Health Tips : हृदय निरोगी ठेवण्यासाठी 'या' भाजीचा आहारात समावेश करा; अनेक समस्या होतील दूर
Health Tips : जर तुम्हाला तुमचं हृदय निरोगी ठेवायचं असेल तर अरबी नक्की खा. अरबीच्या सेवनाने हृदयातील रक्तप्रवाह सुधारतो.

Health Tips : शरीराचे तसेच हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी आपला आहार चांगला असणे गरजेचे आहे. यासाठी आपण कोणता आहार घेत आहोत याकडे आपले विशेष लक्ष असले पाहिजे. जर तुम्हाला निरोगी रहाायचं असेल तर तुम्ही निरोगी आहार निवडला पाहिजे. आपल्या आजूबाजूला अशा अनेक भाज्या आहेत ज्या आरोग्यासाठी फायदेशीर मानल्या जातात. या भाज्यांमध्ये अरबीचाही समावेश आहे. अरबी ही कोणती पालेभाजी नाही ना तिचा रंग हिरवा. त्यामुळे अनेकांना ही आरोग्यदायी भाजी वाटत नाही. मात्र, अरबी ही फार आरोग्यदायी आहे. जर तुम्हाला तुमचं हृदय निरोगी ठेवायचं असेल तर अरबी नक्की खा. अरबीच्या सेवनाने हृदयातील रक्तप्रवाह सुधारतो. ज्यामुळे हृदय निरोगी ठेवण्यास मदत होते. याशिवाय अरबीचे फायदे कोणते हे जाणून घेऊयात.
अरबी हृदय कसे निरोगी ठेवते?
हृदय निरोगी ठेवण्यासाठी अरबी फायदेशीर मानली जाते. अरबीमध्ये अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंट्स, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन ई आर्बीमध्ये आढळतात. ही सर्व जीवनसत्त्वे आणि खनिजे हृदयविकार दूर ठेवू शकतात. इतकंच नाही तर, अरबी खाल्ल्याने तुम्ही कॅन्सरसारख्या घातक आजारांपासूनही दूर राहता.
अरबीचे फायदे :
- अरबी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते.
- शरीरातील वाढत्या रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी अरबीचे सेवन करावे.
- अरबी खाल्ल्याने वजन कमी होऊ शकते.
- पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी अरबी फायदेशीर ठरते.
- नजर वाढवण्यासाठी अरबी गुणकारी आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
























