Air Pollution : हार्ट पेशंट, फुफ्फुसाचा कर्करोग की ब्रेन स्ट्रोक? प्रदूषणामुळे कोणत्या रूग्णांवर जास्त परिणाम होतो? वाचा सविस्तर
Indoor Pollution vs Air Pollution : 13 नोव्हेंबरपासून दिल्ली सरकार प्रदूषण कमी करण्यासाठी आपली सात वर्षे जुनी ऑड-इव्हन योजना पुन्हा लागू करणार आहेत.
Indoor Pollution vs Air Pollution : दिल्लीतील (Delhi) प्रदूषणाची (Air Pollution) पातळी धोकादायक श्रेणीत कायम आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 400-500 च्या दरम्यान आहे. वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सरकारने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 13 नोव्हेंबरपासून दिल्ली सरकार प्रदूषण कमी करण्यासाठी आपली सात वर्षे जुनी ऑड-इव्हन योजना पुन्हा लागू करणार आहेत. वायू प्रदूषण टाळण्यासाठी घरात राहणे हा एक चांगला पर्याय आहे, परंतु घरातील हवा श्वास घेण्यास पुरेशी शुद्ध आहे का? असा प्रश्न पडतो.
जेव्हा काही वायू प्रदूषक जसे की, कण आणि वायू घरातील किंवा ऑफिसमधील हवा प्रदूषित करू लागतात तेव्हा त्यामुळे घरातील प्रदूषण होते. हे बाहेरच्या हवेइतकेच धोकादायक आहे. दोन्ही प्रदूषणामुळे हृदयविकाराचा झटका आणि कर्करोगासारखे धोकादायक आजार होतात. यामुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू होतो. दोन्ही प्रदूषणामुळे सर्वाधिक मृत्यू हृदयविकार आणि ब्रेन स्ट्रोकमुळे होतात. अशा रूग्णांना चांगल्या वातावरणात ठेवणे आणि योग करून स्वतःला निरोगी ठेवणे फार गरजेचं आहे. घरातील आणि बाहेरील प्रदूषणामुळे कोणते रोग होऊ शकतात या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
बाहेरील प्रदूषणामुळे होणारे आजार
हृदयविकार : हवेत इतके प्रदूषक असतात की त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार होतात आणि 40 टक्के मृत्यूचं प्रमाण वाढतं.
मेंदूचा झटका : मेंदूच्या कोणत्याही रक्तवाहिनीतील रक्तप्रवाह थांबतो किंवा फुटतो तेव्हा स्ट्रोक होतो. देशात या आजारामुळे मृत्यूचं प्रमाण 40 टक्के आहे. वायू प्रदूषण हे यामागील एक कारण आहे.
फुफ्फुसांशी संबंधित आजार : वायू प्रदूषणामुळे लोकांना फुफ्फुसांशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. 11 टक्के लोकांचा मृत्यू बाहेरच्या प्रदूषणामुळे होणाऱ्या क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) मुळे होतो.
फुफ्फुसाचा कर्करोग : बाहेरील प्रदूषणामुळे देखील फुफ्फुसाचा कर्करोग होतो. 6 टक्के मृत्यू या आजारामुळे होतात.
लहान मुलांमध्ये श्वासोच्छवासाच्या समस्या : बाहेरील वायू प्रदूषणामुळे लहान मुलांमध्ये श्वासोच्छवासाच्या समस्या दिसून येतात. यामुळे 3 टक्के मृत्यूही होतात.
घरातील प्रदूषणामुळे होणारे आजार, ज्यामुळे मृत्यू होतो :-
हृदयविकार : घरातील प्रदूषणामुळे हृदयाशी संबंधित आजार होतात आणि घरातील प्रदूषणामुळे 26 टक्के मृत्यू होतात.
ब्रेन स्ट्रोक : घरातील प्रदूषणामुळे ब्रेन स्ट्रोक सारख्या समस्या देखील उद्भवतात, ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो.
फुफ्फुसांशी संबंधित समस्या : फुफ्फुसाशी संबंधित आजार मृत्यूचे कारण ठरतात आणि घरातील प्रदूषणामुळे असे आजार उद्भवतात. यामुळे 22 टक्के मृत्यू होतात.
लहान मुलांमध्ये श्वसनाचे आजार : लहान मुलांमध्ये श्वसनाच्या आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी 12 टक्के मृत्यू घरातील प्रदूषणामुळे होतात.
फुफ्फुसाचा कर्करोग : फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या मृत्यूंपैकी 6 टक्के मृत्यू घरातील प्रदूषणामुळे होतात.
घरातील प्रदूषण कसे होते?
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) नुसार, जगभरातील 2.4 अब्ज लोक चूल, स्टोव्ह आणि बायोमास यांसारख्या खुल्या शेकोटीचा स्वयंपाकासाठी वापर करतात. या प्रकारच्या इंधनातून अतिशय धोकादायक वायू बाहेर पडतात, जे घरातील वातावरण प्रदूषित करतात. 2020 मध्ये घरातील प्रदूषणामुळे 3.2 लाख लोकांचा मृत्यू झाला. घरातील प्रदूषणाचा सर्वात जास्त परिणाम लहान मुले आणि महिलांच्या आरोग्यावर होतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )