Health Tips : हिवाळ्यात ब्लोटिंगची समस्या वाढतेय? 'या' घरगुती उपायांनी लगेच मिळवा आराम
Health Tips : थंड हवामानात शारीरिक हालचाली कमी होतात. त्यामुळे व्यायाम आणि मॉर्निंग वॉक देखील करण्यास लोक टाळाटाळ करतात.
Health Tips : थंडीच्या दिवसांत (Winter Season) जास्त भूक लागल्याने आणि कमी शारीरिक हालचालींमुळे अनेकदा ब्लोटिंगची (Bloating) समस्या निर्माण होते. त्यामुळे काही लोकांना अनेकदा चेहरा आणि पोटदुखीची समस्या होते. आज या ठिकाणी ही समस्या नेमकी का आणि कशामुळे होते? तसेच यापासून तुम्ही सुटका कशी करू शकता? या संदर्भात आम्ही माहिती सांगणार आहोत.
हिवाळ्यात सूज वाढण्याची 'ही' आहेत कारणे
शारीरिक हालचालींमध्ये घट
थंड हवामानात शारीरिक हालचाली तशाही कमी होतात. त्यामुळे व्यायाम आणि मॉर्निंग वॉकदेखील करण्यास लोक टाळाटाळ करतात. या ऋतूत पचनक्रियाही मंद होते. त्यामुळे बद्धकोष्ठता आणि गॅसच्या समस्या होतात. परिणामी सूज येण्याची समस्या वाढते.
डिहायड्रेशन
बाहेर थंडी असली तरी हीटिंग सिस्टम घरातील हवा गरम करू शकते. त्यामुळे डिहायड्रेशनची समस्या होते. जर्नल ऑफ न्यूरोगॅस्ट्रोएन्टेरोलॉजी अँड मोटिलिटीमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, जेव्हा आपल्या शरीरात पुरेसे पाणी नसते तेव्हा ते द्रवपदार्थ टिकवून ठेवतात, ज्यामुळे सूज येते.
हिवाळ्यात 'या' दोन गोष्टी कमी खाव्यात
हिवाळ्यात मीठ आणि कार्ब्स असलेले पदार्थ खाऊ नयेत. मीठाचं सेवन केल्याने त्याचं प्रमाण वाढू शकते. तर, कार्ब्स शरीरात पचायला वेळ लागतो. त्यामुळे गॅस आणि पोट फुगण्याची समस्या होऊ शकते.
'या' गोष्टी खाल्ल्याने पोट फुगण्याच्या समस्येपासून सुटका मिळते
आलं (Ginger)
BMC Complementary Medicine and Therapies मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार ब्लोटिंगच्या समस्येवर आलं फायदेशीर आहे. हिवाळ्यात आलं खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते.
पुदीना (Mint)
पुदीना गॅस्ट्रोइंटेस्टाईनल स्नायूंना आराम देते. बीएमसी कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन्स अँड थेरपीजमध्ये प्रकाशित केलेल्या संशोधनात असे सुचवले आहे की, पुदीना सूज येणे आणि अपचन यांसारख्या लक्षणांपासून मुक्त होण्यास मदत करू शकते. यासाठी पाण्यातून किंवा चहातून पुदिन्याचं सेवन करा.
दालचिनी (Cinnamon)
दालचिनीमुळे जेवणाची चव तर वाढतेच पण रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रित राहते. केर्मनशाह युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेसच्या संशोधकांच्या मते, दालचिनी जळजळ होण्यापलीकडे जठरोगविषयक अनेक लक्षणांपासून मुक्त होण्यास मदत करते. जसे की उलट्या, मळमळ, छातीत जळजळ आणि भूक न लागणे या समस्यांवर दालचिनी चांगला उपाय आहे.
हळद (Turmeric)
हळद कोणत्याही प्रकारची जळजळ कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. हळद पचनास मदत करते आणि सूज कमी करते. तेहरान युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेसच्या संशोधकांनी प्रकाशित केलेल्या संशोधनानुसार, हळद आयबीएसची अनेक लक्षणे कमी करण्यास मदत करते.
जिरे (Cumin)
मिडल ईस्ट जर्नल ऑफ डायजेस्टिव्ह डिसीजेसमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की, जिरे आपल्या पाचक गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे. यामुळे पोटाची जळजळ कमी होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Health Tips : तुमच्या 'या' चांगल्या सवयी तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात; आजपासूनच त्या बंद करा