Health Tips : व्हायरल फिवरची प्रमुख लक्षणं, औषधांऐवजी 'हे' घरगुती उपायही ठरतात फायदेशीर
वातावरण बदलांमुळे व्हायरल फिवरच्या समस्येत वाढ होताना दिसत आहे. लहान मुलं आणि वयोवृद्ध माणसांच्या आरोग्यावर बदलणाऱ्या वातावरणाचा लगेच परिणाम होतो. अशावेळी काही घरगुती उपायांच्या मदतीने या समस्येपासून बचाव करणं सोपं होतं.
मुंबई : वातावरणातील गारवा कमी होत असून उष्णता हळूहळू वाढू लागली आहे. वातावरणातील बदलांमुळे आरोग्याची अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. या दिवसांमध्ये थोडसंही दुर्लक्षं करणं आरोग्यासाठी घातत ठरू शकतं. अशातच जगभरात कोरोना व्हारसने हाहाकार घातल्यामुळे आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. लहान मुलं आणि वयोवृद्ध माणसांच्या आरोग्यावर बदलणाऱ्या वातावरणाचा लगेच परिणाम होतो. अशावेळी काही गोष्टींच्या मदतीने आपण बदलणाऱ्या वातावरणातही आरोग्याची काळजी घेऊ शकतो. अशातच व्हायरल फिवरपासून दूर राहण्यासाठी काही घरगुती उपाय करणं आवश्यक असतं. जाणून घेऊया व्हायरल फिवरची लक्षणं आणि त्यापासून बचाव करण्यासाठीचे उपाय...
सावध राहा
वातावरणातील बदलांमुळे व्हायरल, इन्फेक्शन, खोकला यांसारख्या समस्या साधारण आहेत. यापासून बचाव करण्यासाठी लगेच औषध घेण्यात येतं. परंतु, या सवयीपासून बचाव करणं आवश्यक आहे. सर्वात आधी काही घरगुती उपाय करणं आवश्यक आहे. ज्यामुळे व्हायरल आणि खोकल्यापासून सुटका करणं सहज शक्य होतं.
पाहा व्हिडीओ : 'कोरोना व्हायरस' होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?
व्हायरल फिवरची लक्षणं
व्हायरल फिवर असेल तर शरीरामध्ये काही खास लक्षणं दिसून येतात. या लक्षणांमध्ये घशात खवखव, डोकेदुखी, सांधेदुखीसोबतच उल्टी होणं यांसोबतच डोळे लाल होणं आणि ताप येणं यांसारखी लक्षणं दिसून येतात. व्हायल फिवरचा संसर्ग लहान मुलं आणि वयोवृद्धांना लगेच होतो. त्यामुळे यावर तत्काळ उपाय होणं गरजेचं आहे.
त्वरित औषध घेणं टाळा
व्हायरल फिवर झाल्यानंतर लेगेच औषध घेत असाल तर तसं अजिबात करू नका. आहारात द्रव्य पदार्थांचं प्रमाण वाढवा. त्यामध्ये पाणी, सूप, चहा, नारळ पाणी आणि डाळीचं पाणी या पदार्थांचा आहारात समावेश करा. परंतु, एक लक्षात ठेवा, जर लक्षणं जास्त वाढली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
घरगुती उपायही ठरतात फायदेशीर
व्हायरल ताप आल्यानंतर औषधांऐवजी काही घरगुती उपाय करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. या समस्या दूर करण्यासाठी मध, आलं आणि हळद अत्यंत गुणकारी ठरते. आलं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. यामध्ये अॅन्टी फ्लेमेबल, अॅन्टीऑक्सिडंट आणि असे अनेक गुणकारी तत्व असतात. ज्यामुळे व्हायरल तापपासून सुटका करण्यास मदत मिळते. आलं, हळद आणि मध एकत्र करून काढा तयार करा. याचं सेवन केल्याने व्हायरल समस्यांपासून सुटका करण्यास मदत होते.
संबंधित बातम्या :
Corona virus | कोरोना व्हायरसवर औषध सापडलं; थायलंडमधील डॉक्टरांचा दावाHealth Tips : ब्लड प्रेशरची समस्या दूर करण्यासाठी 'हे' उपाय करतील मदत
Health Tips : हिवाळ्यात आइस्क्रिम खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?
वजन कमी करायचंय?; दररोज करा आवळ्याच्या ज्यूसचं सेवन, होतील फायदेच फायदे
डायबिटीजचे रूग्णही खाऊ शकतात गोड पदार्थ?; जाणून घ्या काय म्हणतो रिसर्च
'ही' लक्षणं दिसली तर वेळीच सावध व्हा; लिव्हर खराब होण्याचे असू शकतात संकेत