एक्स्प्लोर

Child Health: पालकांनो.. तुमच्याही मुलांना दूध प्यायल्यानंतर पोट फुगणे, अतिसारासारखा त्रास होतो? असे का होते? काय काळजी घ्याल?

Child Health: दुधामध्ये असलेल्या लॅक्टोजचे पचन करण्यासाठी, लॅक्टेज नावाचे एन्झाइम आवश्यक असते, जे मुलांच्या लहान आतड्यात तयार होते. जर शरीरात हे एन्झाइम अजिबात तयार न झाल्यास दूध पचत नाही

Child Health: दूध हे मुलांच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जात असले तरी काही लहान मुलांना याचे सेवन केल्यानंतर याचा त्रास होतो. मुलाच्या एकूण आरोग्याच्या बाबतीत आतडे महत्त्वाची भूमिका बजावतात.  दुधामध्ये असलेल्या लॅक्टोजचे पचन करण्यासाठी, लॅक्टेज नावाचे एन्झाइम आवश्यक असते, जे लहान आतड्यात तयार होते. जर शरीरात हे एन्झाइम अजिबात तयार न झाल्यास दूध पचत नाही, आणि ते मोठ्या आतड्यात जाते आणि तिथेच कुजू लागते. यामुळेच अतिसार, गॅसेस, पोट फुगणे, पोटदुखी अशा समस्यांना सामोरे जावे लागते. वैद्यकीय भाषेत याला लॅक्टोजन इनटॉलरन्स म्हणतात. दुधामध्ये लॅक्टोज नावाची साखर असते, जी शरीर शोषून घेते आणि त्याचे ग्लूकोजमध्ये रुपांतर करते. शरीराला ताकद मिळते. या प्रकारची शर्करा केवळ दुधामध्येच आढळते. याबाबत पुण्यातील मदरहूड हॉस्पिटल येथील बालरोगतज्ज्ञ आणि नवजात शिशु तज्ज्ञ डॉ. अतुल पालवे यांनी महत्त्वाची माहिती दिलीय. जाणून घ्या..

मुलांमधील लॅक्टोज इनटॅालरन्स

दुग्धशर्करा म्हणजेच दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळणारी साखर पूर्णपणे पचवता येत नाही. ही साखर पचण्यास असमर्थता दर्शवणारी एक आरोग्याची स्थिती आहे. जेव्हा लॅक्टोज योग्यरित्या पचत नाही, तेव्हा त्याची विविध लक्षणे शरीरामध्ये दिसू शकतात. लॅक्टोज् इनटॉलरन्सची लक्षणे सामान्यत: लॅक्टोज-युक्त पदार्थ किंवा पेये खाल्ल्यानंतर काही तासांत दिसून येतात. ही स्थिती एक ॲलर्जी नसून पचन समस्या आहे आणि ती अनुवंशिक, वयानुसार बदलणारी किंवा संसर्गजन्य आजारांमुळे लहान आतड्याला झालेल्या नुकसानामुळे प्रभावित होऊ शकते.

मुलांमध्ये पचनाचे विकार

लॅक्टोजन इनटॉलरन्स ही एक चिंताजनक समस्या आहे जी वेळेवर सोडवली पाहिजे, परंतु मोठ्या संख्येने मुलांना इरिटेबल बाऊल सिंड्रोम (IBS), सेलिआक रोग किंवा फुड ऍलर्जी यासारख्या इतर पचन विकारांना तोंड द्यावे लागते. आयबीएस असलेल्या मुलांना ओटीपोटात दुखणे आणि अनियमित आतड्याची हालचाल होते, तर सेलिआक डिसीज ग्लूटेनच्या रोगप्रतिकारक प्रतिक्रियेमुळे होतो आणि एखाद्याच्या लहान आतड्यावर परिणाम करू शकतो. फुड ऍलर्जीमुळे अन्नातील विशिष्ट प्रथिनांना रोगप्रतिकारक शक्ती प्रतिक्रिया करते ज्यामुळे पुरळ उठण्यासारख्या लक्षणे आढळून येतात. या विकारांची लक्षणांमध्ये ओटीपोटात दुखणे, अतिसार आणि पोटफुगी अशी असतात ज्यामुळे निदान आव्हानात्मक आणि गुंतागुंतीचे ठरते. म्हणूनच, वेळेवर उपचार करण्यासाठी मुलांना डॉक्टरांकडून योग्य मूल्यांकनाची आवश्यकता भासते. मुलांमध्ये आतड्याच्या समस्या वेळेवर सोडवल्या पाहिजेत.

मुलांमध्ये आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी टिप्स

आतड्यांशी संबंधित कोणत्याही समस्यांना तोंड देण्यासाठी, विलंब न करता त्यांचे निदान करणे अत्यावश्यक आहे. लॅक्टोज इनटॅालरन्ससाठी, तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली लॅक्टोज इनटॅालरन्स चाचणी करणे गरजेचे आहे. स्वतःहून कोणतीही औषधे घेऊ नका. इतर पचन विकारांसाठी, अचूक निदान करण्यासाठी तज्ञांकडून स्टूल चाचण्या, रक्त तपासणी किंवा एंडोस्कोपीचा सल्ला दिला जाईल. शिवाय, तज्ञ पालकांना त्यांच्या मुलांच्या आहाराकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला जाईल. ज्या मुलांना लॅक्टोज इनटॅालरन्स आढळून आला त्यांना पुरेसे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी घेण्याचा सल्ला दिला जाईल. इतर पचन विकारांचे व्यवस्थापन करण्यासाठी, एलिमिनेशन डाएटमुळे जळजळ निर्माण करणारे पदार्थ ओळखण्यास मदत होऊ शकते, तर प्रोबायोटिक्स आणि प्रीबायोटिक्स आतड्यांसाठी फायदेशीर ठरू शकतात. जंक फुड, तेलकट, हवाबंद डब्यातील आणि प्रक्रिया केलेले पदार्थांचे सेवन मर्यादित करा आणि तज्ञांनी दिलेल्या आहारातील बदलांचे पालन करा.

आरोग्याला प्राधान्य देणे ही काळाची गरज

प्रतिबंधात्मक उपायांमध्ये निरोगी आतड्याच्या सूक्ष्मजीवांना प्रोत्साहन देण्यासाठी फळे, भाज्या आणि तृणधान्य समृद्ध संतुलित आहाराची निवड करा. पचन समस्यांचा धोका असलेल्या मुलांसाठी, नियमित तपासणी वेळीच निदान आणि उपचारास मदत करू शकते. पालकांनी त्यांच्या मुलांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी कोणताही विलंब न करता त्यांच्या आतड्याच्या आरोग्याला प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग

व्हिडीओ

Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Embed widget