Health Tips : तुम्हीसुद्धा घाईघाईत जेवता का? जेवणाला किती वेळ द्यावा? खाण्याच्या 'या' सवयी नक्की पाळा
Health Tips : आजच्या धावपळीच्या जीवनात, आपण अन्न खाण्याची घाई करतो आणि आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना आमंत्रण देतो.
Health Tips : आरोग्य ही आपली संपत्ती आहे आणि ते जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे. मात्र, आजकालच्या धावपळीच्या युगात आपण हे कुठेतरी विसरत चाललो आहोत. दैनंदिन जीवनातील आपली रोजची कामं तर धावपळीची असतातच. पण, त्याचबरोबर आपण हळूहळू खाणेही विसरत चाललो आहोत. जेवणासाठी योग्य वेळ देणे गरजेचे आहे, किती वेळात अन्न पूर्णपणे संपवले पाहिजे या गोष्टींचा तर आजकाल कोणी विचारही करत नाही. याचंच कारण म्हणजे वाढतं आजाराचं प्रमाण, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे असे दिसून येतात. अशा वेळी तुम्हालाही याच्याशी संबंधित काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे.
जेवणाला साधारण किती वेळ द्यावा?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दुपार आणि रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही साधारण 30 ते 35 मिनिटांचा वेळ दिलाच पाहिजे. या दरम्यान तुम्ही नीट आणि अन्न नीट चावून अन्न खाणे गरजेचे आहे. घाईघाईने अन्न खाल्ल्यास ते अन्न पचायला जास्त वेळ लागतो. त्याऊलट चवीचवीने आणि शांतपणे अन्न खाल्लं की ते शरीरालाही लागतं.
अभ्यास काय सांगतो?
एका अभ्यासातून हे देखील समोर आले आहे की, खाण्याचे प्रमाण कमी केल्याने वजन कमी होते आणि लठ्ठपणा टाळता येतो. जपानमधील एका विद्यापीठातील संशोधकांनी टाईप 2 मधुमेह असलेल्या 59,717 लोकांच्या डेटाची तपासणी केली. जेव्हा संशोधकांनी लोकांना जलद खाणारे, मध्यम खाणारे किंवा हळू खाणारे असे स्वतःचे वर्णन करण्यास सांगितले तेव्हा जे लोक हळू खाणारे होते त्यांना लठ्ठपणाचा धोका सर्वात कमी होता. जे लोक मध्यम खाणारे होते त्यांना थोडा जास्त धोका होता. परंतु, सर्वात जास्त धोका जलद खाणाऱ्या गटात होता.
घाईघाईत अन्न खाल्ल्याने 'या' समस्या उद्भवू शकतात
1. जर तुम्ही अन्न सावकाश खाल्ले आणि चवीने खाल्ले तर त्यामुळे तुमचे पचन बरोबर राहते. परंतु, अन्न घाईघाईने खाणे किंवा चघळण्याऐवजी गिळल्यास पचन बिघडू शकते. अशा वेळी छातीत जळजळ, अपचन आणि गॅस सारख्या समस्या होण्याची शक्यता असते.
2. अन्न जलद खाल्ल्याने तुम्हाला मधुमेहाचा धोका देखील होऊ शकतो. जलद खाल्ल्याने शरीरातील इन्सुलिनचा प्रभाव कमी होतो आणि रक्तातील ग्लुकोज वाढते, ज्यामुळे तुम्ही मधुमेहाचे बळी होऊ शकता.
3. घाईघाईत अन्न खाल्ल्याने व्यक्ती मेटाबॉलिक सिंड्रोमची शिकार बनते. अशा स्थितीत त्याला उच्च रक्तदाबाची समस्या होऊ लागते आणि उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
खाण्याच्या 'या' सवयी नक्की पाळा
1. तुमच्या जेवणाची वेळ नियमित करा.
2. तुम्ही दिवसातून किती वेळा जेवता त्यानुसार तुमची वेळ निश्चित करा.
3. जेवताना इतर कोणत्याही गोष्टींचा विचार करू नका.
4. प्रवासात खाणे टाळा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :