एक्स्प्लोर

China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर लावलेल्या महाकाय टॅक्सने घेणाऱ्यांना घामटा फुटायची वेळ आली! असा निर्णय का घेतला?

China Condom Tax: या करामुळे सार्वजनिक आरोग्याच्या चिंता वाढल्या आहेत. जागतिक स्तरावर एचआयव्हीच्या रुग्णांची संख्या कमी होत असताना, चीनमध्ये मात्र एचआयव्हीच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

China Condom Tax: जगाला चकित करून सोडण्यात कोणतीही कसर न सोडणाऱ्या चीनने आता घेतलेल्या निर्णयाने भूवया उंचावल्या आहेत.  चीन आता कंडोम आणि इतर गर्भनिरोधक उत्पादनांवर व्हॅल्यू ॲडेड टॅक्स (VAT) आकारण्यास सुरुवात करणार आहे. 30 वर्षांमध्ये प्रथमच हा कर लागू केला जाईल. सुधारित व्हॅल्यू ॲडेड टॅक्स कायद्यानुसार, या उत्पादनांवर 13 टक्के कर लागू होईल. ही उत्पादने 1993 पासून करमुक्त होती. 1993 मध्ये ‘वन-चाइल्ड पॉलिसी’ (One-child policy) लागू होती, आणि त्यावेळी गर्भनिरोधक उपायांना व्यापक प्रोत्साहन दिले जात होते.

धोरणात्मक बदल आणि जन्मदर वाढवण्याचे उद्दिष्ट  

हा बदल चीनच्या कर नियमांच्या अद्ययावतीकरणामुळे तसेच कुटुंबासाठीच्या धोरणांना नवा आकार देण्याच्या प्रयत्नांमुळे होत आहे. या निर्णयामुळे चीनने आता जन्मदर कमी करण्याच्या धोरणातून बाहेर पडून जन्मदर वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. चीनची लोकसंख्या सलग तीन वर्षांपासून कमी होत आहे. 'वन-चाइल्ड पॉलिसी' संपुष्टात आल्यानंतर सुमारे एका दशकापूर्वी 18.8 दशलक्ष जन्म झाले होते, त्या तुलनेत 2024 मध्ये केवळ 9.54 दशलक्ष जन्म झाले.

कंडोमवर कर लावला पण..

दुसरीकडे, कंडोमवर कर लावला जात असताना, दुसरीकडे सरकारने बालसंगोपन आणि कुटुंब-संबंधित सेवांना VAT मधून सूट दिली आहे. या करमुक्त सेवांच्या यादीत नर्सरी, किंडरगार्टन्स, वृद्धांची काळजी घेणाऱ्या संस्था, अपंग सेवा पुरवठादार आणि विवाह-संबंधित सेवांचा समावेश आहे. या सवलती जानेवारीमध्ये लागू होणार आहेत. अलीकडच्या वर्षांत चीनने रोख प्रोत्साहन (cash incentives) दिले आहे, बालसंगोपन पर्याय वाढवले आहेत आणि प्रसूती तसेच पितृत्व रजा वाढवली आहे. तसेच, "वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक नसलेले" गर्भपात कमी करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

विश्लेषकांच्या मते, मुलांचे पालनपोषण करणे खूप महाग असल्याने, हा नवीन कर फार मोठा परिणाम करेल अशी अपेक्षा नाही. 2024 च्या युवा पॉप्युलेशन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार, 18 वर्षांपर्यंत एका मुलाचे पालनपोषण करण्यासाठी 538,000 युआन ($115,995) पेक्षा जास्त खर्च येतो. मंद आर्थिक वाढ आणि बदललेल्या सामाजिक अपेक्षांमुळे अनेक तरुणांना मुले परवडत नाहीत, असे त्यांचे मत आहे.

सार्वजनिक आरोग्य आणि नागरिकांच्या चिंता 

दुसरीकडे, या करामुळे सार्वजनिक आरोग्याच्या चिंता वाढल्या आहेत. जागतिक स्तरावर एचआयव्हीच्या रुग्णांची संख्या कमी होत असताना, चीनमध्ये मात्र एचआयव्हीच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. 2002 ते 2021 दरम्यान, अहवालानुसार एचआयव्ही आणि एड्सचे रुग्ण प्रति 100,000 लोकांमागे 0.37 वरून 8.41 पर्यंत वाढले आहेत. बहुतेक नवीन संसर्ग असुरक्षित लैंगिक संबंधांशी जोडलेले आहेत. काहींनी कंडोमच्या वाढलेल्या किंमतींमुळे अधिक अनियोजित गर्भधारणा (unplanned pregnancies) होऊ शकतात किंवा लैंगिक संक्रमित संसर्गामध्ये (STIs) वाढ होऊ शकते.

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग, 5 जणांचा मृत्यू, तर 41 जण बेपत्ता, 225 जणांना वाचवण्यात यश
इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग, 5 जणांचा मृत्यू, तर 41 जण बेपत्ता, 225 जणांना वाचवण्यात यश
CWG 2026: 'ईशान्य भारत अन् काश्मीर गायब'; ग्लासगोतील रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर भारताचा अपूर्ण नकाशा, स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन आणि BFI चा तीव्र आक्षेप
'ईशान्य भारत अन् काश्मीर गायब'; ग्लासगोतील रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर भारताचा अपूर्ण नकाशा, स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन आणि BFI चा तीव्र आक्षेप
Middle East Crisis: 'मिडल ईस्ट सोडा', अमेरिकेकडून नागरिकांना महत्त्वाचा अलर्ट, इराणसोबतच्या तणावात मोठा भडका उडणार?
'मिडल ईस्ट सोडा', अमेरिकेकडून नागरिकांना महत्त्वाचा अलर्ट, इराणसोबतच्या तणावात मोठा भडका उडणार?
Donald Trump: अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget