Health Tips : कडाक्याच्या थंडीत सतत घसा खवखवतोय? 'हे' 5 घरगुती उपाय तुमच्यासाठी गुणकारी
Sore Throat Remedies : सर्दी, खोकला यांसारख्या संसर्गाचा धोका पुन्हा वाढला आहे. थंडीत जाणवणारा आणखी एक त्रास म्हणजे घसा कोरडा होणे.
Sore Throat Remedies : थंडीचा (Winter Season) जोर हळूहळू वाढू लागला आहे. महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांत कडाक्याची थंडी वाढू लागली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ताप, सर्दी, खोकला यांसारख्या संसर्गाचा धोका पुन्हा वाढला आहे. थंडीत जाणवणारा आणखी एक त्रास म्हणजे घसा कोरडा होणे. अनेकजण या समस्येने त्रस्त असतात. अशा परिस्थितीत घसा खवखवणे आणि सर्दी-खोकला आपल्या दैनंदिन कामावर खूप परिणाम करतात.
अशा परिस्थितीत, लोक यापासून आराम मिळविण्यासाठी अनेक औषधं घेतात. मात्र, अनेकदा त्याचा आपल्या शरीरावर सकारात्मक परिणाम होत नाही. अशा वेळी आम्ह तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणा आहोत. ज्याचा वापर करून तुम्ही या समस्येवर आराम मिळवू शकता.
मिठाच्या पाण्याने गुळण्या करा
घसादुखीपासून तात्काळ आराम मिळवायचा असेल तर मिठाच्या पाण्याने गुळण्या करू शकता. या समस्येपासून त्वरित आराम मिळवण्याचा हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. हे घशात उपस्थित जंतू कमी करण्यास देखील मदत करू शकतात.
बेकिंग सोडासह गुळण्या करा
घसा खवखवण्याच्या समस्येपासून तुम्हाला आराम मिळवायचा असेल तर मिठाच्या पाण्याने गुळण्या तर सगळेच करतात. पण, जर तुम्ही बेकिंग सोडा आणि मिठाच्या पाण्याते गुळण्या केल्या तर तुम्हाला लवकर आराम मिळेल. बेकिंग सोडा आणि मीठ पाणी घसा खवखवण्याच्या समस्येपासून आराम मिळवून देऊ शकतात. हा उपाय जीवाणू कमी करू शकतो आणि बुरशीची वाढ रोखू शकतो.
कॅमोमाईल चहा
कॅमोमाईल चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हा चहा अनेक समस्यांवर उपचार म्हणून रामबाण उपाय आहे. घसा खवखवणे त्यापैकीच एक आहे. हा चहा तुमची प्रतिकारशक्ती देखील वाढवण्यास मदत करतो. ज्यामुळे तुमच्या शरीराला घसा खवखवणार्या विषाणू आणि बॅक्टेरियाशी लढण्यास मदत होते.
मध
मध आपल्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखला जातो. तुम्ही मधाचा चहा किंवा मध पाण्यात मिसळूनही पिऊ शकता. अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की, मुलांमध्ये खोकला नियंत्रणात ठेवण्यासाठी मध हे खोकला कमी करणाऱ्या डेक्स्ट्रोमेथोरफान इतकेच प्रभावी आहे.
लसूण
लसणात नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. तसेच, यामध्ये ऍलिसिन देखील आहे, जो विषाणूजन्य संसर्गाशी लढण्यास आपल्याला सक्षम बनवण्यास मदत करतात.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.