एक्स्प्लोर

Health Tips : महिलांमध्ये जीवनसत्त्व आणि खनिजांची गरज वयानुसार बदलते; कशी ते जाणून घ्या

Health Tips : महिलांना वयानुसार अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे आवश्यक असतात. त्यांनी त्यांच्या आहारात पोषक तत्वांचा समावेश करावा.

Health Tips : शरीराच्या चांगल्या आरोग्यासाठी पोषक तत्वे खूप महत्त्वाची असतात. त्यांच्या कमतरतेमुळे आपल्या आरोग्यावर आणि प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. असे मानले जाते की, पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या शरीरात अधिक पोषक तत्वांची आवश्यकता असते. यामागे पुरुषांपेक्षा महिलांना आरोग्याच्या समस्या अधिक असल्याचे कारण आहे. महिलांनी त्यांच्या वयानुसार पोषक आहार घ्यावा. अशा परिस्थितीत आपल्या आहारात मुबलक प्रमाणात पोषक तत्वांचा समावेश करा. वयानुसार महिलांसाठी कोणते पौष्टिक घटक महत्वाचे आहेत ते जाणून घ्या. 
 
25 वर्षाखालील मुलींसाठी 

कॅल्शियम : मुलींना या वयात कॅल्शियमची गरज असते. अशा परिस्थितीत भरपूर कॅल्शियम घ्या, ज्यामुळे हाडे आणि स्नायूंचा योग्य विकास होऊन ते मजबूत होतात. यासाठी दुग्धजन्य पदार्थ, मासे, सोयाबीनचे सेवन करावे. 
डोस - दिवसभर सुमारे 1 हजार मिलीग्राम 
 
व्हिटॅमिन डी : कॅल्शियम शोषून घेण्यास व्हिटॅमिन डी उपयुक्त ठरते. व्हिटॅमिन डी हे तुम्हाला सकाळच्या सूर्याच्या किरणांपासून देखील मिळू शकते. याशिवाय तुम्ही भेंडी, सॅल्मन फिश आणि धान्यसुद्धा खाऊ शकता.
डोस - दिवसभरात 600 IU 
 
लोह :  दर महिन्याला मासिक पाळीमुळे शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते, त्यामुळे शरीरात अशक्तपणा येऊ लागतो. अशा परिस्थितीत भरपूर मांस, मासे, पालक, डाळिंब आणि बीटरूट खा. 
डोस - दररोज 18 मिग्रॅ 
 
25-40 वर्षांच्या महिलांसाठी 

फॉलिक अॅसिड :  डीएनए आणि आरएनएच्या निर्मितीमध्ये फॉलिक अॅसिड खूप महत्त्वाचे आहे. गरोदरपणात शरीराला पुरेसे फॉलिक अॅसिड मिळणे फार महत्वाचे आहे. हे लिंबूवर्गीय फळे, राजमा, अंडी आणि शेंगांमध्ये आढळते. 
डोस- गर्भवती महिलेसाठी दररोज 600 mcg 

स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी 500 mcg
 
आयोडीन : शरीराच्या विकासासाठी या वयातील महिलांमध्ये  भरपूर  आयोडीन आवश्यक असते.
डोस - दिवसभर 150 एमसीजी
 
लोह : 25 ते 50 वयोगटातील महिलांनीही भरपूर प्रमाणात लोहाचे सेवन करावे. 
डोस - दररोज 18 मिग्रॅ 
गर्भवती महिला दररोज 27 मिग्रॅ
 
जीवनसत्त्व बी 12 आणि बी 16 :  प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी जीवनसत्त्वे आवश्यक आहेत. हे हिरव्या भाज्या, दूध, मासे यामध्ये आढळते.
डोस - व्हिटॅमिन बी 12 2.4 मिग्रॅ दररोज 
व्हिटॅमिन बी 16 1.3 मिग्रॅ दररोज

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या इतर बातम्या

Cinnamon Use In Winter : सर्दी, कफच्या समस्येपासून सुटका हवीय? हिवाळ्यात 'असा' करा दालचिनीचा वापर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget