Health Tips : तुम्ही तुमचा टूथब्रशही बाथरूममध्ये ठेवता का? जाणून घ्या त्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो!
Dental Problem Remedies : तुम्हीही बाथरूममध्ये टूथब्रश ठेवता का? मग जाणून घ्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून तो का वाईट मानला जातो.
Dental Problem Remedies : निरोगी आरोग्यासाठी (Health) आपली निरोगी जीवनशैली (Lifestyle) असणं फार गरजेचं आहे. यासाठी आपल्या राहणीमानात योग्य शिस्त, स्वच्छतेविषयी जागरूकता असणं फार गरजेचं आहे. योग्य शिस्त आणि स्वच्छतेविषयी जागरूकता असल्यास अनेक आजारांपासून आपले संरक्षण करता येते. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना ब्रश झाल्यावर तो बाथरूममध्ये तसाच ठेवण्याची सवय असते. बाथरूममध्ये एक होल्डर ठेवला जातो ज्यामध्ये संपूर्ण कुटुंबातील सदस्यांचे ब्रश ठेवले जातात. आज आपण याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत की, बाथरूममध्ये टूथब्रश ठेवणे योग्य आहे की नाही? त्याचा आरोग्याच्या दृष्टीने शरीरावर काय परिणाम होतो? चला तर जाणून घेऊयात.
फ्लशिंग केल्याने बॅक्टेरिया निघून जातात
दंत तज्ज्ञांच्या मते, फ्लशिंग असूनही शीटवर किंवा आजूबाजूच्या भागात बॅक्टेरिया असतात. हे बॅक्टेरिया संपूर्ण बाथरूममध्ये पसरतात. अशा वेळी जर तुम्ही बाथरूममध्ये तुमचा ब्रश थेवला तर दुर्गंधी पसरू शकते. आणि हे बॅक्टेरिया तुमच्या ब्रशवर साचू शकतात. जे आरोग्यासाठी खरंच घातक असतात. यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आजारही होऊ शकतात. त्यामुळे तुमचा टूथब्रश शक्यतो बाथरूममध्ये ठेवू नका.
ब्रशवर घाण साचू शकते
आरोग्य तज्ज्ञांच्या मते बाथरूममध्ये टूथब्रश ठेवणे योग्य नाही. असे केल्याने ब्रशवर भरपूर बॅक्टेरिया जमा होतात. इतकंच नाही तर एकच बाथरुम अनेकांनी शेअर केल्यास अनेक आजार होण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या टूथब्रशवर घाण साचण्यापासून रोखू शकता.
'इतक्या' दिवसांनी तुमचा ब्रश बदला
दंत तज्ञ सांगतात की ब्रश करण्यापूर्वी एकदा स्वच्छ पाण्याने धुवा. असे केल्याने ब्रशवर जमा झालेले बॅक्टेरिया निघून जातात. त्यामुळे ब्रश केल्यानंतर त्याला झाकण लावायला विसरू नका. आजकाल बहुतेक ब्रश कव्हर्ससह येत आहेत. ब्रशचे दात किंवा ब्रिस्टल्स 3 महिन्यांनंतर बाहेर येत असल्यास, ते त्वरित बदला. घासलेल्या ब्रशने दात साफ करणे धोकादायक ठरू शकते. याकरता तुम्ही देखील तुमच्या जीवनशैलीत हा बदल करा. म्हणजे अनेक रोगांपासून तुमचा बचाव होईल आणि निरोगी राहाल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :