(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : हाडं आणि दातांच्या मजबूतीसाठी कॅल्शियम गरजेचं; 'या' लक्षणांद्वारे त्याची कमतरता ओळखा
Calcium Deficiency : तुमच्या शरीराच्या सर्वांगीण आणि योग्य विकासासाठी कॅल्शियम मदत करतात.
Calcium Deficiency : निरोगी राहण्यासाठी शरीराला अनेक पोषक तत्त्वांची गरज असते. हे विविध पोषक घटक तुमच्या शरीराच्या सर्वांगीण आणि योग्य विकासासाठी मदत करतात. कॅल्शियम (Calcium) हे या पोषक तत्वांपैकी एक आहे, जे हाडे आणि दातांच्या आरोग्यासाठी आवश्यक खनिज आहे. याशिवाय, मज्जातंतूचे कार्य, स्नायूंचे कार्य आणि रक्त गोठणे यांसह अनेक शारीरिक कार्यांमध्ये कॅल्शियम महत्त्वाची भूमिका बजावतात.
कॅल्शियमच्या या कार्यांवरून, ते आपल्या शरीरासाठी किती गरजेचं आहे हे तर आपल्याला माहीतच असेल. त्यामुळेच, जर आपल्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल तर अनेक समस्या उद्भवू शकतात. अशा वेळी शरीरातील कॅल्शियमची कमतरता लवकरात लवकर ओळखणं गरजेचं आहे, जेणेकरून ही कमतरता वेळेत दूर करता येईल. आज या ठिकाणी, आम्ही तुम्हाला शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे दिसणाऱ्या काही लक्षणांबद्दल सांगणार आहोत. या लक्षणांच्या मदतीने ही कमतरता ओळखू शकता की तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे की नाही. जर तुम्हालाही अनेक पदार्थांमधून जळजळ होत असेल तर तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असे समजून घ्या.
'ही' लक्षणं दिसल्यास त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
दातांना किड लागणे
कॅल्शियम हे आपल्या दातांच्या चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत. या कॅल्शियमच्या कमतरतेमुळे दात किडणे, तसेच हिरड्या दुखणे असे अनेत आजार होऊ शकतात.
ऑस्टिओपोरोसिस
तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्यास, कालांतराने कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत तसेच ठिसूळ होऊ शकतात. ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढू शकतो.
मुलांच्या विकासात अडथळा
मुलांमध्ये, कॅल्शियमच्या कमतरतेमुळे त्यांची वाढ आणि विकास लवकर होत नाही. कारण निरोगी हाडांच्या विकासासाठी कॅल्शियमची गरज असते. मात्र, हेच कॅल्शियम जर मुलांना मिळत नसेल तर त्यांची वाढ लवकर होत नाही.
पाय सुन्न होणे तसेच पायांना मुंग्या येणे
जर तुम्हाला अनेकदा हात, बोटे आणि चेहऱ्यावर सुन्नपणा जाणवत असेल, तसेच, सतत तुमच्या हाता-पायंना मुंग्या येत असतील तर समजून जा की तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे.
तुमची नखं कमकुवत होणे
अनेकदा आपली नखं आपल्याला कमकुवत दिसतात अशा वेळी हे तुमच्या शरीरातील कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होणारे लक्षण आहे हे समजून घेणं गरजेचं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.