(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ice Cream : थंडगार आईस्क्रिमची सुरुवात कधीपासून झाली? वाचा आईस्क्रिमची रंजक कहाणी
Ice Cream : असे म्हटले जाते की सुमारे 200 ईसवी सन पूर्व, चीनमधील लोक आईस्क्रीम बनवण्यासाठी दूध आणि तांदूळ वापरत होते.
Ice Cream : जगातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आवडणारा पदार्थ म्हणजे आईस्क्रिम. उन्हाळ्यात आईस्क्रिमचं जास्त प्रमाणात सेवन केलं जातं. मात्र, काहीजण हिवाळ्यातही आईस्क्रिम तितक्याच आवडीने खाणं पसंत करतात. तुम्ही चॉकलेट, व्हॅनिला, स्ट्रॉबेरी, बटरस्कॉच असे अनेक फ्लेवर्सचे आइस्क्रीम खाल्ले असतील. पण आईस्क्रिमचा इतिहास काय असेल याबाबत तुम्ही कधी विचार केला आहे का? पहिल्यांदा आईस्क्रिम कोणी बनवली असेल? तुम्हाला सुद्धा असे प्रश्न कधी पडत असतील तर आम्ही तुम्हाला याच संदर्भात माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊयात आईस्क्रिमचा रंजक इतिहास.
आईस्क्रीम पहिल्यांदा कुठे बनवले गेले
आईस्क्रीमची सुरुवात कशी झाली? त्याचा इतिहास काय? या संदर्भात अनेक समजुती आहेत. मात्र, असे म्हटले आहे की 3000 ईसवी सन पूर्व चीनमध्ये आईस्क्रीमचा शोध लागला होता. पण दुसरी समजूत अशी आहे की, मार्कोपोलो नावाच्या एका इटालियन व्यावसायिकाने प्रथमच इटलीमध्ये आईस्क्रीम डिश तयार केली. जेव्हा आइस्क्रीमचा उल्लेख येतो तेव्हा इराणच्या अचेमेनिड साम्राज्यात 500 BC मध्ये प्रथम उल्लेख केला जातो. त्यानुसार इ.स.पूर्व 400 मध्ये पर्शियन लोकांनी बर्फापासून विविध प्रकारचे आईस्क्रीम बनवण्यास सुरुवात केली.
आईस्क्रीममध्ये आणखी बरेच काही आहे
असे म्हटले जाते की सुमारे 200 ईसवी सन पूर्व, चीनमधील लोक आईस्क्रीम बनवण्यासाठी दूध आणि तांदूळ वापरत होते. हे लोक दूध आणि तांदूळ एकत्र उकळायचे आणि बर्फात ठेवायचे आणि नंतर ते खात असत. अशीच कथा आहे की इसवी सन 37 ते 68 च्या सुमारास रोमचा राजा न्यूरो पर्वतावरील फळांचा रस मिसळून हा बर्फ खात असे.
निष्कर्ष काय आहे
असे म्हणतात की, मार्को पोलोने 1254 ते 1324 च्या दरम्यान चीनला प्रवास केला आणि येथून आईस्क्रीम कसे बनवायचे ते शिकले. असे म्हणतात की जेव्हा मार्को पोलोने इटलीमध्ये पहिल्यांदा आईस्क्रीम बनवले, तेव्हा ते प्रथम फ्रान्समधून आणि नंतर अमेरिकेत पोहोचले. तर 17 व्या शतकात आईस्क्रीम इंग्लंडमध्ये पोहोचले. दक्षिण आशियात मुघल सम्राटांसह आईस्क्रीम आले.
महत्त्वाच्या बातम्या :