Health Tips : तीव्र डोकेदुखी होतेय? हा ब्रेन ट्यूमरही असू शकतो; वेळीच सावध व्हा
Brain Tumor Symtoms : आजकालच्या जीवनशैलीत डोकेदुखीची समस्या सामान्य होत चालली आहे. जर यामुळे वारंवार वेदना होत असतील आणि चक्कर येत असेल तर हे ब्रेन ट्यूमरचे लक्षण देखील असू शकते.
Brain Tumor Symtoms : वेगाने बदलत जाणाऱ्या जीवनशैलीत आजाराचे प्रमाण वाढत चालले आहे. यामध्ये कामाच्या तणावामुळे डोकेदुखी होणे हे सामान्य लक्षण आहे. आणि म्हणून याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. मात्र, जर तुम्ही या साध्या दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले तर ते तुम्हाला महागात पडू शकते. कारण डोके दुखणे हे सामान्य लक्षण नसून ब्रेन ट्यूमरचेसुद्धा लक्षण (Brain Tumor Symtoms) असू शकते. ब्रेन ट्यूमरची लक्षणं कोणती? या संदर्भातील माहिती जाणून घ्या.
ब्रेन ट्यूमर म्हणजे काय?
मेंदूतील पेशींची अनियंत्रित आणि असामान्य पद्धतीने वाढ होण्यास ब्रेन ट्यूमर म्हणतात. तो दोन प्रकारचा असतो. प्रथम प्राथमिक आणि द्वितीय माध्यमिक. प्राथमिक ट्यूमरमध्ये, मेंदूच्या पेशी असामान्यपणे वाढतात. तर, दुय्यम ट्यूमरमध्ये, शरीराच्या इतर भागांतील असामान्य पेशी मेंदूमध्ये देखील पसरतात. प्राथमिक, दुय्यम ब्रेन ट्यूमरच्या मते अतिशय वेगाने पसरतात. स्तन, फुफ्फुस, मूत्रपिंड आणि त्वचेचे कर्करोग देखील सामान्यतः मेंदूमध्ये पसरतात आणि घातक ठरू शकतात.
ब्रेन ट्यूमरची सुरुवातीची लक्षणे :
- तीव्र डोकेदुखी
- चक्कर येणे किंवा उलट्या होणे
- शरीरात कमजोरी जाणवणे
- उभे राहणे किंवा चालणे संतुलन गमावणे
- ऐकण्यात किंवा बोलण्यात अडचण
काय करावे आणि काय करू नये?
डोकेदुखी होणे हे एक सामान्य लक्षण आहे. तुमचे डोके दुखत असल्यास अशा वेळी थोडा वेळ विश्रांती घ्यावी. तरीही बरे न वाटल्यास पेन किलरची गोळी खावी. मात्र, तरीही तुम्हाला आराम येत नसेल तर मात्र वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
ब्रेन ट्यूमर योग्य वेळी ओळखल्यास तो लवकर बरा होऊ शकतो. असे आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे. यामध्ये तुम्ही आहाराकडेही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर निरोगी जीवनशैली, व्यायाम आणि चांगली झोपही घेतली पाहिजे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Heart Health : कोविड संसर्गामुळे वाढतो ह्रदयविकाराचा धोका, काय आहे यामागची कारणं?
- Health Tips : निरोगी राहण्यासाठी आहारात करा ब्रोकोलीचा समावेश; मिळतील अनेक फायदे
- Health tips : तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचे 'हे' आहेत फायदे; जाणून घ्या वैज्ञानिक तथ्य
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )