Benefits of skin fasting: स्किन फास्टिंग म्हणजे काय? जाणून घ्या फायदे
नैसर्गिक पध्दतीने त्वचेची निगा राखण्यासाठी सध्या नवीन ट्रेंड सुरु आहे. या ट्रेंडचं नाव स्किन फास्टिंग (Skin Fasting) असं आहे.
Benefits Of Skin Fasting: प्रत्येक तरुणीला तिची त्वचा सुंदर आणि चमकदार असावी असे वाटते. अनेक ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर तरुणी करत असतात. पण तरीदेखील काहींना त्वचेसंबंधित समस्या जाणवतात. पण नैसर्गिक पध्दतीने त्वचेची निगा राखण्यासाठी सध्या नवीन ट्रेंड सुरु आहे. या ट्रेंडचं नाव स्किन फास्टिंग (Skin Fasting) असं आहे. आता स्कीन फास्टींग म्हणजे काय? त्याचे फायदे काय आहेत? हे जाणून घेऊयात...
स्किन फास्टींग काय ते अगदी थोडक्यात जाणून घेऊयात. स्किन फास्टींग करताना केमिलयुक्त प्रॉडक्ट त्यांना तुमच्या त्वचेपासून दूर ठेवायचं. बाजारात मिळणाऱ्या ब्युटी प्रोडक्टसमध्ये भरपूर प्रमाणात केमिकल्स असता. ते त्वचेसाठी हानिकारक असताता. ज्यामुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होतं.
नैसर्गिक घटकापासून तयार केलेलं स्कीन केअर प्रोडक्ट्स आणि घरगुती उपाय यांचा वापरा जेणेकरुन तुम्हाला त्वचेची निगा राखता येईल आणि त्वचेची समस्या कमी होईल. स्किन फास्टिंग करणं खूप सोपं आहे. भरपूर विविध फळं खा. व्यायाम करा आणि भरपूर पाणी प्या. केमिकल फ्री आणि आयुर्वेदिक प्रोडक्टचा वापर करा जेणेकरुन तुमची त्वचा हेल्दी आणि शायनिंग राहा. स्किनची काळजी घ्या आनंदी राहा. स्किन फास्टिंग दरम्यान धुळीपासून तसेच प्रदुषणापासून त्वचेचं संरक्षण करा. असे करा स्किन फास्टिंग-
स्किन फास्टिंग कसं करालं?
- झोपण्यापूर्वी त्वचा पाण्याने धुवा.
- कोणतीही क्रिम चेहऱ्याला न लावता झोपा.
- दुसऱ्या दिवशी सकाळी उठून कोमट पाण्याने चेहरा धुवा.
- दिवसभर त्वचा हायड्रेट ठेवा.
अशी घ्या त्वचेची काळजी
- भरपूर पाणी प्या. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास त्वचाही कोरडी आणि निस्तेज होते.
- स्किन फास्टिंग हे एका आठवड्यापेक्षा जास्त काळ करू नका. जर तुम्ही त्वचेवर कोणत्याही प्रकारचे उपचार सुरु असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं स्किन फास्टिंग करा.
- त्वचा कोरडी होत असेल तर त्वचेवर गुलाबपाणी, घरगुती फेस पॅक लावा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )