(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : अॅसिडीटीपासून आराम आणि उत्तम झोप मिळण्यासाठी 'या' खास टिप्स फॉलो करा
Health Tips : झोप पूर्ण न होणाऱ्या व्यक्तींच्या आकडेवारीसंदर्भात भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.
Health Tips : तुम्हाला रात्री झोपेच्या वेळी अस्वस्थ वाटते का, ज्यामुळे पुरेशी झोप मिळत नाही? तर मग, तुम्ही एकटे नाहीत. झोप (Sleep) पूर्ण न होणाऱ्या व्यक्तींच्या आकडेवारीसंदर्भात भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. सर्वेक्षणामधून निदर्शनास येते की, 93 टक्के भारतीयांना झोपेची कमतरता जाणवते.
अनेकांसाठी, अॅसिड रिफ्लक्समुळे घसा किंवा छातीमध्ये जळजळ झाल्याने झोपमोड होते. गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स डिसीज (जीईआरडी) किंवा क्रोनिक अॅसिड रिफ्लक्सचा जवळपास 8 टक्के आणि 30 टक्के भारतीयांवर परिणाम होतो, ज्यामुळे झोपमोड होऊ शकते.
या संदर्भात अॅबॉट इंडियाच्या मेडिकल अफेअर्सचे संचालक डॉ. जेजो करणकुमार म्हणतात की, ''अॅसिडीटीचा व्यक्तीच्या दैनंदिन जीवनासह झोपेच्या दर्जावर मोठा परिणाम होऊ शकतो. अपुऱ्या झोपेमुळे अॅसिड रिफ्लक्स, तसेच थकवा, चिडचिड आणि अवधान न लागणे असा त्रास होऊ शकतो. अॅबॉटमध्ये आमचे सोल्यूशन्स निर्माण करण्यावर आणि व्यक्तींना त्यांच्या अॅसिडीटीवर उत्तम प्रकारे नियंत्रण ठेवण्यास मदत करण्यासाठी जागरूक करण्यावर लक्ष केंद्रित आहे.''
अॅसिड रिफ्लक्सचा त्रास असताना देखील उत्तम झोप मिळण्यासाठी काही टिप्स पुढीलप्रमाणे :
1. झोपेची स्थिती सुधारा
छातीत जळजळ होणे कमी करण्यासाठी तुमची झोपण्याची पद्धत देखील महत्त्वाची आहे. अतिरिक्त उशी घेत डोके किंवा शरीराचा वरचा भाग उंचावल्याने, तसेच डाव्या कुशीवर झोपल्याने मदत होऊ शकते. पाठीवर झोपल्याने अॅसिड रिफ्लक्सचा त्रास होऊ शकतो.
2. झोपेचे नियोजन करा
दररोज झोप अपुरी होत असल्यास अॅसिडीटी पातळ्यांमध्ये वाढ होऊ शकते. झोपेचे योग्य शेड्यूल असणे महत्त्वाचे आहे. दररोज झोपण्याची वेळ आणि सकाळी उठण्याची वेळ समान असली पाहिजे. यामुळे शरीरातील अवयवांचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते, झोपेचा दर्जा उत्तम होतो. तसेच, आराम करण्याचा प्रयत्न करा, वाचन करा.
3. आहार सेवनावर लक्ष ठेवा
झोपण्यापूर्वी मसालेदार पदार्थांचे किंवा अतिप्रमाणात आहार सेवन करणे टाळा. झोपण्यापूर्वी किमान तीन तास अगोदर रात्रीचे जेवण सेवन करा, ज्यामुळे अन्नपचन योग्यप्रकारे होते आणि अॅसिड रिफ्लक्सचा धोका कमी होतो. खरंतर, दिवसभरात वारंवार लहान प्रमाणात आहार सेवन केल्यास उत्तम ठरू शकते. चॉकलेट, लिंबूवर्गीय फळे आणि टोमॅटो यांसारख्या अॅसिडीटी वाढवणाऱ्या खाद्यपदार्थांचे सेवन करणे टाळा.
4. जीवनशैलीत बदल करा
तणावामुळे अॅसिडीटी वाढू शकते. नियमित व्यायाम आणि मानसिक आरोग्य उत्तम राखणाऱ्या क्रियाकलापांसह तणावाचे उत्तमप्रकारे व्यवस्थापन करा. नियमित शारीरिक व्यायाम उत्तम ठरू शकतो, पण झोपण्यापूर्वी अधिक प्रमाणात व्यायाम करणे टाळा.
5. डॉक्टरांचा सल्ला घ्या
तुम्हाला सतत गॅस्ट्रिक अॅसिडीटीचा त्रास होत असेल तर वैयक्तिक मार्गदर्शन आणि उपचार पर्यायांसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. या टिप्सचं जर तुम्ही पालन केलं तर रात्रीच्या वेळी तुम्ही आरामदायी, उत्साहपूर्ण झोपेचा आनंद घेऊ शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :