Brain Tumor Awareness Week: झोपताना फोन डोक्याजवळ ठेवता? ब्रेन ट्यूमरसारख्या गंभीर आजारांपासून स्वतःचे रक्षण करा, या 7 टिप्स फॉलो करा
Brain Tumor Awareness Week 2024: ब्रेन ट्यूमर अवेअरनेस वीक हा एक जागतिक उपक्रम आहे, ज्याचा उद्देश ट्यूमरबद्दल जागरूकता वाढवणे आहे. या गंभीर आजारापासून रक्षण करण्यासाठी या टिप्स फॉलो करा.
Brain Tumor Awareness Week 2024: आजकालचं जीवन हे तणावाचं जीवन झालंय, याचं कारण म्हणजे सध्याची बदलती जीवनशैली, कामाचा प्रचंड ताण, अनेक जबाबदाऱ्यांचं ओझं, मोबाईलचं व्यसन आणि यासारख्या अनेक गंभीर आजारांचा धोका वाढत चालला आहे. याचा थेट परिणाम आपल्या मेंदूवरही होत आहे. आजच्या काळात, ब्रेन ट्यूमर ही एक गंभीर समस्या आहे, ज्याची वेळेवर ओळख आणि उपचार आवश्यक आहेत. ब्रेन ट्युमर बरा होत नाही, असा गैरसमज लोकांच्या मनात असतो. ब्रेन ट्यूमर त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात आढळल्यास, त्यावर उपचार शक्य आहे. या लेखात तुम्हाला ब्रेन ट्यूमर म्हणजे काय, त्याची कारणे, लक्षणे, प्रकार, ब्रेन ट्यूमरचे निदान आणि उपचार काय आहेत याची माहिती मिळेल. याबद्दल जागरुकता वाढविण्यासाठी इंटरनॅशनल ब्रेन ट्यूमर अवेअरनेस वीक दरवर्षी राबविण्यात येतो. हा एक जागतिक उपक्रम आहे, ज्याचा उद्देश ट्यूमरबद्दल जागरुकता वाढवणे आहे.
ब्रेन ट्यूमरचा धोका कमी करण्यासाठी काय खबरदारी घ्याल?
इंटरनॅशनल ब्रेन ट्यूमर अवेअरनेस वीकच्या या आठवड्यात जगभरातील विविध संस्थांकडून आयोजित केलेले कार्यक्रम पाहतात. आयोजित कार्यक्रमांमध्ये विविध मोहिम आणि उपक्रमांचा समावेश असतो. ते ब्रेन ट्यूमरची लक्षणे, जोखीम घटक, उपचार पर्याय आणि निदान याबद्दल सर्वांना जागरूक करण्याचा प्रयत्न करतात. तसेच अनेक रुग्णही येथे आपले अनुभव सांगतात. ब्रेन ट्यूमरचा धोका कमी करण्यासाठी तुम्ही कोणती पावले उचलू शकता ते जाणून घ्या..
ब्रेन ट्यूमर टाळण्यासाठी या टिप्स फॉलो करा
झोपताना फोन डोक्याजवळ ठेवणे टाळा, स्पीकर मोड किंवा इअरफोन वापरा आणि फोनवर अधिकचे संभाषण टाळा.
वेळोवेळी आवश्यक वैद्यकीय चाचण्या करा, विशेषत: जर त्या डोक्याशी संबंधित असतील. सावधगिरी बाळगा.
फळे, भाज्या, शेंगदाणे आणि संपूर्ण धान्यांमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट समृद्ध आहार घ्या.
नियमित व्यायाम करा, ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते आणि तुम्हाला अनेक प्रकारच्या कर्करोगापासून दूर राहण्यास मदत होते.
धुम्रपान आणि जास्त मद्यपान केल्याने अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढतो, त्यामुळे धूम्रपान सोडा आणि मद्यपान कमी करा.
योग्य प्रमाणात पाणी प्या, यामुळे तुमच्या पेशी निरोगी राहतील आणि ट्यूमर, कॅन्सरसारख्या आजारांपासून तुमचे संरक्षण होईल.
जर तुम्ही सतत तणावग्रस्त असाल तर रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते आणि ब्रेन ट्युमरचा धोका वाढू शकतो. यासाठी ध्यान, योगासने करा आणि काही दिवस कामातून विश्रांती घ्या.
ब्रेन ट्यूमर अवेअरनेस वीकची सुरुवात कशी झाली?
इंटरनॅशनल ब्रेन ट्यूमर अवेअरनेस वीकची सुरुवात इंटरनॅशनल ब्रेन ट्यूमर अलायन्स (IBTA) द्वारे करण्यात आली होती. 2005 मध्ये त्याची स्थापना करण्यात आली होती. IBTA ने ही मोहीम रूग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना ब्रेन ट्यूमरबद्दल जागरूक करण्यासाठी आणि योग्य उपचारांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केली. जेणेकरून रुग्णांना वेळेत उपचार मिळून त्यांचे प्राण वाचू शकतील. त्यानंतर आजवर अनेक संस्थांनी ते सुरू ठेवले आहे.
ब्रेन ट्यूमरची लक्षणे
ब्रेन ट्यूमर ब्रेन ट्यूमरची लक्षणे इतर आजारांच्या लक्षणांपेक्षा खूप वेगळी आहेत. ही लक्षणे ब्रेन ट्यूमरच्या वाढीचा आकार, स्थान यावर अवलंबून असतात. ब्रेन ट्यूमर खालील लक्षणांद्वारे ओळखला जाऊ शकतो.
- डोकेदुखी हे ब्रेन ट्यूमरचे एक सामान्य लक्षण आहे.
- कालांतराने डोकेदुखी वाढत जाते
- चक्कर येणे
- मळमळ किंवा उलट्या
- दृष्टी समस्या, जसे की अंधुक दृष्टी किंवा दुहेरी दृष्टी
- हात किंवा पायात मुंग्या येणे
- स्मरणशक्ती कमी होणे
- बोलण्यात किंवा समजण्यात अडचण
- दैनंदिन व्यवहारात गोंधळ
- ऐकण्याच्या, चवीच्या किंवा वासाच्या क्षमतेमध्ये बदल
- फेफरे येणे (विशेषत: प्रौढांमध्ये)
- व्यक्तिमत्व किंवा वर्तनात बदल
- ऐकण्याच्या समस्या
- लिहिण्यात किंवा वाचण्यात अडचण
- चेहरा, हात किंवा पायतील स्नायू कमकुवत
- कमी रक्तदाब आणि लठ्ठपणा.
हेही वाचा>>>
Women Health: पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हिमोग्लोबीनची कमतरता अधिक? अशक्तपणाही अधिक? कारणं आणि उपाय जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )