एक्स्प्लोर

Cancer : फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा

Cancer Risk Factors : कॅन्सर एखाद्या एका मोठ्या गोष्टीमुळे होत नाही, तर तो अनेक वर्षांच्या सवयींमुळे आकार घेतो. म्हणूनच छोट्या पण सातत्यपूर्ण योग्य निवडी भविष्यात मोठा फरक घडवू शकतात.

Cancer Prevention Tips : कॅन्सर म्हटले की डोळ्यासमोर सिगारेट, तंबाखू आणि दारू यांसारखे मोठे धोके उभे राहतात. पण तज्ज्ञांच्या मते, कॅन्सरचा धोका केवळ या सवयींपुरता मर्यादित नाही. रोजच्या आयुष्यात आपण सहज दुर्लक्षित करणाऱ्या काही छोट्या सवयीही वर्षानुवर्षे एकत्र येऊन मोठा परिणाम करू शकतात.

तज्ज्ञांच्या मते, कॅन्सर हा अचानक होत नाही. रोजच्या छोट्या ‘मायक्रो-एक्सपोजर’मुळे तो हळूहळू तयार होतो. प्रदूषण, सनस्क्रीन न लावणे, अपुरी झोप, जास्त प्रोसेस्ड फूड… या गोष्टी त्या क्षणी धोकादायक वाटत नाहीत, पण दीर्घकाळासाठी या गोष्टी गंभीर ठरू शकतात. 

‘मायक्रो-एक्सपोजर’ म्हणजे काय? (Micro-Exposure Risk)

1) वायू प्रदूषणाचा हळूहळू परिणाम (Air Pollution and PM2.5) 

वाहनांचा धूर, बांधकामातील धूळ आणि इंधन जळल्याने तयार होणारे PM2.5 कण फुफ्फुसांच्या आतपर्यंत पोहोचतात. दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास, अगदी धूम्रपान न करणाऱ्यांमध्येही फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका वाढू शकतो. एक दिवसात परिणाम जाणवत नाही, पण वर्षानुवर्षे तो साचत जातो.

2. रोजची हलकी उन्हातली तिरीपही धोकादायक (UV Exposure and Skin Damage)

समुद्रकिनारी तीव्र उन्हामुळे सनबर्न झाला तर आपण सावध होतो, पण रोज ऑफिसला ये-जा करताना, दुचाकी चालवताना किंवा मैदानी व्यायाम करताना मिळणाऱ्या सौम्य UV किरणांकडे दुर्लक्ष होते. सततचा हलका UV संपर्क त्वचेच्या पेशींमध्ये DNA बदल घडवू शकतो, ज्यामुळे पुढे त्वचारोग किंवा कॅन्सरचा धोका वाढू शकतो.

3. प्रोसेस्ड फूड, जास्त साखर आणि लठ्ठपणा (Processed Food and Obesity Risk)

प्रोसेस्ड मांस, जास्त साखर आणि नियमित दारू सेवन शरीरात सूज (Inflammation), इन्सुलिन रेसिस्टन्स आणि हार्मोनल बदल निर्माण करतात. असे वातावरण असामान्य पेशींना वाढण्याची संधी देऊ शकते. हे परिणाम त्वरित दिसत नाहीत; पण दीर्घकाळात धोका वाढतो.

4. अपुरी झोप आणि बिघडलेलं जैविक घड्याळ (Sleep Deprivation and Circadian Rhythm)

नाईट शिफ्ट, कमी झोप आणि अनियमित दिनचर्या मेलाटोनिन व मेटाबॉलिझमवर परिणाम करतात. काही संशोधनानुसार, दीर्घकाळ अशा पद्धतीने राहिल्यास विशिष्ट कॅन्सरचा धोका वाढण्याशी संबंध आढळतो.

5. सतत बसून काम करण्याची सवय (Sedentary Lifestyle Risk)

तासन्‌तास बसून काम करणे, शारीरिक हालचालींचा अभाव आणि व्यायाम टाळणे यामुळे रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होऊ शकतो. दीर्घकाळात हेही जोखीम वाढवणारे ठरू शकते.

मग बचाव कसा करायचा? (Cancer Prevention Tips)

या सगळ्या गोष्टी असल्या तरी घाबरून जाण्याची गरज नाही, फक्त जागरूक राहण्याची गरज आहे. आपल्या शरीरात DNA दुरुस्ती आणि मजबूत रोगप्रतिकारक प्रणाली असते. मात्र छोटे-छोटे धोके साचत गेले तर मोठा धोका निर्माण होऊ शकतो. 

Hidden Cancer Risks : दररोजच्या छोट्या सवयींमध्ये करा हे बदल

नियमित सनस्क्रीनचा वापर

घरात आणि कार्यालयात चांगले व्हेंटिलेशन

प्रोसेस्ड फूड आणि साखर कमी करणे

दारूचे सेवन मर्यादित ठेवणे

दररोज 7–8 तासांची झोप

किमान 30 मिनिटे शारीरिक हालचाल.

कॅन्सर एखाद्या एका मोठ्या गोष्टीमुळे होत नाही, तर तो अनेक वर्षांच्या सवयींमुळे आकार घेतो. म्हणूनच छोट्या पण सातत्यपूर्ण योग्य निवडी भविष्यात मोठा फरक घडवू शकतात.

Disclaimer: ही माहिती संशोधन अभ्यास आणि तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय म्हणून याकडे पाहू नये. कोणतीही नवीन सवय, आहार किंवा व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

National Epilepsy Day 2026: अपस्मार...फिट्सबद्दलचे गैरसमज आजच दूर करा! 'असे' 4 गैरसमज आणि सत्य प्रत्येकाने जाणून घ्यायला हवेत, तज्ज्ञ सांगतात...
अपस्मार...फिट्सबद्दलचे गैरसमज आजच दूर करा! 'असे' 4 गैरसमज आणि सत्य प्रत्येकाने जाणून घ्यायला हवेत, तज्ज्ञ सांगतात...
Health: बाळासाठी प्रयत्न करताय? मग रक्तातील साखरेची पातळी तपासली का? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती...
बाळासाठी प्रयत्न करताय? मग रक्तातील साखरेची पातळी तपासली का? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती...
World Pneumonia Day 2026 : हवेतील प्रदूषणामुळे न्यूमोनियाचा धोका वाढू शकतो : तज्ज्ञांचा इशारा
हवेतील प्रदूषणामुळे न्यूमोनियाचा धोका वाढू शकतो : तज्ज्ञांचा इशारा
MahaLab Issue Bhandara: महायुती सरकारने बिलं थकवली, राज्यातील मोफत 'महालॅब' रक्त चाचण्या बंद, गरोदर माता आणि वृद्धांचे हाल
महायुती सरकारने बिलं थकवली, राज्यातील मोफत 'महालॅब' रक्त चाचण्या बंद, गरोदर माता आणि वृद्धांचे हाल

व्हिडीओ

Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report
Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Traffic jam News : रायगडमध्ये चिमुकल्याने फुगा गिळला, घाबरलेले आई-बाप लेकराला रुग्णालयात घेऊन निघाले, पण ट्रॅफिकमुळे रस्त्यातच जीव सोडला, अलिबाग-बेलकडे मार्गावरील घटनेने संतापाची लाट
रायगडमध्ये चिमुकल्याने फुगा गिळला, घाबरलेले आई-बाप लेकराला रुग्णालयात घेऊन निघाले, पण ट्रॅफिकमुळे रस्त्यातच जीव सोडला, अलिबाग-बेलकडे मार्गावरील घटनेने संतापाची लाट
NCP Leader viral video: नर्तिकेवर एकापाठोपाठ एक कोऱ्या करकरीत नोटा उधळल्या, गर्दीतून 'सातबारा कोरा होईल'ची हाक, राष्ट्रवादीच्या नेत्याचा व्हिडीओ व्हायरल
नर्तिकेवर एकापाठोपाठ एक कोऱ्या करकरीत नोटा उधळल्या, गर्दीतून 'सातबारा कोरा होईल'ची हाक, राष्ट्रवादीच्या नेत्याचा व्हिडीओ व्हायरल
MS Dhoni Emotional Video After Retirement Of IPL: IPL मधून निवृत्ती घेताच जुन्या फोटोंसह स्वत: व्हिडीओ एडिट केला; MS धोनीच्या पोस्टने सगळ्यांना रडवले
IPL मधून निवृत्ती घेताच जुन्या फोटोंसह स्वत: व्हिडीओ एडिट केला; MS धोनीच्या पोस्टने सगळ्यांना रडवले
IPL Top Released Player List 2027: MS धोनीपासून ट्रॅव्हिस हेड, शिमरॉन हेटमायरपर्यंत....; आयपीएल 2027 मधून रिलीज केलेल्या टॉप खेळाडूंची यादी, चक्रावणाऱ्या नावांचा समावेश
धोनीपासून हेड, हेटमायरपर्यंत....; आयपीएल 2027 मधून रिलीज केलेल्या टॉप खेळाडूंची यादी, चक्रावणाऱ्या नावांचा समावेश
Maharashtra IAS Transfer : राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
Maharashtra Live blog updates: कांदिवलीत 15 वर्षांपासून प्रलंबित रस्ता रुंदीकरणातील 27 बांधकामे तोडली
Maharashtra Live blog updates: कांदिवलीत 15 वर्षांपासून प्रलंबित रस्ता रुंदीकरणातील 27 बांधकामे तोडली
Diva Tukaram Mundhe House Robbery : दिव्यात तुकाराम मुंडेंच्या घरावर दरोडा, सर्वांना वाटलं FDA आयुक्तांच्याच घरी चोरी, नाम साधर्म्यामुळे उलटसुलट चर्चा
दिव्यात तुकाराम मुंडेंच्या घरावर दरोडा, सर्वांना वाटलं FDA आयुक्तांच्याच घरी चोरी, नाम साधर्म्यामुळे उलटसुलट चर्चा
Adani Energy Satara Tarali Project: वनविभागाने तारळी प्रकल्पाचे काम थांबवले, अदानी एनर्जीचे अधिकारी थेट मंत्रालयात पोहोचले, गणेश नाईकांसोबत तातडीची बैठक, जलविद्युत प्रकल्पाबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण
वनविभागाने तारळी प्रकल्पाचे काम थांबवले, अदानी एनर्जीचे अधिकारी थेट मंत्रालयात पोहोचले, गणेश नाईकांसोबत तातडीची बैठक, जलविद्युत प्रकल्पाबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण
Embed widget