एक्स्प्लोर

Health Tips : तुम्हीही ऑफिसमध्ये लोकांच्या People Pleaser चे बळी आहात का? नेमकी काय आहे ही समस्या; जाणून घ्या

What Is People Pleaser : या परिस्थितीत तुम्ही स्वत: आनंदी नसता अनेकदा तुम्हाला सोयीस्करही वाटत नाही, पण तुमच्या अशा वागण्यामुळे समोरच्या लोकांना नक्कीच बरे वाटते.

What Is People Pleaser : अनेकदा ऑफिसमधील लोकांना किंवा घरात कोणालातरी मदत करणं आणि एखाद्याला खुश करणं ही चांगली गोष्ट आहे. पण जर तुम्ही नेहमी एखाद्याच्या उपस्थितीत गुंतलेले असाल किंवा जर तुम्ही एखाद्याने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणत असाल तर ही तुमच्यासाठी एक समस्या ठरू शकते. असे केल्याने तुम्ही लोकांच्या वागण्याला बळी पडू शकता. पिपल प्लेझर या संदर्भात तुम्हाला काही माहित आहे का? आणि नसेल तर याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो ते जाणून घ्या. 

People Pleaser म्हणजे काय?

People Pleasure म्हणजे इतरांना नेहमी कंम्फर्ट फिल करून देणे. या परिस्थितीत तुम्ही स्वत: आनंदी नसता अनेकदा तुम्हाला सोयीस्करही वाटत नाही, पण तुमच्या अशा वागण्यामुळे समोरच्या लोकांना नक्कीच बरे वाटते. हा प्रकार अनेकदा ऑफिसमध्ये दिसून येतो. सुरुवातीला लोकांच्या बोलण्याला सहमती देऊन तुम्ही लोकांच्या नजरेत आपलं चांगलं स्थान निर्माण करू पाहता. पण जसजसा काळ पुढे सरकतो तसतसे तुम्हाला या वागण्याचे ओझे वाटू लागते आणि त्यामुळे व्यक्ती सतत मानसिक दडपणाखाली राहते. ही परिस्थिती तेव्हा उद्भवते जेव्हा तुम्हाला असे वाटते की लोक तुम्हाला पसंत करणार नाहीत. जर तुम्ही त्यांच्या विरोधात बोललात तर तुमचे सहकारी तुमच्याशी बोलणार नाहीत. तुम्हाला ग्रूपमध्ये सामील करून घेणार नाही. त्यामुळे ही भीती वाढत जाते आणि तुम्ही People Pleasure चे बळी ठरता. 

People Pleasure चे तोटे कोणते?

इतरांना सतत आनंदी ठेवण्याच्या प्रक्रियेत, आपण स्वतःबद्दल विचार करणं सोडून देतो. समोरच्या व्यक्तीला आनंदी करण्यात आपण आपली सर्व शक्ती पणाला लावतो. असे केल्याने अनेक वेळा आपण आपल्या वैयक्तिक गोष्टींकडेही दुर्लक्ष करतो. ही परिस्थिती भविष्यात तणावाचे कारण होऊ शकते. यामुळे तुम्हाला आयुष्यभर निराश, चिडचिडेपणा आणि असमाधानी वाटू लागते. असे केल्याने तुमचा तुमच्या स्वाभिमानाशी संघर्ष सुरु होतो. अनेक वेळा असं वाटतं की आपण समोरच्या व्यक्तीला आनंदी करत असू तर समोरच्या व्यक्तीनेही आपलं ऐकलं पाहिजे. पण जेव्हा असे होत नाही तेव्हा ती व्यक्ती तणावात राहू लागते.

यापासून स्वतःचे रक्षण कसे करावे?

या समस्येपासून मुक्त होण्यासाठी सर्वप्रथम नाही म्हणण्याची सवय लावा. कोणत्याही मुद्द्यावर विचार न करता हो म्हणणे योग्य नाही. स्वतःसाठी लढा. यामुळे कदाचित लोकांना तुमचा राग येईल. पण तुम्हाला स्वत:ला फार समाधानी वाटेल. तसेच लोक तुम्हाला सोडून जातील ही भीतीही मनातून काढून टाका. तुम्ही चांगले काम केले तर लोक आपोआप तुमच्याकडे येतील हा विश्वास ठेवा.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dr. Manmohan Singh Passes Away : डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वासZero Hour : महिला कुठेच सुरक्षित नाहीत? नराधमांना कायद्याची भीती कधी बसणार?Job Majha | कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत प्रशासकीय अधिकारी पदावर भरती ABP MajhaKailash Phad Arrested : बीडमध्ये हवेत फायरिंग करणारा कैलास फड अटकेत, परळी पोलिसांची कारवाई

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Anjali Damani on Dhananjay Munde : हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
Embed widget