Health Tips : आहारातील 'या' पदार्थांमुळे तुमची चिंता, अस्वस्थता वाढते; आजपासूनच 'ही' सवय बदला
Health Tips : तुम्ही ज्या अन्नपदार्थांचं सेवन करता त्याचा थेट परिणाम तुमच्या स्वभावावर, वागण्यावर होतो.
Health Tips : सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमुळे (Lifestyle) आणि खाण्याच्या बिघडलेल्या सवयींमुळे अनेकदा आपल्या शारीरिक तसेच मानसिक समस्या वाढतात. पण, तुम्हाला माहित आहे का आपण ज्या पदार्थांचं सेवन करतो त्याचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतो. तुम्ही ज्या अन्नपदार्थांचं सेवन करता त्याचा थेट परिणाम तुमच्या स्वभावावर, वागण्यावर होतो. त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यासाठी खाण्यापिण्याच्या सवयींबाबत विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. अशाच काही पदार्थांबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.
गोड पदार्थांचं सेवन
जर तुम्ही गोड पदार्थ खाण्याचे शौकीन असाल जसे की, कँडी, पेस्ट्री किंवा रिफाइंड साखर तर वेळीच काळजी घ्या. कारण या गोष्टींचे सेवन केल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढते. यामुळे, दुःख आणि अस्वस्थता वाटू शकते. त्यामुळे गोड पदार्थांचं सेवन कमी करावं.
मसालेदार अन्न
जास्त मसालेदार अन्नाचा मूडवर वाईट परिणाम होतो. याचे सेवन केल्याने तुमचा मूड खराब होऊ शकतो. त्यामुळे अस्वस्थता, चिंता यांसारख्या मानसिक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे जास्त मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.
मीठ
जर तुम्हाला तुमच्या जेवणात अतिरिक्त मीठ घेण्याची सवय असेल तर त्यामुळे चिंतेची समस्या वाढू शकते. त्यामुळे जास्त मीठ खाणे बंद करा आणि जेवणात योग्य प्रमाणात मीठ वापरा.
कॅफिन असलेले पदार्थ
तुम्ही कॅफीनयुक्त पदार्थांचं सेवन करत असाल तर काळजी घ्या. चहा, कॉफी किंवा सोडा ड्रिंक्सच्या अतिसेवनाने शरीरातील अस्वस्थता वाढू शकते. त्यामुळे कॅफिन असलेल्या गोष्टी योग्य प्रमाणात वापराव्यात.
मद्यपान
जर कोणी जास्त प्रमाणात मद्यपान केले तर त्यामुळे झोपेचा त्रास आणि इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने अस्वस्थता आणि चिंता देखील वाढू शकते.
प्रक्रिया केलेले कार्ब, तळलेले पदार्थ, फास्ट फूड
जर तुम्ही समोसे, कचोरी यांसारख्या तळलेल्या पदार्थांचे जास्त सेवन करत असाल किंवा व्हाईट ब्रेड किंवा साखर यांसारखे पदार्थ जास्त खाल्ले तर लगेचच तुमची ही सवय बदला. कारण यामुळे तुमची चिंता वाढू शकते आणि अस्वस्थता येऊ शकते. याबरोबरच फास्ट फूड देखील टाळावे. कारण त्यात अनेक प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह आढळतात ज्यामुळे तुमच्या समस्या वाढू शकतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :