एक्स्प्लोर

Covid-19 Update : देशात JN.1 व्हेरियंटचे 197 रुग्ण! एका दिवसात 636 कोरोनाबाधित, सक्रिय रुग्णांची संख्या 4394 वर

Coronavirus New Cases : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या पॉझिटिव्हीटी दरामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने गर्दीच्या ठिकाणी जाण्यामुळे संसर्ग वाढला आहे.

Corona JN.1 Variant Update : नव्या वर्षात कोरोनाने (Coronavirus) डोकेदुखी वाढवली आहे. कोविड-19 (Covid New Cases) चा संसर्ग सातत्याने वाढत आहे. कोरोनाच्या नव्या JN.1 व्हेरियंटचा (Omicron Sub-Variant JN.1) वाढता धोका पाहायला मिळत आहे. नवीन वर्षात भारतातील (Coronavirus Update in India) कोविड-19 च्या सक्रिय रुग्णांची संख्या 4394 वर पोहोचली आहे. कर्नाटक कोरोना विषाणूची परिस्थिती चिंताजनक आहे आणि कर्नाटकात गेल्या 24 तासात 296 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या पॉझिटिव्हीटी दरामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने गर्दीच्या ठिकाणी जाण्यामुळे संसर्ग वाढला आहे.

एका दिवसात 636 नवे कोरोनाबाधित

गेल्या 24 तासांत देशभरात 636 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. कर्नाटकात 24 तासांत कोरोनाचे 296 नवे रुग्ण आढळलेले आहेत. याशिवाय महाराष्ट्रातही नवा व्हेरियंट हात-पाय पसरताना दिसत आहे. महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह दर 2 च्या वर पोहोचला आहे. एकीकडे थंडीला सुरुवात झाल्याने हवामानात मोठा बदल जाणवत आहे, त्यातच नव्या JN.1 कोरोना व्हेरियंटचा धोका, यामुळे रुग्णांमध्ये वाढ होत आहे. देशात कोविड-19 चा सब-व्हेरियंट  JN.1 च्या सक्रिय रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.

JN.1 सब-व्हेरियंटच्या 197 रुग्णांची नोंद

ताज्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाच्या JN.1 सब-व्हेरियंटच्या एकूण 197 रुग्णांची नोंद झाली आहे. भारतीय SARS-CoV-2 Genomics Consortium (INSACOG) च्या म्हणजे जीनोम सीक्वेन्सिंगच्या माहितीनुसार, ओडिसामध्येही नव्या JN.1 सब-व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. सध्या देशातील दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी JN.1 सब-व्हेरियंट पसरला आहे. यामध्ये केरळमध्ये 83, गोव्यात 51 आणि गुजरातमध्ये 34 रुग्ण हे सर्वाधिक संसर्ग असलेले तीन राज्य आहेत. याशिवाय या राज्यांमध्ये कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, ओडिशा आणि दिल्ली या राज्यांचाही समावेश आहे.

कोणत्या राज्यात JN.1 चे किती रुग्ण?

INSACOG ने JN.1 व्हेरियंट संक्रमित लोकांची आकडेवारी जारी केली आहे. सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, केरळमध्ये 83 रुग्ण, गोव्यात 51 रुग्ण, गुजरातमध्ये 34 रुग्ण, कर्नाटकमध्ये 8 रुग्ण, महाराष्ट्रात 7 रुग्ण, राजस्थानमध्ये 5 रुग्ण, तामिळनाडू 4 रुग्ण, तेलंगणात दोन रुग्ण, तर ओडिशा आणि दिल्लीत प्रत्येकी एका रुग्णांची नोंद झाली आहे.

JN.1 व्हेरियंटचे एकूण 179 रुग्ण

ताज्या आकडेवारीनुसार, डिसेंबरमध्ये देशातील 179 कोविड-19 रुग्णांना JN.1 व्हेरियंटची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. नोव्हेंबरमध्ये  JN.1 व्हेरियंटच्या 17 रुग्णांची नोंद झाली आहे. JN.1 व्हेरियंटच्या प्रसाराचा वेग जास्त आहे. पण, हा विषाणू सौम्य आहे. याची लागण झाल्यास गंभीर आजारी पडण्याचा धोका नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटलं आहे.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Pune Drugs Video Exclusive : पुण्यातील मॉलमध्ये ड्रग्जचं सेवन, 2 तरुणींचा धक्कादायक व्हिडीओBhandara : गोसीखुर्द जल पर्यटन प्रकल्पाच्या फलकावरुन फडणवीसांचे नावच गायब!ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 24 June 2024Raj Thackeray MNS Meeting : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज मुंबई बैठक संपन्न! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Ram Mandir : पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
K P Patil : 'मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी...' के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला! प्रकाश आबिटकरांवर जोरदार हल्लाबोल
'मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी...' के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला! प्रकाश आबिटकरांवर जोरदार हल्लाबोल
Embed widget