्तनपान करणे अशी लक्षणे आढळून येतात.
पालकांनी कोणती काळजी घ्यावी?
बाळाला अतिसार झाल्यास पालकांनी विशेषत: मातांनी काही गोष्टींची खबरदारी घेणे गरजेचे आहे. जसे की,
- बाळाला जेवण भरवण्यापूर्वी नीट स्वच्छतेची काळजी घ्यावी.
- बालकाला अतिसार झाल्याबरोबर (एका दिवसात तीनपेक्षा जास्त वेळा जुलाब होणे) लगेच ओ.आर.एसचे द्रावण द्यावे.
- अतिसार थांबेपर्यंत द्रावण देत राहावे.
- पहिल्या अतिसारानंतर बालकाला 14 दिवसांपर्यंत झिंकची गोळी द्यावी.
- अतिसार होणे थांबले तरी झिंक गोळी देत राहावी.
- बाळाला स्वच्छ हातानी स्वच्छ आणि निर्जंतुक पाणी पाजावे.
- बाळाच्या विष्ठेची लवकरात लवकर विल्हेवाट लावावी.
या दरम्यान जे बाळ स्तनपान करीत असेल त्याला स्तनपान सुरु ठेवावे. अतिसार दरम्यान आणि नंतरही जास्तीत जास्त स्तनपान द्यावे. बालक अधिक आजारी असेल, स्तनपान करू शकत नसेल, शौचातून रक्त पडत असेल, पाणी कमी पीत असेल किंवा ताप येत असेल, यापैकी कोणतेही लक्षणे आढळल्यास तात्काळ जवळच्या आरोग्यसंस्थेशी, गावातील आशा कार्यकर्ती किंवा ए.एन.एम यांच्याशी संपर्क साधावा.
ओ.आर.एस आणि झिंक गोळ्यांचे वाटप
जिल्ह्यात अतिसार नियंत्रण कार्यक्रमासाठी येत्या काळात पाच वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या बालकांच्या घरात ओ.आर.एस. आणि झिंक गोळ्यांचा वापर तसेच उपलब्धता वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण 3 लाख 32 हजार 326 एवढ्या 0 ते 5 बालकांना ओ.आर एस आणि झिंक गोळ्यांचे वाटप आशा कार्यकर्तीमार्फत करण्यात येणार आहे. आशामार्फत गृहभेट देऊन ओ.आर.एस. बनविण्याबाबत 2 हजार 858 प्रात्याक्षिके करून दाखविण्यात येणार आहे. प्रत्येक उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय असे एकूण 673 ओ.आर.टी कॉर्नर स्थापन करण्यात आले असून या ठिकाणावरून ओ.आर.एस आणि झिंक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Doctor’s day 2022 : दरवर्षी 1 जुलै रोजीच 'जागतिक डॉक्टर्स दिन' का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास
- Important Days in July : जुलै महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?
- Social Media Day 2022 : जागतिक 'सोशल मीडिया डे' साजरा करण्यामागचं कारण काय? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )