(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : वायू प्रदूषणाचा मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो; तणाव, चिंता, नैराश्य वाढण्याची भीती
Health Tips : वायू प्रदूषणामुळे मूड बदलू शकतो. त्यामुळे मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
Health Tips : राजधानी दिल्ली-एनसीआरमधील (Delhi-NCR) वायू प्रदूषणाची (Air Pollution) पातळी आता भीतीदायक झाली आहे. संपूर्ण परिसर प्रदूषणाने गंभीर पातळी गाठली आहे. दूषित हवेचा आरोग्यावर वाईट परिणाम होतोय. त्यामुळे गंभीर आजार होण्याचा धोका वाढला आहे. वायू प्रदूषणाचा सर्वाधिक परिणाम फुफ्फुसावर आणि श्वासोच्छवासावर होतो. पण, त्यामुळे मधुमेहही वाढू शकतो, असे नुकत्याच झालेल्या एका संशोधनात आढळून आले आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, त्याचे दुष्परिणाम केवळ एवढ्यापुरते मर्यादित नसून दूषित हवेच्या दीर्घकाळ संपर्कामुळे मानसिक आरोग्यावरही परिणाम होत आहे. यामुळे तुमचा मूड बदलतो आणि तणाव, नैराश्य, चिंता याबरोबरच चिडचिडेपणाही वाढू शकतो.
वायू प्रदूषणाचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतोय
अमेरिकन सायकियाट्रिक असोसिएशनच्या अहवालानुसार, वायू प्रदूषणाचे दुष्परिणाम जाणून घेण्यासाठी केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, त्याचा मानसिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. असे आढळून आले आहे की, प्रदूषित हवेमुळे तणाव आणि चिंता देखील होऊ शकते. यामुळे नैराश्य, स्मृतिभ्रंश आणि अल्झायमरसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो.
प्रदूषणामुळे तणाव-चिंता वाढू शकते
अभ्यासात असे आढळून आले आहे की, दूषित हवेत राहण्यामुळे काही काळ तणाव आणि चिंताग्रस्त समस्या देखील वाढू शकतात. जर तुम्ही या समस्यांना आधीच असुरक्षित असाल, तर वायू प्रदूषणामुळे या समस्या आणखी वाढू शकतात. संशोधकांचे म्हणणे आहे की, प्रदूषक आणि दूषित हवेच्या सतत संपर्कात राहिल्याने तणाव संप्रेरकांचे उत्सर्जन वाढते, ज्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. पण त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
मूड स्विंग आणि नैराश्याचा धोका
संशोधनात असे दिसून आले आहे की, वायू प्रदूषणामुळे मूड बदलतो. त्यामुळे डिप्रेशनची समस्याही अनेक पटींनी वाढू शकते. त्यामुळे मेंदूच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे मूड नकारात्मक पातळीवर बदलू शकतो. वायू प्रदूषणाच्या दीर्घकाळ संपर्कामुळे मूड स्विंग आणि नैराश्याचा धोका वाढू शकतो. नैराश्याच्या रुग्णांसाठी वायू प्रदूषण ही एक गंभीर समस्या मानली जाते. इतकेच नाही तर, प्रदूषणाच्या सूक्ष्म कणांच्या म्हणजेच पीएम 2.5 च्या संपर्कात आल्याने न्यूरोडीजनरेटिव्ह विकारांचा धोकाही वाढू शकतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :