Health Tips : फक्त ज्यूस पिऊन वजन कमी होत नाही! जाणून घ्या यामागचं नेमकं लॉजिक
Health Tips : बर्याच लोकांना असं वाटतं की, जर कमी अन्न खाल्ले आणि जास्त जूस प्यायले तर चेहऱ्यावर ग्लो येतो.
Health Tips : सध्याच्या काळात फीटनेसकडे सगळेच लक्ष देतात. यामध्ये अनेकजण डाएट फॉलो करतात. तर, काही जण फक्त ज्यूस पिऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. अनेकांचा असा गैरसमज आहे की फक्त ज्यूस पिऊन देखील वजन कमी करता येऊ शकते. मात्र, असे नाही. कारण शरीराला पौष्टिकतेची गरज असते आणि फक्त ज्यूस पिऊन तुमच्या शरीराला पुरेसे पोषण मिळू शकत नाही. अशा परिस्थितीत जर ज्यूस पिऊन तुमचं वजन कमी होईल असा जर तुमचा विश्वास असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. जर तुम्हाला दीर्घकाळ वजन कमी करायचे असेल, तर तुम्ही पोषण आणि प्रथिने युक्त अन्न खाणे महत्त्वाचे आहे.
बर्याच लोकांना असं वाटतं की, जर कमी अन्न खाल्ले आणि जास्त जूस प्यायले तर चेहऱ्यावर ग्लो येतो. पण फळे असोत किंवा भाज्यांचा रस, तुम्ही ते तुमच्या पौष्टिक आहारात अवश्य घ्या. तरच त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर दिसून येईल.
आरोग्य तज्ञ नेहमी सांगतात की, एखाद्याने कधीही केवळ ज्यूसवर अवलंबून राहू नये. तर व्यक्तीने नेहमी आपल्या शरीरानुसार योग्य आहाराचे पालन केले पाहिजे. फक्त ज्यूस पिणे तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
वजन कमी करण्यासाठी ज्यूस डाएट का योग्य नाही हे जाणून घ्या
ज्यूसमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते
ज्यूसमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. एक ग्लास ज्यूस प्यायल्याने तुमच्या रक्ताभिसरणातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते. तसेच, तुमची उर्जा पातळी कमी होऊ शकते, कारण पेशी ही साखर खूप लवकर शोषून घेतात आणि तुम्हाला थकवा येऊ लागतो.
प्रोटीनचे सेवन कमी
फायबरशिवाय ज्यूसच्या आहारात प्रोटीनचे प्रमाणही कमी असते. प्रथिने स्नायू तयार करण्यास मदत करतात आणि वजन कमी करण्यासाठी आवश्यक असतात. ते निरोगी रोगप्रतिकारक पेशी तयार करण्यासाठी देखील जबाबदार आहेत जे संक्रमण आणि रोगांपासून संरक्षण करतात. त्यामुळे केवळ रस-आहारावर अवलंबून राहिल्यास रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन आजारी पडू शकतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :