Aurangabad News: आपल्या चिमुकल्यांना सांभाळा; RSV, H3N2, Adenoviruses, Influenza A व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला
Aurangabad Health News : आपल्या चिमुकल्यांना सांभाळा. कारण RSV, H3N2, Adenoviruses, Influenza A virus या चार व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे औरंगाबादमधील बाल रुग्णालये फुल्ल झाली आहेत.
![Aurangabad News: आपल्या चिमुकल्यांना सांभाळा; RSV, H3N2, Adenoviruses, Influenza A व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला Aurangabad Health News Take care of your little ones Outbreak of RSV H3N2 Adenoviruses Influenza A virus Aurangabad News: आपल्या चिमुकल्यांना सांभाळा; RSV, H3N2, Adenoviruses, Influenza A व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/27/84a34a286bfb88b470a94e4d451e8dc6167480352140983_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aurangabad Health News : आपल्या चिमुकल्यांना सांभाळा. कारण RSV (Respiratory Syncytial Virus), Influenza A (H3N2) Variant Virus, Adenoviruses, Influenza A virus या चार व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे औरंगाबादमधील (Aurangabad) बाल रुग्णालये फुल्ल झाली आहेत. मुलांना तीव्र ताप, श्वास घेण्यास त्रास, खोकला, आदी लक्षणे जाणवल्यास अंगावर न काढता डॉक्टरांना दाखवा, असं आवाहन केलं जात आहे.
औरंगाबादमधील रुग्णालयात आजारी चिमुरड्यांची गर्दी वाढली आहे त्याच कारण आहे RSV, Influenza A (H3N2) Variant Virus, Adenoviruses, Influenza A virus हे चार व्हायरस. 2019 नंतर Adenoviruses व्हायरसची एक लाट आलेली पाहायला मिळाले आहे. या व्हायरसमुळे रुग्णालयात हाऊसफुल्ल झाली आहेत.
यंदा हिवाळ्यात लहान मुलांमध्ये विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहेत. मुख्यत: श्वसनाशी संबंधित आजारांमध्ये वाढ झाली आहे. या विषाणूजन्य आजारांचे प्रमाण सौम्य ते मध्यम स्वरुपाचे आहेत, असं बालरोगतज्ज्ञ डॉ. मंदार देशपांडे यांनी सांगितलं.
काय आहे हा Adenoviruses?
- अॅडिनोव्हायरस हा एक विषाणू आहे जो श्वासनलिका, आतडे, डोळा, मूत्रमार्गाच्या अस्तरांवर वाढतो. या विषाणूमुळे सर्दी, न्यूमोनिया, पचनाचे आजार आणि लघवी संसर्ग होऊ शकतो.
- या विषाणूचे डझनभर प्रकार आहेत परंतु या उद्रेकामागे एडेनोव्हायरस 7 असल्याचे म्हटले जाते.
- एडेनोव्हायरस 7 विशेषतः धोकादायक आहे आणि त्यामुळे न्यूमोनियासह मोठ्या श्वसनाच्या गुंतागुंत होऊ शकतात.
- एडेनोव्हायरसमुळे मृत्यू होत नाही. ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे अशा मुलांवर हा विषाणू वर्चस्व गाजवतो.
RSV, Influenza A (H3N2) Variant Virus, Adenoviruses, Influenza A virus या चार व्हायरस पासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी हे देखील जाणून घ्या ...
- लहान मुलांना गर्दीच्या ठिकाणी नेणं टाळा
- पौष्टिक आहार द्या
- स्वच्छतेचे नियम पाळा
- लहान मुलांना हात धुण्याची सवय लावावी
- इन्फ्लुएंजाची लस घेणं आवश्यक
यातील RSV हा व्हायसर हा एक वर्षाखालील मुलांना त्रास देतो. तर Influenza A (H3N2) Variant Virus, Adenoviruses, Influenza A virus व्हायरसमुळे होणाऱ्या आजारांची लक्षणे एक वर्षाच्या बाळापासून ते दहा वर्षांच्या मुलांमध्ये दिसत आहेत. या चार व्हायरसपासून आपल्या मुलांना सांभाळा. हे चारही व्हायरसचा प्रसार हवेतून होतो. यातील Influenza A (H3N2) Variant Virus आणि Adenoviruses हे व्हायरस मुलांना अधिक त्रासदायक आहेत. त्यामुळे मुलांची काळजी घ्या, असं आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.
कोणताही ताप दोन ते तीन दिवसांपेक्षा जास्त वेळ असेल, बाळाला श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असेल, तीव्र सर्दी खोकला असेल आणि घरातील इतर लोक आजारी असतील तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे, असंही डॉक्टरांनी सांगितलं.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)