Sweet Potato : मधुमेहाच्या रूग्णांसाठी रताळे हे सुपर फूड; वाचा फायदे
Sweet Potato For Diabetes :
Sweet Potato For Diabetes : रताळे हे असं कंदमुळ आहे जे लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच फार आवडते. कारण रताळे चवीला गोड असतात. त्याचप्रमाणे लहान मुलांना आवडणारे अनेक पदार्थ रताळ्यांपासून बनवले जातात. रताळे चवीला गोड असतात, त्यामुळे रताळे मधुमेहाच्या रुग्णांनी खाऊ नयेत, असा अनेकांचा समज आहे, पण तसे नाही. अमेरिकन डायबिटीज असोसिएशनने प्रसिद्ध केलेल्या टॉप 10 डायबिटीज सुपर फूडच्या यादीत रताळ्याचाही समावेश करण्यात आला आहे. याचाच अर्थ, रताळे मधुमेह नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी आहे. रताळ्याचे उत्पादन भारतातही मोठ्या प्रमाणात घेतले जाते. स्टार्च आणि फायबरने समृद्ध, रताळ्यामध्ये बटाट्याच्या अर्धा ग्लायसेमिक इंडेक्स असतो. तसेच, रताळे वजन कमी करण्याचा प्रयत्न करणार्या लोकांसाठी आणि कर्बोदके असल्यामुळे मधुमेहाच्या रूग्णांसाठी फायदेशीर आहेत.
मधुमेहाच्या रूग्णांसाठी रताळे फायदेशीर
2004 मध्ये झालेल्या एका संशोधनात असे समोर आले आहे की, रताळ्यामुळे टाईप 2 मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी होते आणि त्यामुळे ग्लुकोजही नियंत्रणात राहते. यामुळे मधुमेहाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो, असेही अनेक संशोधनांमध्ये आढळून आले आहे. त्याच वेळी, रताळे वेगवेगळ्या प्रकारे खाल्ले जातात आणि यामुळे रताळ्याच्या ग्लायसेमिक इंडेक्सवर देखील परिणाम होतो. अशा परिस्थितीत रताळे उकळणे आणि बारीक करण्याची शिफारस केली जात नाही, कारण ते लवकर पचते आणि रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका वाढतो. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी रताळे तेलात हलके तळलेले साल टाकून खावेत.
अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या मते, रताळ्यामध्ये फायबर आणि व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, जस्त आणि व्हिटॅमिन बी, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम यांसारखे अँटिऑक्सिडंट घटक जास्त असतात. जे हार्ट अटॅक आणि स्ट्रोक सारख्या आजारांपासून संरक्षण करतात. केशरी रंगाच्या रताळ्यामध्ये बीटा-कॅरोटीनचे प्रमाण जास्त असते आणि अशा रताळ्याचे 125 ग्रॅम सेवन केल्यास जीवनसत्व-अ पूर्ण होऊ शकते. त्याच वेळी, तुम्ही रताळे बेक करून खाऊ शकता, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :