(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : तुम्हाला तुमचे हार्मोनल बॅलन्स राखायचे असेल तर 'या' 4 खाद्यपदार्थांचे प्रमाण नियंत्रित करा
Health Tips : Caffeine कॉफीमध्ये आढळते, ज्यामुळे कॉर्टिसोलचे प्रमाण वाढते. कोर्टिसोल हा एक तणाव संप्रेरक आहे,
Health Tips : आपल्या आरोग्यासाठी हार्मोनल बॅलन्स किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. कारण आपल्या शरीरात अनेक हार्मोन्सची निर्मिती होत असते. या प्रत्येक हार्मोन्सचं कार्य वेगवेगळं असतं. त्यांचे प्रमाण कमी किंवा जास्त असल्यामुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडू शकते, या स्थितीला हार्मोनल असंतुलन असं म्हणतात. हार्मोन्समधील बदलांमुळे, तुम्ही अनेक आजारांना बळी पडू शकता, ज्यापैकी सर्वात सामान्य म्हणजे थायरॉईड, पीसीओडी (PCOD) आणि मधुमेह (Diabetes). त्यामुळे हार्मोनल संतुलन राखणं महत्त्वाचं आहे. यासाठी जीवनशैली बदल करणे आणि आहारात काही खाद्यपदार्थांचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. पण, काही खाद्यपदार्थ असे आहेत जे हार्मोन्सचे संतुलन बिघडवू शकतात. त्यामुळे ते अन्नपदार्थ मध्यम प्रमाणात खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. चला जाणून घेऊयात कोणत्या खाद्यपदार्थांमुळे तुम्ही हार्मोनल असंतुलनाचा बळी होऊ शकता.
कॉफी
Caffeine कॉफीमध्ये आढळते, ज्यामुळे कॉर्टिसोलचे प्रमाण वाढते. कोर्टिसोल हा एक तणाव संप्रेरक आहे, जो चिंता किंवा चिंताग्रस्त स्थिती निर्माण करू शकतो. म्हणून, कमीतकमी कॉफी पिण्याचा प्रयत्न करा. याचा तुमच्या झोपेवरही परिणाम होतो, ज्यामुळे स्ट्रेस हार्मोन्स वाढू शकतात.
मांसाहारी पदार्थ
मांसाहारी पदार्थ तुमच्या शरीरातील इस्ट्रोजेनचे प्रमाण असंतुलित करू शकतात. ज्यामुळे तुम्हाला अनियमित मासिक पाळी, PCOS, एंडोमेट्रिओसिस इत्यादीसारख्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. त्यामुळे ते संतुलित प्रमाणात खाणे फायदेशीर ठरते.
प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ
प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये जास्त प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह असतात, जे तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकतात. त्यामध्ये सोडियम आणि साखर मोठ्या प्रमाणात असते, ज्यामुळे तणाव संप्रेरक आणि अल्डोस्टेरॉनचे स्तर असंतुलित होऊ शकतात. हे चयापचय, रोगप्रतिकारक शक्ती आणि रक्तदाब प्रभावित करू शकते. त्यामुळे प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ कमीत कमी प्रमाणात खाण्याचा प्रयत्न करा.
सोया उत्पादने
सोया उत्पादने आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. कारण त्यामध्ये प्रथिने भरपूर असतात. पण, ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने तुमचे हार्मोन्स असंतुलित होऊ शकतात. खरंतर, त्यांच्यामध्ये फायटोएस्ट्रोजेन आढळते, ज्यामुळे आपले शरीर कमी प्रमाणात इस्ट्रोजेन तयार करते. त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस, वजन वाढणे, झोप न येणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.